लुका 2
2
बेथलहेम गावात येशूचा जन्म
(मत्तय 1:18-25)
1त्या दिवसात रोमी साम्राज्याचा सम्राट औगुस्तुसने आपल्या समस्त साम्राज्याच्या जणगणणेची राजाज्ञा काढली, कि सगळ्या रोमी साम्राज्याच्या लोकायचं नाव लिवल्या जावं. 2पयली नाव लिवाई #2:2 नाव लिवाई लोकं संख्येची जनगणना अन् नाव नोंदणी करणे त्यावाक्ती झाली, जवा क्विरीनियुस सिरिया प्रांताचा राज्यपाल होता. 3तवा सर्व लोकं आपले नाव लिवून द्याले आपल्या-आपल्या गावात गेले. जती त्यायचे बापदादे रायत होते. 4मंग योसेफ पण जो दाविद राजाच्या घराण्यातला व कुळातला होता, गालील प्रांतातल्या नासरत नगरातून यहुदीया प्रांतातल्या दाविदाच्या बेथलहेम गावात गेला.
5मरियाची योसेफ संग सोयरिक झाली होती, अन् त्यायनं बेथलहेम गावाकडे यात्रा केली. मरिया लवकरच लेकराला जन्म देणार होती. अन् ते दोघं आपले नाव लिव्याले चालले होते. 6-7जवा ते बेथलहेम गावात होते तवा त्यायच्या जवळ राह्याले काईच जागा नव्हती जती यात्री राहत होते, म्हणून ते एका गोठ्यात रायले; जवा तिचे गर्भवती पणाचे दिवस पूर्ण झाले, तती तिले पयला पोरगा झाला, अन् तिने त्या बाळाले कपड्यान गुंडाऊन गव्हानीत ठेवलं; जती लोकं जनावरायले चारा टाकत होते. कावून कि विश्रामालया मध्ये त्यायच्यासाठी जागा नव्हती.
मेंढपाळकायले देवदूताचा संदेश
8अन् त्याचं प्रदेशात काई मेंढपाळ होते, जे मैदानात राऊन रात्रीचा वाक्ती आपल्या कळपाचं राखण करत होते. 9तवा देवाचा एक देवदूत त्यायच्यापासी येऊन उभा रायला; अन् प्रभूचा तेज त्यायच्या अवताल-भवताल चमकला, तवा ते लय भेले. 10तवा देवदूतान त्यायले म्हतलं, “भेऊ नका; कावून की पाहा, मी तुमाले लय आनंदाची सुवार्था सांगतो; जे सगळ्या लोकायसाठी राईन.
11ते हे कि बेथलहेम गावात जो दाविद राजाच्या शहर हाय तती तुमच्यासाठी एक तारणारा जन्मला हाय, अन् तोच ख्रिस्त प्रभू हाय. 12अन् तुमच्यासाठी त्याची खूण हे हाय, कि एक बाळ कपड्यात गुंडाऊन गव्हानीत निजवलेलं पायसान.” 13तवा अचानक एका देवदूतायचा समुदाय स्वर्गातून खाली आला, अन् त्या देवदूता सोबत सहभागी होऊन देवाची स्तुती करतांना अन् हे म्हणतांना दिसून आला, 14“स्वर्गाच्या ठिकाणी देवाचा गौरव अन् पृथ्वीवर माणसाईत ज्यायच्यावर त्याचा आशीर्वाद झाला हाय, शांती असो.”
मेंढपाळकायचं बेथलहेम गावात जाणं
15जवा देवदूत त्यायच्या पासून स्वर्गात चालले गेले, तवा मेंढपाळायनं एकामेकायले म्हतलं, “चला, आपण बेथलहेम गावात जाऊन हे गोष्ट जे झाली हाय, अन् जे प्रभूने आपल्याले सुवार्था सांगतली हाय, पाऊ.” 16तवा त्यायनं लवकर जाऊन मरिया, योसेफ अन् गव्हानीत ठेवलेल्या बाळाले पायलं. 17त्यायनं त्या लहान बाळाच्या माय-बापाले सांगतल कि देवदूतायन त्या लहान बाळाच्या बाऱ्यात काय म्हतलं होतं, ते प्रगट केलं.
18अन् सगळ्या आयकणाऱ्यायनं ज्या गोष्टी मेंढपाळायनं त्यायले सांगतल्या होत्या, ते आयकून हापचक झाले. 19पण मरियानं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात ठेवून विचार करत रायली. 20अन् मेंढपाळायले जसं देवदूतायकडून सांगण्यात आलं होतं, तसचं आयकून अन् पाऊन देवाचा गौरव अन् स्तुती करून वापस गेले.
येशूचा खतना अन् त्याचं नाव ठेवण
21येशू बाळाच्या जन्माच्या आठ दिवसानंतर, त्याचा खतना कऱ्याचा वेळ आला, तवा त्याचं नाव येशू ठेवण्यात आलं, जे देवदूतान त्याचं पोटात येण्याच्या पयले ठेवलं होतं. 22-24मंग मोशेच्या नियमशास्त्रा प्रमाणे मरिया अन् योसेफाचे शुद्धीकरण कराचे दिवस भरल्यावर, ते त्याले यरुशलेमच्या देवळात समर्पण कऱ्याले घेऊन गेले. ते तती कबुतराचे दोन पिल्ले अन् दोन भोऱ्या बलिदान चढवायले गेले, हे देवाच्या नियमशास्त्राच पालन कऱ्यासाठी होतं. ते येशू सोबत यरुशलेम शहराच्या देवळात गेले कि त्याले प्रभूच्या समोर समर्पित करावं, कावून कि जसं प्रभूच्या नियमशास्त्रात लिवलेल हाय, “हरएक पयला लेकरू प्रभू साठी पवित्र होण्यासाठी वेगळा केला जावा.”
शिमोनची भविष्यवाणी
25त्यावाक्ती यरुशलेम शहरात शिमोन नावाचा एक माणूस होता, तो धर्मी अन् देवाचा भय मानणारा होता; अन् ख्रिस्ताचा येण्याचा लय वाट पायत होता, इस्राएल देशाच्या शांतीची वाट पायत होता अन् पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता. 26पवित्र आत्म्यान त्याले सांगतल, तू प्रभू ख्रिस्ताले पाह्याच्या पयले मरणार नाई. 27अन् तो पवित्र आत्म्याच्या शिकवल्या प्रमाण देवळात आला; अन् त्यावाक्ती मरिया अन् योसेफन मोशेच्या नियमशास्त्राच्या रीतीले पूर्ण कराच्या उद्देशान येशू बाळाले आणून प्रवेश केला.
28तवा त्यानं येशू बाळाले आपल्या गोदीत घेतलं अन् देवाचा धन्यवाद करून म्हतलं: 29“हे प्रभू, आता तू आपल्या दासाले आपल्या वचनाच्या अनुसार शांतीन जाऊ दे; 30-31कावून कि मी माह्या डोयान तुह्याल्या तारण करणाऱ्याले पायलं हाय. ज्याले तू सगळ्या लोकायले वाचवासाठी पाठवलं हाय. 32कि तो अन्यजातीच्या लोकायवर देवाले प्रगट करणारा एक ऊजीळ होईन, अन् तुह्याल्या आपल्या इस्राएली लोकायचा गौरव असो.”
33योसेफ व लेकराची माय मरिया त्याच्या बाऱ्यातल्या गोष्टी आयकून जे शिमोनानं म्हतल्या होत्या, आश्चर्य करत होते. 34तवा शिमोनानं त्यायले आशीर्वाद देऊन, त्याची माय मरियाले म्हतलं, “पाह्य तो इस्राएल देशात लय लोकायच्या विनाशाचं, अन् तारणाचं, अन् देवा कडून एक चिन्हांच्या रुपात पाठवलं हाय पण लय लोकं त्याचा विरोध करतीन. 35अन् एक भयंकर दुख एका तलवारी सारखं भोसकून पार जाईन, ह्याच्यान लय झणायचे मनातले विचार प्रगट होतीन.”
हन्ना कडून साक्ष
36आशेराच्या खानदानीतली हन्ना नावाची फनुएलाची पोरगी एक भविष्यवक्तीन होती: ते फार बुढी होती, ती लग्न झाल्यावर सात वर्ष आपल्या नवऱ्या पासी राऊ शकली होती. 37त्याच्या बाद ती चौऱ्याऐंशी वर्ष विधवा बनून होती: अन् देवळाले सोडत नव्हती, ते उपास अन् प्रार्थना करून रातदिवस देवाची आराधना करत जायची. 38अन् ते त्यावाक्ती तती येऊन देवाचा धन्यवाद कऱ्याले लागली, अन् जे यरुशलेम शहराच्या सुटकेसाठी ख्रिस्ताले पाठवासाठी देवाची वाट पायतं होते, त्यायच्या विषयी सांगून रायली होती.
योसेफ अन् मरीयेच घरी वापस येणं
39जवा योसेफ अन् मरिया मोशेच्या नियमशास्त्राच्या सगळे नियम पुरे केल्यावर ते गालील प्रांताच्या नासरत नगरात वापस चालले गेले. 40अन् येशू बाळ वाढत, अन् आत्म्यात मजबूत होतं गेला, अन् बुद्धीने परिपूर्ण होतं गेला अन् देवाची कृपा त्याच्यावर होता.
बालक येशू देवळात
41येशूचे माय-बाप दरवर्षी यहुदी लोकायचा फसह सणाले यरुशलेम शहरात जात असतं. 42जवा येशू बारा वर्षाचा झाला, तवा तो अन् त्याचे माय-बाप फसहच्या सणाच्या रीतीच्या अनुसार यरुशलेम शहरात गेले. 43मंग योसेफ अन् मरिया फसहचा सण संपवल्यावर वापस जायाले निगाले, पण पोरगा येशू यरुशलेम शहरात राऊन गेला; अन् हे त्याच्या माय-बापाले माईत नव्हत.
44ते हे समजून, कि तो त्यायच्या सोबतच्या दुसऱ्या यात्री लोकायसोबत अशीन, म्हणून एक दिवस चालून समोर निघून गेले: अन् त्याले आपल्या सोयऱ्यात अन् ओयखीवाल्या लोकात पाह्याले लागले. 45पण जवा तो त्यायले दिसला नाई, तवा शोधत-शोधत वापस यरुशलेम शहरात गेले. 46अन् तीन दिवसानं त्यायनं त्याले देवळातल्या आंगणात यहुदी शिक्षक लोकायच्या पासी बसून, त्यायचं आयकतात, अन् त्यायले प्रश्न विचारतान पायलं.
47अन् जे लोकं त्याचं बोलणं आयकतं होते, ते त्याच्या बुद्धीवर अन् त्याच्या उत्तरावरून हापचक झाले होते. 48तवा त्याचे माय-बाप त्याले पाऊन हापचक झाले, अन् त्याच्या मायनं त्याले म्हतलं, “हे पोरा तू आमच्या संग असा कावून वागला? पाह्य, तुह्यावाला बाप अन् मी कष्ट करून तुले पाऊन रायलो होतो.” 49तवा येशूनं त्यायले म्हतलं, “तुमी माह्याला शोध कावून करत होते? काय तुमाले मालूम नाई होतं, कि मले माह्याला देवबापाच्या घरात रायनं आवश्यक हाय.” 50पण ह्या गोष्टीचा अर्थ त्यायले नाई समजला. 51तवा तो त्यायच्या संग नासरत नगरात गेला, अन् त्यायच्या आज्ञाले मानत रायला, अन् त्याच्या मायनं त्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. 52अन् येशू बुद्धीनं व शरीरान अन् देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला.
Currently Selected:
लुका 2: VAHNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.