YouVersion Logo
Search Icon

मरकुस 6

6
नासरत गावात येशूचा अपमान
(मत्तय 13:53-58; लूका 4:16-30)
1मंग तो कफरनहूम शहराले सोडून आपल्या नासरत गावात आला, अन् त्याचे शिष्य त्याच्या मांग आले. 2मंग दुसरा दिवस आरामाचा दिवस होता, त्या दिवशी तो धार्मिक सभास्थानात, संदेश देऊ रायला, अन् लय लोकं त्याचं आयकून हापचक झाले, अन् म्हणाले, याले हे सगळे कुठून भेटलं, हे कोणत ज्ञान हाय जे त्याले देल्या गेलं हाय, अन् कसे याच्या हातून चमत्कार होतात?
3हा तर मरियाचा पोरगा हाय, अन् याकोब, योसे, यहुदा व शिमोन याचा भाऊ हायना? अन् याच्या बईनी अती आपल्या संग नाई रायत का? अशाप्रकारे ते लोकं त्याच्याच्यान दोषी ठरले 4तवा येशूनं त्यायले म्हतलं “देवाचा संदेश देणाऱ्याचा भविष्यवक्ता आपल्या नगरात अन् आपल्या लोकायला सोडून, सगळ्या इकडे, मानसन्मान होते.”
5अन् येशू त्यायच्या अविश्वासाच्याने तती ज्यादा चमत्काराचे काम करू शकला नाई, फक्त त्यानं काई बिमार लोकायवर हात ठेवून त्यायले बरं केलं. 6अन् येशू त्यायच्या अविश्वास पाऊन हापचक झाला, मंग तो देवाच्या वचनाची शिकवण देत गावा-गावात हिंडला.
बारा प्रेषितायले कामावर पाठवने
(मत्तय 10:5-15; लूका 9:1-6)
7मंग येशूनं आपल्या बारा शिष्यायले आपल्यापासी बलावलं अन् त्यायले भुत आत्मा काढ्याचा अधिकार देला मंग त्यानं त्यायले दोघं-दोघायची जोडी बनवून गावा-गावात पाठवलं. 8मंग येशूनं शिष्यायले म्हतलं, “आपल्या प्रवासासाठी फक्त एक काठी घ्या, पण आपल्या संग खायाले काईच घेऊ नका, अन् संग थयली पण नका घेऊ व आपल्या खिशात पैसे पण घेऊ नका.”
9आपल्या पायात चप्पल घालून घ्या पण जास्तीचे कपडे संग नेऊ नका. 10मंग येशूनं शिष्यायले म्हतलं, “की ज्या कोण्या घरी तुमाले आमंत्रण करीन, जोपर्यंत तुमी त्या गावात रायता, तोपर्यंत त्याचे पावने बनून राहा.” 11“अन् ज्या जाग्यावरचे लोकं तुमाले स्विकारतीन नाई अन् तुमचं आयकतीन नाई, तवा तुमी आपल्या पायाची माती ततीच झटका, की त्यायले दटावा की देवाच्या इकून भेटणाऱ्या दंडासाठी आता तेच सोता जबाबदार हायत.” 12मंग येशूच्या शिष्यायनं जाऊन प्रचार केला, कि आपल्या पापापासून पश्चाताप करा देवाकडे वडा. 13तवा शिष्यान भुतग्रस्तांना चांगले केले, अन् बऱ्याचं बिमारायले तेल लावून चांगलं केलं.
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा खून
(मत्तय 14:1-12; लूका 9:7-9)
14अन् हेरोद राजाने येशूच्या कामाच्या बाऱ्यात आयकलं, कावून की त्याचं नाव सगळ्या इकळे गाजलेलं होतं, अन् काई लोकं त्याच्या बाऱ्यात असे म्हणत, की हा “योहान बाप्तिस्मा देणारा अशाले पायजे जो मेलेल्यातून जिवंत झाला हाय, म्हणून तो असे चमत्काराचे काम करतो.” 15अन् अजून काई लोकायन म्हतलं, की, “हा एलिया भविष्यवक्ता देवाचा संदेश देणारा हाय, व अजून काईकायन म्हतलं, की तो एक भविष्यवक्ता किंवा भविष्यवक्त्याय मधून कोण्या एका सारखा हाय.”
16हेरोद राजानं हे आयकून म्हतलं, की ज्या योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचं मी मुंण्डक कापलं होतं तो जिवंत झाला हाय, हे पावून तो हापचक झाला. 17कावून की हेरोद राजानं आपला सक्का भाऊ फिलिप्पुस याची बायको हेरोदियास, इच्या संग लग्न केलं होतं, म्हणून हेरोद राजानं माणसायले पाठवलं अन् योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले धरून जेलात टाकून देलं होतं. 18कावून की योहान बाप्तिस्मा देणाऱ्यान हेरोद राजाले म्हतलं होतं की तू आपल्या भावाची बायको संग कायले लग्न केलं, हे नियमाच्या विरुध्य हाय.
19म्हणून हेरोद राजाची बायको हेरोदियास योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचा राग करत होती, तिले वाटे की त्याले मारून टाकावं पण तसं होऊ शकत नव्हत. 20हेरोद राजा योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले चांगला धर्मी अन् पवित्र माणूस हाय, तरी पण आपल्या भावाच्या बायकोला खुश करण्यासाठी योहानाला बंदी केले असं समजून त्याले जेलात चांगल्या परीनं ठेवत होता, अन् त्याची राखण करत होता, योहान बाप्तिस्मा देणारा त्याले जवा-जवा बोलत जाय, तवा त्याचं बोलणं आयकून लय भेत जाय, पण त्याचं बोलणे आनंदाने आयकून घेत जाय.
21अन् एक दिवस हेरोद राजानं आपल्या वाढदिवसाचं आमंत्रण आपल्या सोबतच्या प्रधानायले अन् सरदारायले अन् गालील प्रांतातल्या खास लोकायले देलं ह्या कार्यक्रमाचे कारण साधून हेरोदियाने हा मौका साधला कि योहानाला कसे मारावं. 22अन् जवा जेवण सुरु होते तवा हेरोदियासच्या पोरीनं स्वता अंदर जाऊन नाचली, अन् हेरोद राजाले अन् त्याचा बरोबर बसलेल्यायले नाचून खुश केलं, तवा राजा हेरोदन त्या पोरीले म्हणते तुले जे पायजे, ते मले तू मांग, मी तुले देतो. 23तवा त्यानं शपत खाल्ली की जर तू माह्याल्या अर्ध्या राज्याले मांगसीन, तरी ते मी तुले देयीन.
24तवा हेरोदची पोरगी बायर गेली, अन् आपल्या मायले विचारलं, मी काय मांगू? तवा तिच्या मायनं म्हतलं, “योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचं मुंण्डक पायजे.” 25तवा ती पटकन राजापासी आली, अन् तिनं विनंती केली, “माह्याली इच्छा हाय, की मले तुमी योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचं मुंण्डक ताटात आताच्या आता आणून द्या.” 26तवा राजा लय नाराज झाला, पण त्यानं देलेल्या शपतीच्यान अन् जेवणाले बसलेल्या लोकायच्यानं, त्याले मना करता आलं नाई.
27तवा राजाने पटकन आपल्या शिपायाले आज्ञा देली, जेलखान्यात जाय अन् योहानाच मुंण्डक कापून माह्यापासी आणं. 28तवा शिपाई जेलखान्यात गेला, व योहानाले मारून त्याचं मुंण्डक ताटात आणलं, अन् त्या पोरीले देलं, अन् पोरीनं माय पासी नेऊन देलं. 29हे आयकून योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे शिष्य आले, अन् त्याचं मेलेलं शरीर उचलून मसाणखाईत नेऊन दाबलं.
बारा प्रेषिताचे वापस येणे
(मत्तय 14:13-14; लूका 9:10)
30तवा प्रेषित येशू पासी येऊन एकत्र झाले, त्यायनं जे काई केलं अन् शिकवलं ते सगळं त्यायनं त्याले सांगतल. 31तवा येशूनं त्यायले म्हतलं, “चला आपण अशा जागी जाऊ जती आपण सुनसान जागी एकतेच राऊ शकू अन् काही वेळ आराम घेऊ शकू” कावून कि लय लोकं त्यायच्या जवळ येणे जाणे करत होते अन् त्यायले जेव्याले पण वेळ भेटत नव्हता. 32म्हणून ते डोंग्यात बसून तिकडच्या बाजुले सुनसान जागी गेले.
पाच हजार लोकायले जेवण
(मत्तय 14:15-21; लूका 9:11-17; योहान 6:1-14)
33बऱ्याचं लोकायन त्यायले जातान पायलं अन् लय लोकायन त्यायले ओयखलं, की ते कुकडे जात हाय, अन् तथल्या सगळ्या गावातून लोकं पैदल-पैदल पयत-पयत त्यायच्याई पयले तती पोचले. 34येशू डोंग्यातून उतरला तवा त्यानं लोकायची मोठी गर्दी पायली, येशूले त्यायच्यावर मया आली, ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, तवा येशू त्यायले देवाच्या वचनातून शिकवू लागला. 35त्याचं दिवशी जवा दिवस डुबून रायला होता, तवा त्याचे शिष्य त्याच्यापासी आले, अन् म्हतलं हे सुनसान जागा हाय अन् दिवस लय डुबला हाय.
36त्या लोकायले जाऊ दे, की ते आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जाऊन, आपआपल्या साठी खायाले, काई विकत घेतील. 37तवा येशूनं शिष्यायले म्हतलं तुमीच त्यायले जेव्याले द्या, तवा त्यायनं त्याले म्हतलं, आमी दोनशे दिनारच्या भाकरी विकत आणल्या तरी त्यायले खाऊ घालू शकत नाई. 38येशूनं त्यायले विचारलं जाऊन पा तुमच्यापासी कितीक भाकरी हाय, ते पायल्यावर शिष्यायनं म्हतलं पाच भाकरी अन् दोन मासोया हात.
39तवा येशूनं शिष्यायले म्हतलं, की तुमी त्यायले हिरव्या गवतावर लाईन-लाईन न, बशाले सांगा. 40व ते शंभर-शंभर, पन्नास-पन्नासच्या पंगती पंगतीनं बसले. 41मंग येशूनं त्या पाच भाकरी अन् दोन मासोया घेऊन वरते स्वर्गाकडे पावून देवाले धन्यवाद देला, अन् भाकरी मोडल्या व त्या लोकायले वाढ्याले आपल्या शिष्यापासी देल्या, ते दोन मासोया पण सगळ्यायले वाटून देल्या. 42अन् सगळे लोकं खाऊन तृप्त झाले. 43अन् त्यायनं उरलेल्या भाकऱ्यायचे, बारा टोपल्यात भरून उचलल्या अन् काई मासोया पण नेल्या. 44ज्यायनं भाकरी खाल्या ते पाच हजार माणसं होते.
येशू पाण्यावर चालते
(मत्तय 14:22-33; योहान 6:15-21)
45तवा येशूनं लवकर आपल्या शिष्यायले म्हतलं, की “तुमी डोंग्यात बसून समुद्राच्या तिकडच्या बाजुले बेथसैदा शहराले जा, तोपरेंत मी लोकायये निरोप देतो.” 46मंग येशू लोकायले निरोप देऊन प्रार्थना कराले पहाडावर गेला 47अन् मंग रात्र झाली, तवा शिष्यांचा डोंगा समुद्राच्या मधात होता, अन् येशू एकटाचं जमिनीवर होता. 48जवा येशूनं शिष्यायले पायलं, की त्यायले डोंग्याले व्हल्ली मारन कठीण होतं हाय, कावून की वारावायद्न त्यायच्या विरुध्य दिशेने चालत होता, तो रात्रीच्या चवथ्या पहरी म्हणजे सकाळ होयाच्या काई वेळा पयले, येशू समुद्रारावर चालत त्यायच्यापासी आला, अन् तो शिष्यायच्या समोर जायाचा इच्छेत होता.
49जवा शिष्यायनं येशूले समुद्रारावर चालतांना पायले, तवा त्यायले असे वाटे की हा भुत हाय, तवा ते कल्ला करू लागले. 50कावून की सगळे त्याले पाऊन भेले होते, तवा येशू त्यायच्या संग बोलू लागला, तवा येशूने त्यायले म्हतलं “भेऊ नका हिम्मत ठेवा मी हावो येशू.” 51तवा तो त्यायच्यापासी डोंग्यात चढला, तवा वारा थांबला, तवा ते एकदमचं हापचक झाले. 52अन् येशूनं जे पाच हजार लोकायले भाकरी चारल्या होत्या ती गोष्ट त्यायले समजली नव्हती, कावून की त्यायचं मन कठोर झालं होतं.
येशू गनेसरेत अती रोग्याइले बरं करते
(मत्तय 14:34-36)
53मंग ते गालील समुद्राच्या पलीकडे उतरून गनेसरेत नगरात पोचले, अन् डोंगा घाटावर ठेवला. 54ज्यावाक्ती ते, डोंग्यातून उतरले, तवा लोकायन त्याले वयखले. 55अन् ते आसपासच्या बऱ्याचं नगरात चवभवंताल पयत गेले, अन् बिमार लोकायले बाजीवर टाकून, जती येशू होता, तती ते त्यायले नेवू लागले. 56अन् येशू जवा पण खेड्यापाड्यात, नगरात, किंवा गल्लीतून कुठेही जात होता, तवा लोकं बिमार लोकायले आणून बजाराच्या जागेवर ठेवत होते, अन् त्याले विनंती करत होते, आमाला तुह्या कपड्याले हात लावू दे अन् जे हात लावत होते ते सगळे चांगली होऊन जात

Currently Selected:

मरकुस 6: VAHNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in