स्तोत्रसंहिता 128
128
स्तोत्र 128
प्रवाशांचे आराधना गीत.
1जे याहवेहचे भय बाळगतात,
आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!
2तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील;
तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.
3तुझी पत्नी तुझ्या घरात
सफल द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती
जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
4होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांना
हाच आशीर्वाद असणार.
5याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो;
तुझे आयुष्यभर
तू यरुशलेमची समृद्धी बघशील.
6नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो—
इस्राएलास शांती लाभो.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 128: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.