लूक 11
11
शिष्यस्ले प्रार्थना कराले शिकाळन
(मत्तय 6:9-13)
1एक दिन येशु कोणत्या तरी जागा वर प्रार्थना करी ऱ्हायंता, आणि जव तो करी लीयेल होता, त तेना शिष्यस मधून एक नि तेले सांग, “गुरुजी, जस योहान बाप्तिस्मा देणार नि आपला शिष्यस्ले प्रार्थना कराले शिकाळ, तसाच आमले तू बी शिकाळी दे.” 2आणि तेनी तेस्ले सांग, “जव तुमी प्रार्थना करश्यात, त ह्या प्रकारे करा,
ओ आमना स्वर्ग मधला बाप,
तुना पवित्र नाव ना आदर करामा येवो.
तुना राज्य येवो.
3आम्हनी दिन भर नि भाकर आज आमले देत जा.
4आणि आमना पापस्ले माफ कर, कारण कि आमी बी आपला सर्वा अपराधीस्ले माफ करतस,
आणि आमले परीक्षा मा नको लयजो. पण सैतान पासून आमले वाचाळ.”
प्रार्थना ना संबंध मा येशु नि शिक्षा
(मत्तय 7:7-11)
5येशु नि तेस्ले सांग, समजी ल्या कि तुमना मा कोणी आधी रात ले आपला कोणी मित्र जोळे जाईसन सांगो, मित्र, मले तीन भाकरी उसनवार दे, 6कारण कि मना एक मित्र प्रवास करीसन मना जोळे पोहोचेल शे, आणि तेले खावाळा साठे मना जोळे काहीच नई शे. 7आणि तुना मित्र मधून उत्तर देवो, कि मले त्रास नको देवू, आते त मनी आपला दार बंद करी लीयेल शे, आणि मना पोर मना संगे बिछाना वर शेतस, एनासाठे मी उठीसन तुले देवू नई सकत. 8मी तुमले सांगस, कदी तुना मित्र हुईसन बी तुले उठीसन नई देत, तरी बी तुले लाज नई शे मांगा मुळे तुले जीतली गरज शे, तितल उठीसन दिन. 9पण मी तुमले सांगस, कि “मांगा त तुमले देवामा ईन, झामला त तुमले भेटीन, वाजाळा त तुमना साठे उघाळामा ईन. 10कारण कि जो कोणी मांगस, तेले भेटस, आणि जो झामलस, तेले सापडस, आणि जो ठोकस, तेना साठे उघडामा ईन. 11तुमना मधून कोणी बी बाप, आपला पोऱ्या ले दघळ नई देवाव जर तो तुमना पासून भाकार मांगस त. ह्याच प्रमाणे, कोणी बी माणुस आपला पोऱ्या ले मासा मांगावर विषारी साप नई देवाव. 12कदी अंडा मागस त तेले विन्चू देस? 13त तुमी वाईट हुईसन, आपला पोरस्ले चांगल्या वस्तू देवाना देखतस, त तुमना स्वर्ग मधला बाप आपला मांगनारस्ले पवित्र आत्मा काब नई देवाव?”
येशु आणि बालजीबुल
(मत्तय 12:22-30; मार्क 3:20-27)
14नंतर तेनी एक मुक्की दुष्ट आत्मा ले काळ, आणि जव येशु नि दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून भायेर काळी टाक, त तो मुक्का बोलाले लागणा, आणि लोकस्नी आश्चर्य कर. 15पण तेस्ना मधून कितलाक नि सांग, “हवू त दुष्ट आत्मास्ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.” 16दुसरास्नी तेनी परीक्षा लेवा साठे तेना कळून स्वर्ग मधून एक चमत्कारी चिन्ह मांगा. 17पण तेनी, तेस्ना मन ना गोष्टीस्ले समजीसन, तेस्ले सांग, जर एक राज्य ना लोक आपस मा भांडतस त्या नाश हुई जातीन. आणि ज्या परिवार ना लोक एक दुसरा ना विरुद्ध मा वाटायेल शेतस, त तो परिवार एकत्र नई राहू सकाव. 18आणि कदी सैतान आपलाच विरोधी हुई जास, त तेना राज्य कसा बनेल ऱ्हाईन? कारण कि तुमी मना बारामा त सांगतस, कि हवू त सैतान ना मदत कण दुष्ट आत्मा काळस. 19चांगल, कदी मी सैतान नि मदत कण दुष्ट आत्मास्ले काळस, त तुमना वंश कोणी मदत कण काळतस? एनासाठे तुमनाच वंश तुमना न्याय करतीन. 20पण कदी मी परमेश्वर ना सामर्थ कण दुष्ट आत्मास्ले काळस त परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे. 21जव ताखतवर माणुस हत्यार लिसन आपला घर नि राखोई करस, त तेनी संपत्ती वाचेल ऱ्हास. 22पण तेना तून जास्त कोणी आखो ताखतवर माणुस हल्ला करीसन तेले जिकी लेस, त तेना त्या हत्यार जेस्ना वर तेना विश्वास होता, हिसकाई लेस आणि तेनी संपत्ती लुटीसन वाटी देस. 23जो मना संगे नई, तो मना विरोध मा शे, आणि जो मना संगे नई गोया करस, तो पसरावस.
दुष्ट आत्मा ले घर ना शोध
(मत्तय 12:43-45)
24“जव दुष्ट आत्मा माणुस ना शरीर मधून निघी जास त सुक्की जागा मा आराम झामलाले फिरस, आणि सापळत नई. त ती स्वता ले सांगस, कि ज्या व्यक्ती मधून मी एयेल शे, जठून मी निघेल होती, परती जासू, 25आणि जाईसन सूना देखीसन, त्या व्यक्ती ना जीवन ले घर ना सारखी देखस, जेले स्वच्छ करामा एयेल शे. 26तव ती दुष्ट आत्मा जाईसन आपला तून जास्त वाईट सात दुष्ट आत्मास्ले आपला संगे लई येस, आणि त्या व्यक्ती मा घुशिसन तठे ऱ्हास, आणि त्या माणुस्नी मांगली स्थिती पयले तून बी जास्त खराब हुई जास.”
धन्य कोण?
27जव येशु ह्या गोष्टी सांगीच ऱ्हायंता, त गर्दी मधून कोणी बाई नि जोरमा सांग, धन्य शे ती बाई जेनी तुले जन्म दिधा आणि तुले दुध पाजा. 28तेनी सांग, हा, हय खराज शे, पण धन्य त्या शेतस, ज्या परमेश्वर ना वचन आयकतस आणि पालन करतस.
स्वर्गीय चिन्ह नि मांग
(मत्तय 12:38-42)
29जव मोठी गर्दी एकत्र होत जात होती, त तो सांगाले लागणा, कि ह्या पीडी ना वाईट आणि व्यभिचार लोक, चमत्कारी चिन्ह झामलतस पण योना भविष्यवक्ता ना चिन्हले सोळीसन आजून दुसरा कोणताही चमत्कारी चिन्ह तुमले नई भेटाव. 30जसा योना, निनवे ना लोकस साठे चिन्ह ठरणा, तसाच मी माणुस ना पोऱ्या बी ह्या युग ना लोकस साठे ठरसू. 31दक्षिण दिशा नि राणी न्याय ना दिन ह्या युग ना लोकस संगे उठीसन, तेस्ले दोषी ठराईन, कारण कि ती शलमोन ना ज्ञान आयकाले गैरा दूर तून उणी, आणि देखा आठे तो शे, जो शलमोन तून बी मोठा शे. 32निनवे ना लोक न्याय ना दिन ह्या युग ना लोकस्ना संगे उठीसन, तेस्ले दोषी ठरावतीन, कारण कि तेस्नी योना ना प्रचार आयकीसन मन फिरावा, आणि आठे तो शे, जो योना तून बी मोठा शे.
शरीर ना दिवा
(मत्तय 5:15; 6:22,23)
33“कोणी बी एक दिवाले पेटाळीसन कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवामा एस कि मधमा येनारस्ले उजाया भेटो. 34तुना डोया शरीर साठे एक दिवा ना सारखा शेतस, एनासाठे कदी तुना डोया चांगला शेतस, तव तुना सर्वा शरीर उजळ हुईन. पण जव त्या वाईट शेतस, त तुना शरीर बी अंधकारमय शे. 35एनासाठे सावधान ऱ्हायज्यात, कि जो उजाया तुमना मा शे, तो अंधकारमय नई जावो. 36एनासाठे कदी तुना पुरा शरीर उजाया शे, आणि तेना कोणता बी भाग आंधारा मा नई शे, तव पुरण-पुरा शरीर अस उजाय हुईन, जसा एक दिवा आपली चमक कण तुले उजाया देस.”
शास्त्रीस आणि परुशीस्ले फटकार
(मत्तय 23:1-36; मार्क 12:38-40)
37जव तो गोष्टी करी ऱ्हायंतात, त कोणी परूशी माणुस नि तेले विनंती करी कि मना कळे जेवण कराले बस, आणि तो मधमा जाईसन जेवण कराले बठना. 38एक दिन काही परूशी लोक आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या यरूशलेम शहर मधून एयेल होतात, येशु कळे ईसन सांगू लागनात. तुना शिष्य आमना रीतीरिवाज नुसार काब नई करतस? त्या गंधा हात वर जेवण काब करतस? 39प्रभु येशु नि तेले सांग, “परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी असा भांडा शे, ज्या बाहेरून स्वच्छ शेतस, पण आत मधून आते बी गंधा शेतस. म्हणजे, तुमी स्वता ले चांगला लोकस सारखा दाखाळतस. पण तुमना मनस्मा तुमी लालच, आणि स्वार्थ कण भरेल शेतस. 40ओ बुद्धीहीन लोकसहोण, जेनी बाहेर ना भाग बनाव, काय तेनी आतमधला भाग नई बनाव? 41पण हा, मधली वस्तूस्ले दान करी द्या, त देखा सर्व काही तुमना साठे शुद्ध हुई जाईन.” 42पण ओ परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी पुदिना आणि सुदाब (जीरा) ना आणि सर्वा प्रकार ना जळी-बुटी ना दहावा भाग देतस, पण न्याय ले आणि परमेश्वर ना प्रेम ले टाइ देतस, पाहिजे त होता कि एस्ले बी करत ऱ्हातात, आणि तेस्ले बी नई सोळतस. 43ओ परूशी लोकसहोण, तुमना वर हाय. तुमी प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर बसान पसंद करतस, आणि बजारस्मा लोक तुमले आदरताशी नमस्कार कराले पाहिजे असा देखतस. 44हे कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी, तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण कि तुमी चुना लायेल कबर ना सारखा शेतस, ज्या वरून तर सुंदर दिखतस, पण मधमा मरेल ना हाळ आणि सर्वा प्रकार नि मळीनता कण भरेल शेतस. 45तव एक मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक नि तेले उत्तर दिधा, कि “गुरुजी, ह्या गोष्टी सांगीसन तू आमनी निंदा करस.” 46तेनी सांग, “ओ मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक तुमना वर बी हाय. तुमी मोठा वझा जेस्ले उचलान कठीण शे माणसस वर टाकतस पण तुमी स्वता त्या वजन ले आपली एक बोट बी नई लावतस. 47हाय तुमना वर. तुमी त्या भविष्यवक्तास्ना कबर बनावतस जेस्ले तुमनाच पूर्वजस्नी मारी टाकेल होता. 48त तुमी साक्षी शेतस, आणि आपला पूर्वजस्ना कामस्मा भागी शेतस, कारण कि तेस्नी त तेस्ले मारी टाक, आणि तुमी तेस्नी कबर बनावतस. 49एनासाठे परमेश्वर नि आपला ज्ञान ना द्वारे सांगेल शे, कि मी तेस्ना जोळे भविष्यवक्तास्ले आणि संदेश लयनारस्ले धाळसू, आणि त्या तेस्ना मधून कईक ले मारी टाकतीन, आणि कितलाकस्ले त्रास देतीन. 50एनासाठे कि जीतला भविष्यवक्तास्ना रक्त जग नि निर्मिती पासून व्हावाळा मा एयेल शे, सर्वास्ना लेख ह्या युग ना लोकस पासून लेवामा येवो. 51हाबेल नि हत्या पासून त जखऱ्या नि हत्या लगून जो वेदी आणि परमेश्वर ना मंदिर ना मधमा घात करामा उना, मी तुमले खरज सांगस, तेस्ना लेख ह्याच टाईम ना लोकस पासून लेवामा ईन. 52हाय, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्वर. कि तुमनी न्यान नि किल्ली त ली लीधी, पण स्वता प्रवेश नई करणात, आणि प्रवेश करणास्ले बी रोकी लीध.” 53आणि जव तेनी ह्या गोष्टी तेस्ले सांग त तो तठून निघणा, त मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तेना गैरा मांगे लागी ग्यात आणि वाद-विवाद कराले लागनात, कि तो गैऱ्या गोष्टीस्ना बारामा चर्चा करो. 54आणि त्या ह्या मोका ले देखत होतात कि येशु ना तोंड मधून निघेल कोणती गोष्ट धरुत आणि तेले दोष लाईसन फसाळी देवूत.
S'ha seleccionat:
लूक 11: AHRNT
Subratllat
Comparteix
Copia
Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.