YouVersion Logo
Search Icon

योहान 1

1
जिवनना शब्द
1सुरवातले शब्द व्हता; शब्द देवसंगे व्हता अनी शब्द देव व्हता. 2तोच शब्द सुरवातपाईनच देवनासंगे व्हता. 3सर्वकाही त्यानी शब्दघाई बनाडं; जे सर्वकाही बनी गयं त्यामा कोणतीच वस्तु अशी नही जी त्यानाशिवाय बननी व्हई. 4शब्दमा जिवन व्हतं अनी ते जिवन मनुष्यले प्रकाश व्हतं. 5तो प्रकाश अंधारामा चमकस, तरी अंधारना प्रभाव त्यानावर पडना नही.
6 # मत्तय ३:१; मार्क १:४; लूक ३:१,२ देवनी धाडेल एक संदेशवाहक प्रकट व्हयना त्यानं नाव व्हतं योहान. 7तो प्रकाशबद्दल साक्ष देवाकरता वना; यानाकरता की त्यानाद्वारा सर्वासनी त्याना संदेश ऐकीसन ईश्वास कराले पाहिजे. 8तो स्वतः प्रकाश नव्हता; तर तो त्या प्रकाशबद्दल साक्ष देवाकरता येल व्हता. 9जो खरा प्रकाश प्रत्येक माणुसले प्रकाशमय करस तो जगमा येणार व्हता.
10तो शब्द जगमा व्हता, अनी देवनी त्यानाद्वारा जगले अस्तित्वमा आणं, तरी जगनी त्याले वळखं नही. 11तो आपला स्वतःना लोकसकडे वना, तरी त्याना स्वतःना लोकसनी त्याना स्विकार करा नही. 12परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा. 13तो रक्तघाई नही, शरिरना ईच्छाघाई नही, अनी मनुष्यना ईच्छाघाई नही, पण परमेश्वरना ईच्छातीन उत्पन्न व्हयेल शे.
14शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई परीपुर्ण राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं. 15योहान त्यानाबद्दल साक्ष देस अनी उच्चा आवाजमा म्हणस, “जो मना मांगतीन ई राहीना, ‘तो मनापेक्षा महान शे, कारण तो मना जन्मना पहिले व्हता.’”
16देवना कृपेना परीपुर्णता मातीन आपला सर्वासले, आशिर्वादघाई भरी दिधं. 17देवनी नियमशास्त्र हाई मोशेना द्वारा देयल व्हतं, पण कृपा अनी सत्य हाई येशु ख्रिस्तनाद्वारा येल शे. 18देवले कधीच कोणी दखेल नही, जो एकुलता एक पोऱ्या, जो देवबाप मायक शे, अनी जो त्यानाजोडे बठेल शे, त्याच पोऱ्याद्वारे देवनी स्वतःले प्रकट करं.
बाप्तिस्मा करनारा योहानना संदेश
(मत्तय ३:१-१२; मार्क १:१-८; लूक ३:१-१८)
19योहाननी साक्ष हाई शे की, जवय यहूदी अधिकारीसनी यरूशलेम शहरमातीन याजकसले अनं लेवी#१:१९ लेवी याजकसले मदत करनारा लोकेसले योहानले ईचाराले धाडं की, “तु कोण शे?”
20योहाननी उत्तर देवाकरता नकार दिधा नही, पण उघडपणतीन अनी स्पष्टपनतीन मान्य करं की, “मी ख्रिस्त नही शे” 21तवय त्यासनी त्याले ईचारं, “तर मंग तु कोण शे? तु एलिया शे का?” योहान बोलना, “नही, तु संदेष्टा शे का?” आखो त्यासनी ईचारं. त्यावर त्यानी उत्तर दिधं, “नही.”
22“मंग त्या त्याले बोलणात, आमले सांग मंग तु कोण शे, ज्यासनी आमले धाडेल शे त्यासले सांगाकरता आमले उत्तर दे. तु स्वतःबद्दल काय म्हणस?”
23तो बोलणा यशया संदेष्टानी सांगेल प्रमाणे;
“मी जंगलमा एक घोषणा करनारानी वाणी शे;
प्रभुना मार्ग नीट करा!”
24ह्या संदेशवाहकसले परूशीसनी धाडेल व्हतं, 25मंग त्यासनी#१:२५ त्यासनी संदेशवाहकसनी त्याले ईचारं, “जर तु ख्रिस्त नही शे, जर तु एलिया नही शे अनं संदेष्टा बी नही शे, मंग बाप्तिस्मा का बर देस?”
26योहाननी उत्तर दिधं, “मी तर पाणीघाई बाप्तिस्मा देस, पण तुमनामा एकजण असा उभा शे की, ज्याले तुम्हीन वळखतस नही. 27हाऊ तोच शे जो मना नंतर येणार शे, त्याना पायमधला जोडानी दोरी सोडानी पण मनी लायकी नही.”
28ह्या गोष्टी यार्देन नदीना पलीकडे बेथानीमा जठे योहान बाप्तिस्मा दि राहिंता तठे घडण्यात.
देवना कोकरा
29दुसरा दिन योहाननी दखं की येशु त्यानाकडे ई राहिना, अनं बोलना, “हाऊ दखा, जगना पाप उचली लेणारा, देवना कोकरा!” 30हाऊच तो शे ज्यानाबद्दल मी सांगेल व्हतं, “मना नंतर एकजण ई राहिना, पण तो मनापेक्षा श्रेष्ठ शे, कारण मना जन्मना पहिले तो अस्तित्वमा व्हता.” 31मी त्याले वळखेल नव्हतं, पण मी याकरता पाणीघाई बाप्तिस्मा देत वनु की त्यानी इस्त्राएलवर प्रकट व्हवाले पाहिजे.
32योहाननी अशी साक्ष दिधी की; “मी आत्माले स्वर्गमाईन कबुतरना मायक उतरतांना दखं अनी तो त्यानावर थांबना हाई दखेल शे. 33अजुन पर्यंत मी त्याले वळखेल नव्हतं तो एक व्हता, पण त्या देवनी, ज्यानी माले पाणीघाई बाप्तिस्मा कराले धाडेल शे, त्यानी माले सांगेल व्हतं, ‘तु ज्या माणुसवर आत्मा उतरतांना अनं त्यानावर थांबेल दखशी; तोच पवित्र आत्माघाई बाप्तिस्मा करनारा शे.’ 34योहान बोलणा, मी दखेल शे,” अनं “मी तुमले साक्ष देस, हाऊ देवना पोऱ्या शे.”
येशुना पहिला शिष्य
35दुसरा दिन योहान त्याना दोन शिष्यससंगे उभा व्हता, 36जवय योहान येशुले जातांना दखीन बोलना, “दखा, हाऊ देवना कोकरा!” 37दोन शिष्य त्यानं हाई बोलनं ऐकीसन येशुना मांगे निंघी गयात. 38येशुने वळीन त्यासले मांगे येतांना दखं, अनं त्यासले ईचारं, “तुम्हीन काय शोधी राहिनात?” त्या बोलणात, रब्बी, म्हणजे “गुरजी तुम्हीन कोठे ऱ्हातस?”
39येशु त्यासले बोलना, “चला अनं दखा.” कारण जवळपास संध्याकायना चार वाजेल व्हतात. मंग त्यासनी त्यानासंगे जाईन दखं तो कोठे ऱ्हास, अनी त्या दिन त्यानासंगेच राहिनात.
40योहानना बोलणं ऐकीन त्यानामांगे त्या दोनजण गयात त्यासनामातीन एक अंद्रिया, जो शिमोन पेत्रना भाऊ हाऊ व्हता. 41त्याले त्याना स्वतःना भाऊ शिमोन पहिले भेटना, तवय तो त्याले बोलना, “आमले मसीहा,” म्हणजे “ख्रिस्त” सापडना. 42मंग तो त्याले येशुजोडे लई गया.
येशु त्याले दखीन बोलना, तु योहानना पोऱ्या शिमोन शे, पण तुले केफा म्हणजे पेत्र म्हणतीन त्याना अर्थ म्हणजे “खडक”
येशु फिलीप्प अनं नथनेलले बलावस
43पुढला दिन येशुनी गालीलमा जावाना निर्णय लिधा. तवय फिलीप्प त्याले भेटना; येशुनी त्याले सांगं, “मनामांगे ये!” 44फिलीप्प हाऊ अंद्रिया अनं पेत्रना गावना म्हणजे बेथसैदाना व्हता. 45फिलीप्पले नथनेल भेटावर तो त्याले बोलना, “ज्यानाबद्दल मोशेनी नियमशास्त्रमा लिखेल शे अनं संदेष्टानी बी त्यानाबद्दल लिखेल शे. तो म्हणजे योसेफना पोऱ्या, नासरेथ गावना येशु, आमले सापडेल शे.”
46नथनेल त्याले बोलना, “नासरेथमातीन काही चांगलं निंघु शकस का?” फिलीप्प बोलना, “चल अनं दख”
47येशु नथनेलले आपलाकडे येतांना दखीन, त्यानाबद्दल बोलना, “हाऊ खरा इस्त्राएली शे, यानामा कपट नही!”
48नथनेल त्याले बोलना, “तु माले कसं काय वळखस?” येशुनी उत्तर दिधं फिलीप्पनी तुले बलावाना पहिले, “तु अंजिरना झाडखाल उभा व्हता तवय मी तुले दखं.”
49नथनेल बोलना, “गुरजी, तुम्हीन देवना पोऱ्या शेतस! तुम्हीन इस्त्राएलना राजा शेतस!”
50येशु बोलना, “मी तुले सांगं की, मी तुले अंजिरना झाडखाल उभं राहेल दखं म्हणीन तु ईश्वास धरस का? तु यानापेक्षा बी मोठ्या गोष्टी दखशीन!” 51आखो तो त्यासले बोलना, “मी तुमले खरंखरं सांगस, की, तुम्हीन स्वर्गले उघडेल अनी देवना स्वर्गदूतसले चढतांना अनं मनुष्यना पोऱ्यावर म्हणजे मनावर उतरतांना दखशात.”

Currently Selected:

योहान 1: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in