YouVersion Logo
Search Icon

योहान वळख

वळख
योहाननी लिखेल हाई शुभवर्तमान नविन करारमातील चार शुभवर्तमानसपैकी एक शे, जे येशु ख्रिस्तना जिवननं वर्णन करस. मत्तय, मार्क, लूक अनी योहान ह्यासनाद्वारा ह्या पुस्तके येशु ख्रिस्तना मृत्युनंतर लिखात, ह्या पुस्तकसले “शुभवर्तमान” अस म्हणतस, ख्रिस्तना जन्मनंतर ९० वरीसना जवळपास हाई शुभवर्तमान येशुना शिष्य योहान ह्यानी लिख व्हतं. पुस्तकमा असं लिखेल नही की, योहान लेखक शे. तरी हाई पुस्तकनी लेखननी पध्दत १ ला, २ रा, ३ रा योहान ह्या पत्रसनामायकच शेतस. काही प्राचीन लेखकसले वाटस की योहान इफिस शहरमा ऱ्हाये म्हणीसन हाई पुस्तक त्यानी इफिस शहरमा लिखं व्हई.
योहान स्पष्टपणतीन सांगस की, हाई पुस्तकना हेतु लोकसले येशु ख्रिस्त जिवत देवना पोऱ्या योहान २०:३१ असं ईश्वास कराले मदत करस. यावर ईश्वास ठेवावर आपण त्याना नावमा जिवन जगु शकतस. हाई पुस्तक यहूदी अनी गैरयहूदी वाचनाराकरता लिखाई जायेल शे. योहानना शुभवर्तमानमा बाकीना तीन शुभवर्तमानसपेक्षा काही येगळा गोष्टी शेतस. येशुनी करेल चमत्कारवर त्यानी ध्यान केंद्रीत करेल शे अनी त्यानी दृष्टांताबद्ल बराच काही लिखी ठेवात नही. येशुना बाप्तिस्मा अनी अरण्यमाधली परिक्षा यासना सारख्या बाकिन्या महत्वाना घटना हाई शुभवर्तमानमा लिखेल नहीत.
रूपरेषा
१ योहान शुभवर्तमाननी सुरवात. १:१-१८
२. नंतर तो त्या काही चमत्कारबद्ल लिखस ज्या येशुनी करात. १:१९–१२:५०
३. नंतर तो येशुना जिवनना बराच काही घटनासना वर्णन करस जे त्याले मरण अनी पुनरूत्थाननाजोडे लई जास. १३:१–२०:३१
४. नंतर योहान शुभवर्तमान संपवस. ज्यानामा एक येळ येशु मरेलमाईन ऊठीसन लोकसना समोर वना. अनी पुस्तक लिखाना आपला उद्देशबद्दल लिखस. २१

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in