YouVersion Logo
Search Icon

योहान 2

2
काना गावमाधलं लगीन
1तीसरा दिन गालील शहरमाधला काना गाव आठे एक लगीन व्हतं, तठे येशुनी माय व्हती, 2येशु अनी त्याना शिष्यसले बी लगीननं आमंत्रण व्हतं. 3जवय द्राक्षरस संपना तवय येशुनी माय त्याले बोलनी, “त्यासनाजोडे द्राक्षरस नही शे.”
4येशु तिले बोलना, “बाई ह्यानाशी तुना मना काय संबंध? मनी येळ अजुन वनी नही.”
5येशुनी माय नोकरसले बोलनी, “हाऊ जे सांगी ते करा.”
6तठे यहूदीसना शुध्दीकरणना#२:६ हात धवानी प्रथा रितप्रमाणे पाणीना सव दगडी मडका ठेयेल व्हतात, त्यासमा शंभर लिटर पाणी माई इतल्या मोठल्या त्या व्हत्यात. 7येशु नोकरसले बोलना, मडकामा पाणी भरा, तवय त्या त्यासनी पुर्ण भऱ्यात, 8तवय त्यानी त्यासले सांगं, “आते त्यामातीन काढीन लिसन भोजन कारभारीकडे लई जा.” तवय त्या लई गयात 9द्राक्षरस बनेल पाणी भोजन कारभारीनी जवय चाखं, पण तो द्राक्षरस कुठला शे हाई त्याले माहित नव्हतं, पण पाणी काढणारा नोकरसले माहित व्हतं, तवय भोजन कारभारीनी नवरदेवले बलावं. 10अनी त्याले बोलना, “प्रत्येकजण पहिले चांगला द्राक्षरस देस, अनी जवय पाहुणा पिसन तृप्त व्हतस तवय बाशी देतस. पण तुम्हीन तर चांगला द्राक्षरस अजुन पावत ठेयल शे.”
11येशुनी आपला चिन्हसनी हाई सुरवात गालीलमाधला काना आठे करीसन आपलं गौरव प्रकट करं, ते दखीसन त्याना शिष्यसनी त्यानावर ईश्वास धरा.
12 # मत्तय ४:१३ त्यानंतर येशु, त्यानी माय, त्याना भाऊ अनं त्याना शिष्य कफर्णहुम गावले गयात अनी काही दिन तठे राहीनात.
येशु मंदिरमा जास
(मत्तय २१:१२,१३; मार्क ११:१५-१७; लूक १९:४५,४६)
13तवय यहूदी लोकसना वल्हांडण सण जोडे वना, अनं येशु यरूशलेमले गया. 14अनी मंदिरमा गुरढोरं, मेंढरं, अनं कबुतरं ईकनारा अनी पैसा अदल बदल करनारा ह्या बठेल त्याले दखायनात. 15तवय येशुनी दोरीसना एक चाबुक बनाडीन मेंढरं अनी गुरढोरं या सर्वासले मंदिरमातीन हाकली दिधं; त्यानी पैसा अदल बदल करनारासना सर्व शिक्का फेकी दिधात अनं त्यासना चौरंग पालथा करी दिधात. 16अनी कबुतरं ईकनारासले सांगं, “हाई आठेन काढा, मना बापना घरले व्यापारीसनं घर करू नका.” 17तवय “तुना मंदिरमाधली मनी जिद्द माले आगनामायक जाळी टाकी”#स्तोत्रसंहिता ६९:९ अस शास्त्रमा लिखेल शे हाई त्याना शिष्यसले आठवणं. 18यहूदी अधिकारीसनी त्याले सांगं, “तुम्हीन हाई करतस तर आमले काय चमत्कार दखाडतस तुमले त्याना अधिकार शे का?” 19#मत्तय २६:६१; २७:४०; मार्क १४:५८; १५:२९येशुनी त्यासले उत्तर दिधं, “तुम्हीन हाई मंदिर मोडा, अनी मी ह्याले तिन दिनमा परत उभं करसु.” 20यावर यहूदी लोके बोलनात, “हाई मंदिर बांधाले शेचाळीस वरीस लागनात अनी हाई तुम्हीन तिन दिनमा उभं करशात का?” 21पण येशु तर आपला शरिरना मंदिरबद्दल सांगी राहींता. 22जवय तो मरेलस मातीन जिवत व्हयना, तवय हाई त्यानी त्याना शिष्यसले सांगेल व्हतं, हाई त्यासले आठवणं अनी त्यासनी शास्त्रवर अनं येशुनी जे वचन सांगेल व्हतं त्यावर ईश्वास ठेवा.
येशु मनुष्यना ईचार वळखस
23येशु वल्हांडण सणमा जवय यरूशलेमले व्हता तवय त्यानी करेल चमत्कार दखीन बराच लोकसनी त्याना नाववर ईश्वास ठेवा. 24येशुने तर सर्वासले वळख व्हतं त्यामुये त्यानी स्वतःले त्यासना हातमा सोपं नही. 25आखो एखादा मनुष्यनी मनुष्यबद्दल साक्ष देवाले पाहिजे अशी त्याले गरज नव्हती, कारण मनुष्यमा काय शे हाई त्यानी वळख व्हतं.

Currently Selected:

योहान 2: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in