YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 136

136
स्तोत्र 136
1याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत,
त्यांची करुणा सनातन आहे.
2देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा,
त्यांची करुणा सनातन आहे.
3प्रभूंच्या प्रभूचे आभार माना,
त्यांची करुणा सनातन आहे.
4केवळ तेच असे महान चमत्कार करू शकतात,
त्यांची करुणा सनातन आहे.
5ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली,
त्यांची करुणा सनातन आहे.
6त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला,
त्यांची करुणा सनातन आहे.
7त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या—
त्यांची करुणा सनातन आहे.
8दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य,
त्यांची करुणा सनातन आहे.
9रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले;
त्यांची करुणा सनातन आहे.
10त्यांनी इजिप्ती लोकांच्या प्रथम संतानास मारून टाकले,
त्यांची करुणा सनातन आहे.
11त्यांनी इस्राएलास त्यांच्या तावडीतून सोडविले,
त्यांची करुणा सनातन आहे.
12ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले,
त्यांची करुणा सनातन आहे.
13तांबडा समुद्र दुभागला,
त्यांची करुणा सनातन आहे.
14आणि इस्राएली लोकांना त्यामधून सुखरुपपणे पार नेले,
त्यांची करुणा सनातन आहे.
15परंतु फारोह आणि त्याचे सैन्य तांबड्या समुद्रात बुडवून टाकले;
त्यांची करुणा सनातन आहे.
16ज्यांनी आपल्या लोकांना अरण्यातून नेले,
त्यांची करुणा सनातन आहे.
17ज्यांनी प्रबळ राजांचा नायनाट केला,
त्यांची करुणा सनातन आहे.
18ज्यांनी प्रतापी राजांना ठार केले—
त्यांची करुणा सनातन आहे.
19ज्यांनी अमोरी लोकांचा राजा सीहोन याला,
त्यांची करुणा सनातन आहे.
20आणि बाशान प्रांताचा राजा ओग यालाही—
त्यांची करुणा सनातन आहे.
21आणि त्यांची भूमी इस्राएलला कायमचे वतन म्हणून,
त्यांची करुणा सनातन आहे.
22ज्यांनी आपला सेवक इस्राएल याला वारसा म्हणून दिली,
त्यांची करुणा सनातन आहे.
23ज्यांनी आमच्या पराकाष्ठेच्या दुबळेपणात आमची आठवण केली,
त्यांची करुणा सनातन आहे.
24आणि त्यांनी आम्हाला शत्रूपासून सोडविले,
त्यांची करुणा सनातन आहे.
25ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात,
त्यांची करुणा सनातन आहे.
26स्वर्गातील परमेश्वराचे उपकारस्मरण करा,
त्यांची करुणा सनातन आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in