YouVersion Logo
Search Icon

1 करिंथकरांस 10

10
इस्राएलांच्या इतिहासावरून सूचना
1बंधू व भगिनींनो, आपल्या पूर्वजांनी मेघाखाली#10:1 गण 9:15-17 कूच केली. ते सर्वजण समुद्रातूनही पार गेले, याबद्दल आपण अज्ञानी असू नये 2मेघात आणि समुद्रात त्यांचा व मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला. 3-4त्या सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले. ते सर्वजण तेच आध्यात्मिक पाणी प्याले. त्यांच्याबरोबर चाललेल्या आत्मिक खडकातून ते पाणी प्याले आणि हा खडक तर ख्रिस्त होते. 5हे सर्व असूनही, परमेश्वर त्या बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हते; त्यामुळे त्यांची शरीरे अरण्यात विखुरली गेली.
6आता ज्या गोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या. 7त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: “लोक खाण्यापिण्यास खाली बसले नंतर नाचण्यासाठी व मजा करण्यासाठी उठले.”#10:7 निर्ग 32:6 8त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. 9आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले. 10आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्‍या दूताच्या हातून मरण पावले.
11आता या गोष्टी त्यांच्यासाठी उदाहरणादाखल झाल्या आणि ज्या आपणावर युगाचा शेवट येऊन ठेपला आहे, त्या आपल्याला इशारा म्हणून लिहून ठेवण्यात आल्या आहेत. 12म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्थिर उभे आहात, तर आपण पडू नये म्हणून खबरदारी घ्या. 13मनुष्यमात्रावर येणार्‍या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.
मूर्तीची मेजवानी आणि प्रभू भोजन
14यास्तव, माझ्या प्रिय मित्रांनो, मूर्तीपूजेपासून दूर पळा. 15मी बुद्धिमान लोकांबरोबर बोलतो; मी जे तुम्हाला सांगत आहे त्याची पारख तुम्हीच करा. 16उपकारस्तुतिचा प्याला ज्याबद्दल आपण उपकारस्तुती करतो ती ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सहभागिता नाही का? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराशी सहभागिता नाही का? 17कारण भाकर एक आहे, आम्ही पुष्कळ जण असलो तरी एक शरीर आहोत, आपण सर्वजण एकाच भाकरीचे सहभागी आहोत.
18इस्राएल लोकांचा विचार करा: वेदीवर अर्पण केलेले यज्ञबली जे खातात, ते वेदीशी सहभागी होतात की नाही? 19मूर्तींना अर्पिलेल्या अन्नास काही महत्व आहे किंवा मूर्तीला काही महत्व आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे काय? 20नाही! गैरयहूदीय लोक परमेश्वराला यज्ञ अर्पण करीत नसून भुतांना अर्पण करतात आणि भुतांशी तुम्ही सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. 21तुम्ही प्रभुचा प्याला आणि भुतांचा प्याला यातून एकाच वेळी पिऊ शकणार नाही. तसेच प्रभुचा मेज आणि भुतांचा मेज या दोन्हीमध्ये तुम्हाला एकाच वेळी सहभागी होता येत नाही. 22प्रभुला ईर्षेस पेटवावे असा प्रयत्न आपण करतो काय? आपण त्यांच्यापेक्षा शक्तिमान आहोत काय?
विश्वास ठेवणार्‍यांची स्वतंत्रता
23“मला प्रत्येक गोष्ट करण्याची मुभा आहे,” असे तुम्ही म्हणता तरी प्रत्येक गोष्ट हितकारक असतेच असे नाही, होय, “मला प्रत्येक गोष्ट करण्याची मुभा असली,” तरी सर्वगोष्टी वृद्धी करीत नाहीत. 24कोणी स्वतःचे हित पाहू नये, तर दुसर्‍याचेही पाहावे.
25बाजारात विकत मिळणारे मांस सद्विवेकबुद्धीने प्रश्न न विचारता खा. 26कारण, “पृथ्वी आणि तिच्यावरील सर्वकाही प्रभुचे आहे.”#10:26 स्तोत्र 24:1
27एखाद्या गैरविश्वासू व्यक्तीने तुम्हाला भोजनाचे आमंत्रण दिले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर तुमच्या पुढे जे वाढले असेल, ते सद्सद्विवेकबुद्धीने प्रश्न न विचारता खावे. 28पण समजा, “हे यज्ञात वाहिलेले आहे” असे तुम्हाला कोणी सांगितले, तर ज्याने ही सूचना दिली त्याच्यासाठी व सद्सद्विवेकबुद्धीसाठी तुम्ही ते खाऊ नये. 29अशा प्रसंगी तुम्ही त्या माणसाची सद्सद्विवेकबुद्धीने लक्षात घ्यावी, तुमची नव्हे. माझ्या स्वातंत्र्याचा न्याय दुसर्‍यांच्या सद्विवेकबुद्धीला अनुसरून का व्हावा? 30किंवा जर मी त्या भोजनामध्ये परमेश्वराचे आभार मानून सहभागी झालो, तर ज्यासाठी मी धन्यवाद दिला त्याबद्दल मला दोष का देण्यात यावा?
31तुम्ही जे खाता किंवा पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठीच करावे. 32यहूदी असोत की गैरयहूदी असोत किंवा परमेश्वराची मंडळी असो, कोणालाही तुमच्यामुळे अडखळण होऊ नये. 33मी सर्वप्रकारे सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतःचे भले पाहत नाही परंतु अनेकांचे भले पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in