मरकुस 5
5
गरसेकरांच्या देशात येशू भुत लागलेल्या माणसाले बरं करते
(मत्तय 8:28-34; लूका 8:26-39)
1मंग येशू व त्याचे शिष्य समुद्राच्या तिकडच्या बाजुले गरसेकर लोकायच्या प्रांतात पोहचले. 2अन् जवा तो डोंग्यातून खाली उतरला, तवा लगेचं एक भुत लागलेला माणूस गुफेतून निघून त्याच्यापासी आला.
3तो गुफेत रायत होता अन् त्याले साखयदांडानं पण कोणी बांधू शकत नव्हत 4कावून की त्याले लयखेप साखयदांडानं बांधलं होतं तरी त्यानं साखयदांड तोडून टाकले होते, अन् साखयदांडाचे तुकडे-तुकडे केले होते, अन् त्याले कोणी पण वशात करू शकत नव्हत
5तो नेहमी रातदिवसा गुफेत अन् पहाडावर राऊन कल्ला करत होता, व गोट्यानं आपल्या आंगाले ठेचतं होता. 6जवा त्यानं येशूले दुरून पायलं तो धावत पयत त्याच्या जवळ आला, अन् येशूले नमन केलं. 7अन् जोऱ्यानं कल्ला करून म्हणलां, “हे येशू, सर्वशक्तिमान देवाचा पोरा तू माह्या कामात अर्थळे कायले आणत, मी तुले देवाची शपत देतो, मले तरास देऊ नको.”
8कावून की येशू त्याले म्हणत होता, “हे भुत आत्म्या, या माणसातून नीघ.” 9येशूनं त्याले विचारलं, तुह्यावालं नाव काय हाय? त्यानं त्याले उत्तर देलं, “माह्यावालं नाव सैन्य हाय, कावून की आमी आत मध्ये लयझण हाव.” 10आमाले या गनेसराच्या प्रांतातून बायर नका पाठऊ अशी तो येशूले आग्रह करून विनंती करत होता.
11तती पहाडाच्या बाजुले डुकरायचा एक मोठा कळप चरून रायला होता, 12तवा भुतायनं त्याले विनंती केली की, आमाले त्या डुकराईत पाठवून दे, की आमी त्यायच्या अंदर राहू. 13मंग येशूनं त्यायले परवानगी देली तवा ते भुत आत्मे त्याच्यातून निघून डूकराईच्या अंदर घुसले, अन् तो सुमारे दोन हजार डुकरायचा कळप होता, तो धावत समुन्द्राच्या काटावरून पयाला अन् पाण्यात डुबून मेला.
14तवा हे पावून डुकरं चारणारे पयाले व गावात जाऊन भोभाटा करून लोकायले या घटनेच्या बाऱ्यात सांगू लागले. 15जे झालं होतं ते पाह्याले लोकं येशू पासी आले. तवा लोकायन ज्याले भुत लागला होता तो शुद्धीवर येऊन व कपडे घालून बसलेला पायलं, अन् लोकं त्याले पावून भेले. 16अन् ज्यायनं हे पायलं की ज्याच्यात भुत होता, अन् त्या डुकरायच्या बाऱ्यात सगळं खरं त्यायले सांगतल.
17तवा लोकायन येशूले विनंती केली अन् मतलं आमच्या गावातून निघून जाय. 18मंग येशू जवा डोंग्यात बसु रायला होता, तवा ज्या माणसाले भुत लागला होता त्यानं त्याले विनंती करून मतलं मले पण तुह्यावाल्या सोबत राऊ दे. 19पण येशूनं त्याले मना केलं, अन् त्याले म्हतलं, “तू तुह्यावाल्या घरी जाऊन तुह्या लोकायले सांग, की प्रभूने तुह्यासाठी काय काम केलं व तुह्यावर कशी दया केली.” 20तवा तो जाऊन दिकापुलिस प्रांतात प्रचार करू लागला की येशूनं लय मोठे काम त्याच्यासाठी केले हे आयकून लोकायले नवल वाटले.
याईराची मेलेली पोरगी व रक्तस्रावानं बिमार बाई
(मत्तय 9:18-26; लूका 8:40-56)
21एकडाव वापस येशू डोंग्यात बसून गालील समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर वापस गेला तवा त्याच्यापासी लोकायची मोठी गर्दी जमा झाली, अन् तो समुद्राच्या काटावर होता. 22तवा याईर नावाचा एक धार्मिक सभास्थानाचा अधिकारी आला व तो येशूले पावून, त्याच्या समोर टोंगे टेकून, पाया लागला. 23त्यानं हे म्हणून येशूले विनंती केली, की माह्याली लायनी पोरगी मरून रायली हाय, तू येऊन तिच्यावर हात ठेव की ती चांगली झाली पायजे. 24मंग येशू त्याच्या संग जाऊन रायला होता, तवा लोकायची खूप मोठी गर्दी त्याच्या मांग चालत होती, इथपरेंत कि लोकं एकमेकायले धक्के देऊ लागले.
25अन् तती एक बाई होती, जिले बारा वर्षापासून रक्तस्रावाची बिमारी होती. 26अन् तिनं बऱ्याचं वैद्य (चिकित्सक) पासून लय हाल सोसून, आपल्या जवळचा सगळा पैसा गमावून टाकला होता, पण याचा तिले काहीच फायदा झाला नव्हता, याउलट ती अजून जास्त बिमार झाली होती. 27जवा तिने येशूच्या कामाबद्दल आयकलं ती त्या गर्दीत गेली अन् येशूच्या मांगून येऊन त्याच्या कपड्याले स्पर्श केला. 28कावून कि ती म्हणत होती जर मी त्याचे कपड्याले हात लावीन तर चांगली होऊन जाईन 29अन् तवाच तिचे रक्त वायन बंद झालं, अन् तिनं आपल्या शरीरात जाणलं, की मी ह्या बिमारी पासून बरी झाली हाय.
30येशूनं पट्टकनच आपल्या मनात जाणलं माह्यातून सामर्थ निगाली हाय, अन् त्यानं गर्दीत वडून मांग पायलं व म्हतलं माह्या कपड्याले कोण हात लावला. 31तवा शिष्यायनं येशूले म्हतलं, लोकं तुह्या भवताल गर्दी करून तुह्यावर पडून रायले हाय, हे तू पायत हाय तरी तू म्हणतो, मले कोण हात लावला? 32मंग येशूनं हे पायासाठी की कोण हे काम केलं, चारही दिशेले फिरून पायलं 33तवा त्या बाईले मालूम झालत की ती येशू च्यानं बरी झाली हाय. ती भेत-भेत समोर आली अन् येशूले टोंगे टेकून पाया लागली तिच्या बाबतीत जे काई घडलं ते तिनं खरं-खरं सांगतल. 34तवा येशूनं तिले म्हतलं, “हे पोरी तुह्यावाल्या विश्वासानं तू बरी झाली हाय, शांतीन जाय अन् तू या बिमारी पासून वाचवून राय.”
35जवा येशू हे म्हणतच होता, की तेवढ्यात धार्मिक सभास्थानाच्या अधिकाराच्या घरून काई माणसं येवून सभास्थानाच्या अधिकाऱ्याले सांगू लागले, तुह्याली पोरगी मेली हाय आता गुरुजीले तरास देऊ नको. 36जे काई ते माणसं बोलले त्याच्याइकडे येशूनं ध्यान न देता, धार्मिक सभास्थानाच्या अधिकाऱ्याले म्हतलं, “भेऊ नोको, फक्त माह्यावर विश्वास ठेव.” 37तवा येशूनं पतरस, याकोब अन् याकोबाचा भाऊ योहान फक्त यायलेच आपल्या सोबत घेतलं 38मंग ते धार्मिक सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आल्यावर त्यायनं लय लोकायले मोठ्या-मोठ्यानं रडतांन अन् बोंबलतांना पायलं,
39येशूनं अंदर जाऊन त्यायले म्हतलं, “तुमी कायले गडबड करू रायले अन् रडू रायले? ती पोरगी मेली नाई, पण झोपलेली हाय.” 40पण ते त्याले हासुन त्याची थट्टा करायले लागले, पण त्यानं त्या संगड्याले घराच्या बायर काडून देलं, अन् पोरीच मायबाप अन् आपल्या सोबतच्या तीन शिष्यायले घेऊन, जती पोरगी होती तती अंदर घरात गेला.
41अन् पोरीच्या हाताले पकडून आपल्या भाषेत मतलं “तलीथा कूम#5:41 तलीथा कूम हा शब्द अरामी भाषाचा हाय ज्याचा अर्थ हाय पोरी उठ ” याच्या अर्थ हा हाय “पोरी मी तुले सांगतो, उठ!” 42अन् ती पोरगी पटकन उठून चालू फिरू लागली. कावून की ते बारा वर्षाची होती, तवा लोकं हापचक झाले. 43मंग येशूनं पोरीच्या माय बापाले समजाऊन आज्ञा देऊन म्हतलं “अती जे झालं हे कोणाले पण सांगू नका. अन् म्हतलं इले काही जेव्याले द्या.”
Currently Selected:
मरकुस 5: VAHNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.