युहन्ना 7
7
येशू अन् त्याचे भाऊ
1या गोष्टी झाल्यावर येशू गालील प्रांतात फिरत रायला, त्याले यहुदीया प्रांतात जायाची इच्छा नव्हती कावून कि यहुदी पुढारी त्याले मारून टाक्याचा प्रयत्न करत होते. 2अन् यहुदी लोकायचा झोपड्यायचा सण#7:2 झोपड्यायचा सण हा सण यहुदी लोकायले आठवण देण्यासाठी होता, कि त्यायच्या बापदादे चाळीस वर्ष तंबू मध्ये रायले होते. हा सण आठ दिवस परेंत चालत होता, अन् फसह सणाच्या सहा महिन्याच्या बाद ठेवला जात होता. जवळ होता 3म्हणून याच्या भावायन त्याले म्हतलं, “काई पण करून इथून यहुदीया प्रांतात चालला जाय, कि जे काम तू करत हाय, त्याले तुह्या शिष्यान पण पायलं पायजे. 4कावून कि, कोणाले पण ज्याले प्रसिद्ध होयाच हाय, तर तो लपून काम नाई करीन; जर तू हे काम करत अशीन तर या कामाले उघडपणे लोकायच्या समोर कर.” 5कावून कि त्याचे भाऊ पण त्याच्यावर विश्वास करत नाई होते. 6तवा येशूनं त्यायले म्हतलं, “माह्यी वेळ अजून आली नाई; पण तुमच्यासाठी हि वेळ हाय. 7जगातले लोकं तुमचा तिरस्कार नाई करू शकत, पण ते माह्या तिरस्कार करते, कावून कि मी त्यायच्या विरोधात हि साक्ष देतो, कि त्यायचे काम बेकार हाय. 8तुमी सणात जा; अन् मी या सणात आता नाई जाईन, कावून कि आतापरेंत माह्या वेळ पूर्ण नाई झाला हाय.” 9तो त्यायच्या संग ह्या गोष्टी म्हणून गालील प्रांतातचं रायला.
झोपडीचा सणात येशू
10पण जवा येशूचे भाऊ सणात चालले गेले, तवा तो स्वता खुल्लम-खुल्ला नाई पण तो गुप्तपणे गेला. 11यहुदी पुढारी लोकं सणाच्या दिवशी त्याले हे म्हणून पायाले लागले, कि “तो कुठं हाय.” 12अन् लोकायमध्ये त्याच्या बाऱ्यात लपून-लपून लय साऱ्या गोष्टी झाल्या, कईक लोकं म्हणत होते, “तो चांगला माणूस हाय.” अन् कईक लोकं म्हणत होते, “नाई, तो लोकायले भरमावत हाय.” 13तरी पण यहुदी पुढाऱ्याचा भेवान कोणी पण माणूस त्याच्या बाऱ्यात खुल्लम-खुल्ला नाई बोलत होता.
सणात येशूचा उपदेश
14अन् जवा सणाच्या अर्धा दिवस निघून गेला; तवा येशू यरुशलेमच्या देवळाच्या आंगणात जाऊन उपदेश देऊ लागला. 15तवा यहुदी पुढाऱ्यायन हापचक होऊन म्हतलं, “याने कधी पण पवित्रशास्त्राची शिकवण नाई घेतली, मंग त्याले हे ज्ञान कुठून आलं?” 16येशूनं त्यायले उत्तर देलं, कि “माह्यी शिक्षा माह्या स्वताची नाई, पण मले पाठविणाऱ्या देवाची हाय. 17जर कोणी देवाच्या इच्छेवर चाल्याची इच्छा हाय, तर त्याले माईती होईन, कि माह्यी शिकवण देवाच्या इकून येत हाय, या मी स्वताकडून म्हणतो. 18जो आपल्या इकून काई म्हणते, तो सोताचा मोठेपणा करतो; पण जो आपल्या पाठवणावाल्याची प्रशंसा कराची इच्छा करतो, तो खरा हाय, अन् त्याच्यात कपट नाई हाय. 19काय मोशेनं तुमाले नियमशास्त्र नाई देलं? तरी पण तुमच्यातून कोणी पण नियमशास्त्राच पालन नाई करत. तुमी कावून मले माऱ्याच्या बेतात हा?” 20लोकायच्या गर्दीन उत्तर देलं; “तुह्यात भुत आत्मा हाय! कोण तुले मारून टाक्याच्या बेतात हाय?” 21येशूनं त्यायले उत्तर देलं, “मी एक काम केलं, अन् तुमाले आश्चर्य वाटलं. 22मोशेनं तुमाले खतना कऱ्याची आज्ञा देली हाय, हे नाई कि ते मोशेच्या इकून हाय पण बापदादाय पासून चालत आली हाय, अन् आरामाच्या दिवशी माणसाचा खतना करता. 23आरामाच्या दिवशी माणसाचा खतना केल्या जातो, कावून कि मोशेच्या नियमशास्त्राची आज्ञा मोडली नाई जावं. तर तुमी माह्या कावून राग करता, कि मी आरामाच्या दिवशी एका माणसाले पूर्ण पणे चांगलं केलं. 24तुमचा न्याय बायरच्या रूपावर नाई असावा पण बरोबर न्याय करा.”
काय येशूच ख्रिस्त हाय?
25तवा यरुशलेम शहराचे बरेचशे लोकं म्हणू लागले, “हा तोचं हाय, ज्याले मारून टाक्याचा प्रयत्न इथले पुढारी लोकं करून रायले हाय. 26पण आयका, तो तर खुल्लम-खुल्ला गोष्टी करतो, अन् त्याले कोणी काईच म्हणत नाई; काय शक्य हाय कि त्यायनं खरं-खरं ओयखलं हाय; कि हा खरचं ख्रिस्त हाय? 27त्याले तर आमी ओयखतो, कि तो कुठचा हाय; पण जवा ख्रिस्त येणार, तवा कोणालेच मालूम नाई होईन, कि तो कुठचा हाय.” 28तवा येशूनं देवळाच्या आंगणात उपदेश देत ओरडून म्हतलं, “तुमी मले ओयखता अन् हे पण तुमाले मालूम हाय, कि मी कुठून आलो हाय, मी तर स्वताऊन नाई आलो, पण मले पाठवणारा खरा हाय, त्याले तुमी ओयखत नाई. 29पण मी त्याले ओयखतो कावून कि मी त्याच्या इकून हावो अन् त्यानचं मले पाठवलं हाय.” 30ह्या गोष्टी वरून त्यायनं त्याले पकड्याले पायलं तरी पण कोणी पण त्याले पकडू नाई शकलं, कावून कि त्याचा मऱ्याचा खरा वेळ आतापरेंत नाई आला होता. 31अन् गर्दीतून लय लोकायन त्याच्यावर विश्वास केला, अन् म्हणाले लागले, “ख्रिस्त जवा येईन, तर काय याच्याऊन जास्त चमत्कार काम दाखविन, जे यानं दाखवले?”
येशूले धरण्याचा प्रयत्न
32परुशी लोकायन त्याच्या विषयात लपून-लपून गोष्टी करतांना पायलं; अन् मुख्ययाजकायन अन् परुशी लोकायन त्याले पकड्याले देवळातले राखण करणारे शिपाई पाठवले. 33याच्यावर येशूनं त्यायले म्हतलं, “मी थोड्या वेळा परेंत तुमच्या संग हाव; मंग आपल्या पाठवणाऱ्या पासी वापस चालला जाईन. 34तुमी मले पायसान, पण मी तुमाले भेटीन नाई, अन् जती मी हाव तती तुमी नाई येऊ शकत.” 35याच्यावर यहुदी पुढाऱ्यायन आपसात विचारलं, “हा कुठं जाईन, कि आपल्याले नाई भेटीन? होऊ शकते तो त्या यहुदी लोकायपासी जाईन जे युनानी शहरात इकळे-तिकळे रायते, अन् युनानी लोकायले पण उपदेश देईन. 36जे गोष्ट यानं म्हतली याचा काय अर्थ हाय, कि तुमी मले पायसान, पण मी तुमाले भेटीन नाई, अन् जती मी जाईन, तती तुमी नाई येऊ शकत?”
जीवनाच्या पाण्याची नदी
37मंग सणाच्या आखरी दिवशी, जो विशेष दिवस हाय, येशू उभा झाला अन् मोठ्या आवाजाने म्हतलं, “जर कोणी ताहानलेला अशीन तर त्यानं माह्यापासी यावं अन् प्यावं. 38जो माह्यावर विश्वास करीन जसं पवित्रशास्त्रात लिवलं हाय, कि त्याच्या हृदयातून पाण्याच्या नद्या वायतीन ज्या जीवन देतात.” 39हे तो पवित्र आत्म्याच्या विषयात बोलत होता, जे त्याच्यावर विश्वास करणाऱ्यायले भेटणार होता; कावून कि पवित्र आत्मा आतापरेंत नाई उतरला होता, अन् देवानं आतापरेंत येशूच्या गौरवाले प्रगट नाई केलं होतं. 40तवा गर्दीतून कोणी-कोणी ह्या गोष्टी आयकून म्हतलं, “खरचं हाचं तो भविष्यवक्ता हाय ज्याची आमी आशा करत होतो.” 41दुसऱ्या काई लोकायन म्हतलं, “हा ख्रिस्त हाय,” पण कोणी तरी म्हतलं, “ख्रिस्त गालील प्रांतातून नाई येईन? 42पवित्रशास्त्र लिवलेल हाय, कि ख्रिस्त दाविद राजाच्या वंशातून अन् बेथलहेम गावातून येईन, जती दाविद राजा रायत होता.” 43मंग शेवटी येशू मुळे लोकाईत फुट पडली. 44त्यायच्यातून काही लोकं त्याले पाकड्याले पायत होते, पण कोणी त्याले पकडू नाई शकले. 45तवा शिपाई व मुख्ययाजक अन् परुशी लोकायपासी आले, अन् त्यायनं पहरेदारायले विचारलं, “तुमी त्याले कावून नाई आणलं?”
यहुदी पुढाऱ्यायचा विश्वास
46शिपायायनं उत्तर देलं, “कोण्या माणसानं कधी अश्या गोष्टी नाई केल्या.” 47परुशी लोकायन शिपायायले उत्तर देलं, “काय तुमी पण भरमावले गेले हाय? 48काय आमी अधिकारी किंवा परुशी लोकायतून कोणी पण त्याच्यावर विश्वास केला हाय? 49पण हे लोकं ज्यायले मोशेचे नियमशास्त्र नाई माईत, देवा कडून श्रापित हाय.” 50निकदेमुसन, जो एका रात्री येशू जवळ आला होता जो त्यायच्यातून एक होता, त्यायले म्हतलं, 51“काय मोशेचे नियमशास्त्र कोण्या माणसाले जवा परेंत पयले त्याचं आयकल्या शिवाय अन् त्याचे काम ओयखल्या शिवाय त्याले दोषी ठरवते?” 52त्यायनं त्याले उत्तर देलं, “काय तू पण गालील प्रांताचा हाय? पवित्रशास्त्रात पाय अन् मंग तुले दिसन कि गालील प्रांतातून कोणताच भविष्यवक्ता प्रगट नाई होऊ शकत.” 53तवा सगळे आपआपल्या घरी चालले गेले.
S'ha seleccionat:
युहन्ना 7: VAHNT
Subratllat
Comparteix
Copia
Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.