स्तोत्रसंहिता 126
126
स्तोत्र 126
प्रवाशांचे आराधना गीत.
1जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले#126:1 किंवा जेव्हा इस्राएलला बंदिवासातून परत आणले,
तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.
2आमचे मुख हास्याने भरले होते
आणि किती हर्षगीते आम्ही गाईली!
तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली:
“पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”
3याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत,
आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.
4हे याहवेह, नेगेव नदीसारखी,
आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या#126:4 म्हणजे आमच्या बंदिवासांना परत आणा..
5जे अश्रूंनी पेरणी करतात,
ते आनंदाने कापणी करतील.
6जे रडत पेरणीसाठी
बी घेऊन जातात,
ते आपल्या पेंढ्या घेऊन,
आनंदाने हर्षगीते गात परत येतील.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 126: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.