1
मत्तय 28:19-20
वऱ्हाडी नवा करार
म्हणून तुमी जा, अन् सगळ्या देशातल्या लोकायले शिष्य बनवा, अन् त्यायले बाप, पोरगा, अन् पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. अन् त्यायले सगळ्या गोष्टी जे मी तुमाले आज्ञा देल्या हाय, ते मानाले शिकवा, अन् पाहा मी जगाच्या शेवटपर्यंत नेहमी तुमच्या संग हाय.”
Compara
Explorar मत्तय 28:19-20
2
मत्तय 28:18
तवा येशूनं शिष्यायपासी येऊन म्हतलं, “स्वर्गाचा अन् पृथ्वीचा सगळा अधिकार मले देला हाय.
Explorar मत्तय 28:18
3
मत्तय 28:5-6
तवा देवदूताने त्या बायायले म्हतलं, “भेऊ नका, मले मालूम हाय कि तुमी येशूले जो वधस्तंभावर चढवल्या गेला होता, त्याले पायत हा. तो अती नाई हाय, पण तो आपल्या म्हणल्या प्रमाणे जिवंत झाला हाय, या, व हे जागा पाहा, जतीसा प्रभूले ठेवलं होतं.
Explorar मत्तय 28:5-6
4
मत्तय 28:10
तवा येशूने त्यायले म्हतलं, “भेऊ नका माह्याल्या शिष्यायले जाऊन सांगा, कि गालील प्रांतात चालले जा ततीसा तुमी मले पायसान.”
Explorar मत्तय 28:10
5
मत्तय 28:12-15
तवा त्यायनं यहुदी पुढाऱ्याय संग एकजूट होऊन सल्ला केला अन् लाचं म्हणून लय पैसे देले. हे सांगासाठी कि रात्री जवा आमी राखण कऱ्याच्या वाक्ती झोपून रायलो होतो, तवा येशूच्या शिष्यांनी येऊन त्याचं शरीर चोरून घेऊन गेले. अन् जर हे गोष्ट राज्यपालापासी पोहचली तर आमी त्याले समजावून देऊ, अन् तुमाले जोखीम पासून वाचवून घेऊ. मंग त्यायन पैसे घेऊन जसं शिकवलं गेलं होतं तसचं केलं, अन् हे गोष्ट तवा पासून तर आजपर्यंत यहुदी लोकात चालू हाय.
Explorar मत्तय 28:12-15
Inici
La Bíblia
Plans
Vídeos