लूक 4:9-12
लूक 4:9-12 MRCV
मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,” कारण असे लिहिले आहे: “ ‘तुझे रक्षण व्हावे म्हणून तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल; तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.’ ” येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”