YouVersion Logo
Search Icon

योहान 15

15
येशु खरा द्राक्षवेल
1मी खरा द्राक्षवेल शे अनी मना बाप माळी शे. 2फळ न देणारा प्रत्येक फाटा तो मनामातीन काढी टाकस अनी फळ देणारा फाटाले जास्तीना फळ येवाले पाहिजे म्हणीसन तो त्या प्रत्येकसले साफसुफ करस 3जे वचन मी तुमले सांगेल शे त्यामुये तुम्हीन पहिला पाईनच शुध्द व्हयेलच शेतस. 4तुम्हीन मनामा राहा अनी मी तुमनामा ऱ्हास, जसं फाटा वेलमा ऱ्हावाशिवाय त्याले स्वतःव्हईसन फळ देता येस नही तसं मनामा ऱ्हावाशिवाय तुमले बी फळ देता येवाव नही.
5मी वेल शे तुम्हीन फाटा शेतस जो मनामा ऱ्हास, तो बरंच फळ देस; कारण मनापाईन येगळं राहीनात तर तुमले काहीच करता येवाव नही. 6जर कोणी मनामा राहीना नही तर त्याले तुटेल फाटानामायक बाहेर टाकतस, अनं तो वाळाई जास; मंग त्यासले गोया करीसन आगमा टाकतस अनं त्या जळी जातस. 7तुम्हीन मनामा राहीनात अनी मना वचनं तुमनामा राहीनात, तर जे काही तुमले पाहिजे व्हई ते मांगा म्हणजे तुमले ते भेटी जाई. 8तुम्हीन बरंच फळ दिधं तर पितानं गौरव व्हई अनी तुम्हीन मना शिष्य व्हशात. 9जशी पितानी मनावर प्रिती करी तशी मी बी तुमनावर प्रिती करेल शे, तुम्हीन मनी प्रितीमा राहा. 10जसं मी मना पितान्या आज्ञा पाळीसन त्यानी प्रितीमा ऱ्हास, तसं तुम्हीन मन्या आज्ञा पाळ्यात तर मनी प्रितीमा राहशात.
11मना आनंद तुमनामा ऱ्हावाले पाहिजे अनी तुमना आनंद परीपुर्ण व्हवाले पाहिजे म्हणीसन मी तुमले या गोष्टी सांगेल शेतस. 12#योहान १३:३४; १५:१७; १ योहान ३:२३; २ योहान १:५जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी अशी मनी आज्ञा शे. 13आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही. 14मी तुमले जे काही सांगस ते जर तुम्हीन करशात तर तुम्हीन मना मित्र शेतस. 15मी आत्तेपाईन तुमले दास म्हणस नही, कारण धनी काय करस ते दासले माहीत नही ऱ्हास. पण मी तुमले मित्र म्हणेल शे, कारण जे काही मी आपला पिताकडतीन ऐकी लिधं ते सर्व मी तुमले सांगेल शे. 16तुम्हीन माले निवाडेल नही, तर मी तुमले निवाडेल अनी नेमेल शे, यामा हेतु हाऊ की तुम्हीन जाईसन फळ द्याव अनं तुमनं फळ टिकावं; अनी जे काही तुम्हीन मना नावतीन पिताकडे मांगशात ते त्यानी तुमले द्यावं. 17तुम्हीन एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे म्हणीसन मी तुमले या आज्ञा करस.
जगना व्देष
18जग तुमना व्देष करस, तर तुमना व्देष कराना पहिले त्यानी मना बी करा हाई तुमले माहीत शे. 19तुम्हीन जगना राहता तर जग आपलासवर प्रिती करतं, पण तुम्हीन जगना नही; मी तुमले जगमाईन निवाडेल शे, म्हणीसन जग तुमना व्देष करस. 20#मत्तय १०:२४; लूक ६:४०; योहान १३:१६दास धनीपेक्षा मोठा नही. अस जे वचन मी तुमले सांगं त्यानी आठवण करा, त्या मनामांगे लागनात तर तुमना बी मांगे लागतीन; त्यासनी मना वचनं पाळात तर तुमना बी पाळतीन. 21पण त्या मना नावकरता हाई सर्व तुमले करतीन, कारण ज्यानी माले धाडेल शे त्याले त्या वळखतस नही. 22मी येतु नही अनं त्यासनासंगे बोलतु नही तर त्या पापना दोषी नही ऱ्हातातं; पण आते त्यासले आपला पाप बद्दल निमित्त सांगता येवाव नही. 23जो मना व्देष करस तो मना पिता बी व्देष करस. 24ज्या कामे दुसरानी कोणी करात नही त्या कामे मी त्यासनामा करतु नही तर त्या पापना दोषी ऱ्हातं नही, पण आते त्यासनी माले अनी मना पिताले बी दखेल शे अनं आमना व्देष करेल शे. 25“तसं तर विनाकारण त्यासनी मना व्देष करा” अस जे वचन त्यासना शास्त्रमा लिखेल शे, ते पुरं व्हवाले पाहिजे म्हणीसन ते अस व्हई राहीनं.
26पण जो पितापाईन निंघस, ज्याले मी पिताकडतीन तुमनाकडे धाडस असा मदतगार म्हणजे सत्यना आत्मा ई तवय तो मनाबद्दल साक्ष दी. 27अनी तुम्हीन बी साक्ष देशात, कारण “सुरवात पाईन तुम्हीन मनासंगे शेतस.”

Currently Selected:

योहान 15: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in