YouVersion Logo
Search Icon

मरकुस 9

9
येशूचे रुपांतर
(मत्तय 17:1-13; लूका 9:18-36)
1मंग येशूनं लोकायले अन् शिष्यायले म्हतलं, “मी तुमाले खरंखरं सांगतो कि अती उभे असणाऱ्या पैकी, काई जन असे हायत, की देवाचं राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसे पर्यंत ते मरणार नाई.” 2मंग सहा दिवसाच्या नंतर येशूनं पतरस, याकोब अन् योहान यायले आपल्या संग घेऊन एका उंच पहाडावर एकांतात नेलं, अन् तती त्यायच्या देखत येशूचे रुपांतर झाले 3तवा त्याचे कपडे यवळे चकचक पांढरे झाले की, पृथ्वीवरचा कोणताही धोबी यवळे पांढरे करू शकणार नाई. 4अन् त्यायले मोशे संग एलिया भविष्यवक्ता दिसला अन् ते येशू संग बोलतं होते.
5तवा पतरसन येशूले म्हतलं गुरुजी, आमी अती हावो हे चांगलं हाय, तरी आमी तीन मंडप बनवतो, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी, एक एलिया भविष्यवक्ता साठी. 6कावून कि तो अन् त्याचे शिष्य भेले होते म्हणून त्यायले काय बोलावं हे त्यायले सुचतं नाई जाय. 7तवा एक ढग आला, व त्याने त्याच्यावर छाया केली अन् त्या ढगातून असा आवाज आला, हा माह्या आवडता पोरगा हाय, याचे तुमी आयका 8त्यायनं एकदमचं चवभवंताल पायलं तवा येशू शिवाय त्यायले आपल्यापासी अजून कोणीचं दिसले नाई. 9मंग येशू अन् त्याचे तीन शिष्य पहाडावरून उतरता-उतरता येशूनं त्यायले आज्ञा देवून म्हतलं की, “तुमी जे पायलं हाय, ते माणसाचा पोरगा म्हणजे मी, मरणातून वापस जिवंत होय परेंत तुमी ते कोणाले सांगू नका.”
10येशूच बोलणं मनात ठेवून, मरणातून वापस जिवंत होणं, म्हणजे काय हाय? ह्याच्या बद्दल त्यायनं एकामेका सोबत गोष्टी केल्या. 11मंग शिष्यायनं येशूले विचारलं, मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक कावून मानतात कि पयल्यानं एलिया भविष्यवक्त्याचं येणं पक्कं हाय? 12येशूनं त्यायले उत्तर देलं, “हे खरं हाय, एलिया भविष्यवक्ता पयल्यानं येऊन सगळं काई सुधरीन, पण माणसाचा पोरगा एवढे दुख सोसावी अन् तुच्छ मानला जवा, असं त्याच्या बाबद लिवलेल हाय. 13पण मी तुमाले म्हणतो एलिया भविष्यवक्ता आलेला हाय, अन् त्याच्या बद्दल लिवलेल्या प्रमाणे त्यायले वाटलं तसं त्याच्या सोबत केलं.”
भुत लागलेल्या पोराला बरं करणे
(मत्तय 17:14-21; लूका 9:37-43)
14मंग येशू अन् त्याचे तिनं शिष्य दुसऱ्या शिष्यापासी वापस आले, तवा त्यायच्या अवताल भवताल लोकायची मोठी गर्दी होती, अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक त्यायच्या संग बोलचाल करू रायले होते, हे त्याले दिसलं. 15जसं सगळ्या लोकायन येशूले पायलं सगळे लोकं हापचक झाले, अन् त्याच्याइकडे पयत जावून त्यायनं त्याले नमस्कार केला. 16येशूनं त्या “नियमशास्त्राचे शिक्षक अन् आपले स्वताचे शिष्य यायले विचारलं तुमचा कायचा वादविवाद सुरु हाय?”
17तवा गर्दीतून एकाने म्हतलं, “हे गुरुजी येशू मी माह्या पोराले तुमच्यापासी घेवून आलो होतो ज्याले भुत आत्मा लागली हाय, ज्याच्याच्यान तो बोलू शकत नाई. 18ते भुत आत्मा जती-जती त्याले पकडतो तती-तती तो त्याले खाली आपटते, मंग हा तोंडाले फेस आणते, कडकडून दांत खाते, व बेहोस पडते त्याले काढावं म्हणून आपल्या शिष्याले मी सांगतल, पण त्यायले तो काढता आला नाई.” 19याच्यावर येशूनं शिष्यायले म्हतलं, “हे अविश्वासी लोकोहो मी कुठपरेंत तुमच्या संग रायणार, कुठपरेंत तुमाले वागवणार, त्याले माह्यापासी आणा.”
20त्यायनं भुत आत्मा लागलेल्या पोराले त्याच्यापासी आणलं, तवा त्या भुत आत्माने येशूले पायल्यावर पोराले पीडून टाकलं, अन् तो जमिनीवर पडला तोंडाले फेस आणून लोटांगण घेऊ लागला. 21येशूनं पोराच्या बापाले विचारलं, याले असं कितीक दिवसापासून होऊन रायलं हाय, त्यानं येशूले म्हतलं लहान पणापासून. 22त्यानं म्हतलं भुत आत्मा याले माऱ्याले कितीक खेप इसत्यातं अन् पाण्यात टाकलं, पण तुमच्या हातून होतं असेल तर, आमच्यावर दया करा आमाले मदत करा 23येशू त्याले म्हतलं, “तुमाले शंका नाई झाला पायजे की, मी असं करू शकतो. जर कोणता माणूस माह्यावर विश्वास करण्याऱ्या साठी सगळे काई शक्य हाय.”
24एकदमचं पोराचा बापानं मोठ्यानं म्हतलं, हे प्रभू माह्या विश्वास हाय माह्या अविश्वासाले दूर कर. 25तवा लय लोकं पयत येऊन, झुंबड करत हाय, हे पाऊन येशूनं भुत आत्म्याले दटावून म्हतलं, अरे भुत आत्म्या, मी तुले आज्ञा देतो, याच्यातून निंग व डबल कधी याच्यात येवू नको. 26तवा तो आत्मा कल्ला करून व त्याले लय पीळून निगाला, अन् तो पोरगा मेल्यासारखा झाला, अन् लय लोकं म्हणू लागले कि हा मेला. 27पण येशूनं त्याले हात धरून उठवलं व तो उभा रायला. 28मंग येशू अन् शिष्य घरी वापस गेल्यावर त्याच्या शिष्यायनं त्याले एकट्यात विचारलं आमाले तो भुत आत्मा कावून त्याच्यातून बायर काढता आला नाई? 29येशूनं त्यायले म्हतलं, “हे भुत आत्मा प्रार्थना अन् उपासा शिवाय दुसऱ्या कायनचं निंगत नाई.”
आपल्या मरणाच्या विषयात येशूची भविष्यवाणी
(मत्तय 17:22-23; लूका 9:43-45)
30मंग येशू अन् त्याच्या शिष्यायनं त्या जागेले सोडून गालील प्रांतामधून चालले होते, अन् हे कोणाले मालूम नाई व्हावं म्हणून अशी त्याची इच्छा होती. 31कावून कि येशू आपल्या शिष्यायले मोकळ्या पणान शिकवत हो#9:31 ता, तो त्यायले असं सांगत होता की “माणसाचा पोरगा माणसाच्या हाती देला जाणार हाय, ते त्याले जीवानं मारतीन अन् मारल्या गेल्यावर तो तिसऱ्या दिवशी वापस जिवंत होईन.” 32पण शिष्यायले या बोलण्याचा अर्थ समजला नाई, अन् ते येशूले विचाऱ्याले भेत होते.
सर्वात मोठं कोण?
(मत्तय 18:1-5; लूका 9:46-48)
33परत येशू व त्याचे शिष्य कफरनहूम शहरात आपल्या घरी आले, अन् जवा ते घरात होते येशूनं त्यायले विचारलं, “तुमी रस्तानं कायच्या गोष्टी करत होते?” 34ते चूपच्याप रायले, कावून कि सर्वात मोठा कोण? ह्याच्या विषयी त्यायच्या रस्तानं गोष्टी सुरु होत्या.
35येशू बसला अन् त्यानं आपल्या बारा शिष्यायले बलावून म्हतलं, जर कोणाले मोठं व्हायचं अशीन, तर त्याले सगळ्यात लहान व्हावं लागेल, अन् सगळ्यायचा सेवक व्हावे लागीन. 36तवा येशूनं एका लेकराले आपल्यापासी उभं केलं व सांगतल, त्याने त्या लेकराले कवठ्यात घेऊन आपल्या शिष्यायले म्हतलं.
37“जो कोणी ह्या सारख्या एका लेकराचे स्वागत करतो अन् त्याची मदत करतो, कावून की ते माह्यावर प्रेम करतात, हे माह्यावालं स्वागत केल्या सारखं हाय, अन् जो कोणी माह्यावालं स्वागत करते तो फक्त माह्याचं नाई पण ज्याने मले पाठवले त्या देवाचे पण स्वागत करते.”
जो आपल्या प्रतिकूल नाई तो आपला अनुकूल
(लूका 9:49-50)
38योहानान येशूला म्हतलं, गुरुजी आमी एका माणसाले तुह्या नावाचा सामर्थ्याने उपयोग करून भुत काढताने पायलं, तवा आमी त्याले मना केले, कावून की तो आपला अनुयायी नव्हता. 39येशूनं म्हतलं, त्याले मना करू नका, कावून की तो माह्या नावान चमत्काराचे काम करू रायला, माह्याली निंदा करेल असं कोण नाई. 40कावून की जो माणूस आपला विरोध नाई करत तर तो आपल्या सोबत सहमत हाय. 41“तुमी ख्रिस्ताचे म्हणून तुमाले, जो कोणी गिलास भर पाणी पियाले देईन, मी तुमाले खरंखरं सांगतो त्याचं प्रतिफळ त्याले भेटन.”
कोणासाठी अरथडा होणं
(मत्तय 18:6-9; लूका 17:1-2)
42“जर कोणी या लायण्यातुन लायना जो माह्यावर विश्वास करतो, कोणाच्या विश्वासाचा ठोकर खायाचे कारण बनते, तर त्याच्यासाठी चांगलं हाय, कि त्याच्या गयात जात्याचा पाट लटकून समुन्द्रात टाकून द्या.” 43“तुह्यावाला हात तुले पाप कऱ्याले मजबूर करत अशीन तर त्याले कापून टाक, तुले दोन हात असून जर नरकात म्हणजे न ईजलेल्या इस्तवात जात असतीन तर तुले दुन्डा होऊन जीवनात जाणं चांगलं हाय.” 44“कावून की नरकात त्यायचा कीडा नाई मरत, जती आग ईजत नाई. 45जर तुह्याला पाय तुले पाप कऱ्याले मजबूर करत अशीन, तर त्याले कापून टाक, तर दोन पाय असून नरकात म्हणजे न ईजलेल्या इस्तवात गेल्या पेक्षा लंगडा होऊन जीवनात जाणं चांगलं हाय.
46कावून की नरकात त्यायचा कीडा नाई मरत, जती आग हिजत नाई. 47अन् जर तुह्यावाला डोया तुले पाप कऱ्याले मजबूर करत अशीन, तर तो काढून टाक, कावून कि फुटका होऊन देवाच्या राज्यात जाणे तुह्यासाठी चांगलं हाय, कि दोन डोये असून नरकात न ईजलेल्या इस्तवात टाकला जाईन. 48कावून की नरकात त्यायचा कीडा नाई मरत, जती आग ईजत नाई. 49कावून कि हरएक आगीच्या व्दारे शुद्ध होतीन, तसचं बलिदान मिठा सारखे शुद्ध केले जाईन. 50मीठ चांगलं हाय पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याले चवं कायनं आणावी? तुमी आपल्यात मीठाचे गुण असू द्या, अन् एकमेका संग शांतीन रा.”

Currently Selected:

मरकुस 9: VAHNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in