युहन्ना 9
9
जन्माच्या फुटक्याले दुष्टीदान
1एक दिवशी जवा येशू आपल्या शिष्याय संग जाऊन रायला होता, त्यानं एका माणसाले पायलं, जो एक फुटका होता. 2अन् येशूच्या शिष्यायनं येशूले विचारलं, “हे गुरुजी, कोणतरी पाप केलं अशीन, ह्या माणसानं किंवा याच्या माय-बापानं, कि हा फुटका जन्मला?” 3येशूनं उत्तर देलं, “नाई तर याने पाप केलं होतं, नाई याच्या माय-बापानं पाप केलं होतं, पण हा ह्याच्यासाठी फुटका जन्मला, कि देवाचे चमत्काराचे काम त्याच्यात प्रगट झाले पायजे. 4ज्यानं मले पाठवलं; मले लवकरात लवकर त्याच्या कामाले पूर्ण करणे आवश्यक हाय. ते रात्र येणार हाय, ज्याने कोणतचं काम नाई करू शकत. 5जोपरेंत मी जगात हावो, तोपरेंत जगाचा ऊजीळ हावो.” 6हे म्हणून तो जमिनीवर थुकला, अन् त्या थुकीन माती भिजवली, अन् ते माती त्या फुटक्याच्या डोयाले लावली. 7अन् त्याले म्हतलं, “जाय, अन् आपले तोंड शिलोहाच्या कुंडात धुवून टाक” (शिलोह चा अर्थ पाठवलेला होते) मंग त्यानं जाऊन धुतलं, अन् त्याले दिसू लागलं, तो वापस आला. 8तवा त्याचे शेजारी अन् दुसरे लोकं त्यायनं पयले त्याले भीख मांगतांना पायले होते, एकादुसऱ्याले म्हणू लागले, “काय हा तोचं नाई, जो फुटका होता अन् भीख मांगत होता?” 9काई लोकायन म्हतलं, “हा तोचं हाय,” दुसऱ्यायन म्हतलं, “नाई, पण त्याच्या सारखा हाय” पण त्यानं म्हतलं, “मी तोचं हाय.” 10तवा ते त्याले विचाराले लागले, “तुले कसं काय दिसू लागले?” 11फुटक्यानं उत्तर देलं, “येशू नावाच्या एका माणसानं माती भिजवली, अन् माह्या डोयाले लावून मले म्हतलं, शिलोह कुंडात जाऊन धुवून टाक, तवा मी कुंडावर गेलो, तोंड धुतलं अन् पाह्याले लागलो.” 12त्यायनं त्याले विचारलं, “तो माणूस कुठसा हाय?” त्यानं म्हतलं, “मले नाई माईत.”
परुशी लोकायपासून बऱ्याची पडताडणी
13-14ज्या दिवशी येशूनं माती भिजवली अन् त्या माणसाले चांगलं केलं, तो आरामाचा दिवस होता. म्हणून लोकं त्या माणसाले परुशी लोकायपासी घेऊन गेले. 15मंग परुशी लोकायन पण त्याले विचारलं; तू कसा पाह्याले लागला? फुटक्यानं त्यायले म्हतलं, “त्यानं माह्या डोयावर माती लावली, मंग मी धुवून टाकली, अन् पाह्याले लागलो हावो.” 16ह्यावरून कईक परुशी लोकायन म्हतलं, “हा माणूस ज्याने असं केलं, देवापासून नाई हाय. कावून कि तो आरामाच्या दिवसाला चमत्काराचे काम करतो, अन् मानत पण नाई.” आणखी काई लोकायन म्हतलं, “याच्या सारखा पापी माणूस अश्या प्रकारचा चमत्कार कसा करू शकतो?” म्हणून त्यायच्यात फुट पडली. 17त्यायनं त्या फुटक्याले परत म्हतलं, “त्यांना जर तुह्याले डोये चांगले केले, तू त्याच्या बद्दल काय म्हणतो?” त्यानं म्हतलं, “हा भविष्यवक्ता हाय.” 18-19पण यहुदी पुढाऱ्यायले विश्वास नाई झाला, कि हा फुटका होता, अन् आता पाहू शकते, जवा परेंत त्यायनं फुटक्याच्या माय-बापाले बलावून त्यायले विचारलं, “काय हा तुमचा पोरगा हाय, ज्याले तुमी म्हणता, कि फुटका जन्माला होता? मंग आता कसा काय पाहू लागला हाय?” 20तवा त्याच्या माय-बापानं उत्तर देलं, “आमाले तर मालूम हाय, कि हा आमचा पोरगा हाय, अन् फुटका जन्मला होता. 21पण आमाले हे नाई माईत हाय कि आता हा, कसा काय पायते; अन् नाई हे मालूम हाय, कि कोण त्याचे डोयाने पाह्यसाठी सामर्थ देली हाय, तो स्वताचं उत्तर द्यासाठी मोठा हाय; त्यालेच विचारून घ्या; तो स्वताच्या बाऱ्यात स्वताच सांगून देईन.” 22ह्या गोष्टी त्याच्या माय-बापानं यासाठी म्हतल्या, कावून कि ते यहुदी पुढाऱ्यायले भेत होते; कावून कि यहुदी पुढारी एका मताचे होऊन गेले होते, कि जर कोणी विश्वास करन कि येशू हा ख्रिस्त हाय, तर त्याले धार्मिक सभास्थानात बायर काढल्या जाईन. 23या कारणाने त्याच्या माय-बापानं म्हतलं, “तो प्रश्नाचे उत्तर देयाले समजदार हाय; त्यालेच विचारून घ्या.” 24तवा यहुदी पुढाऱ्यान त्या फुटक्याले दुसऱ्या वेळी बोलावून म्हतलं, “खरं बोलून देवाची स्तुती कर; आमाले तर मालूम हाय कि तो माणूस पापी हाय.” 25त्यानं उत्तर देलं, “मले नाई माईत कि तो पापी हाय या नाई हाय मी एक गोष्ट माईत हाय कि मी फुटका होतो पण आता पाहू शकतो.” 26त्यायनं फुटक्याले परत विचारलं, “त्याने तुह्या संग काय केलं अन् त्यानं कसे तुह्ये डोये बरे केले?” 27फुटक्यानं त्यायले म्हतलं, “मी तर तुमाले सांगतले हाय, अन् तुमी नाई आयकलं; अन् दुसऱ्या वेळी कावून आयकायची इच्छा करता? काय तुमाले पण त्याचे शिष्य होण्याची इच्छा करता?” 28तवा ते त्याले दटावून म्हतलं, “तुचं त्याच्या शिष्य हाय; आमी तर मोशेचे शिष्य हावो. 29आमाले मालूम हाय, देव मोशे बरोबर बोलला; पण या माणसाले आमी नाई ओयखत कि हा कुठचा हाय.” 30तवा फुटक्यानं त्यायले उत्तर देलं, “हे तर आश्चर्याची गोष्ट हाय कि तुले माईत नाई कि तो कुठून येते, तरी पण त्यानं माह्याले डोये बरे केले हाय. 31आमाले मालूम हाय कि देव पापी लोकायचे नाई आयकतं पण जर कोणी देवाच्या भक्त हाय, अन् त्याच्या इच्छेन चालत हाय, तर तो त्याची आयकते. 32जवा पासून जगाची निर्मिती केली गेली होती, हे कधी आयकण्यात नाई आलं, कि कोण पण जन्माच्या फुटक्याचे डोये बरे केले. 33जर हा माणूस देवापासून नाई असता, तर काईच नाई करू शकला असता.” 34त्यायनं त्याले उत्तर देलं, “तू तर पूर्ण पणे पापात जन्मला हाय, तू आमाले शिकवू नोको?” अन् त्यायनं त्या माणसाले महासभेतून बायर काढून टाकलं.
आत्मिक फुटके पणा
35जवा येशूनं आयकलं, कि त्यायनं त्याले बायर काढून टाकलं हाय; अन् जवा त्याच्या सोबत भेट झाली तवा म्हतलं, “काय तू माणसाच्या पोरावर विश्वास करते?” 36त्यानं उत्तर देलं, “हे गुरुजी, मले सांग कि हा देवाच्या पोरगा कोण हाय, कि मी त्याच्यावर विश्वास करू शकू?” 37येशूनं त्याले म्हतलं, “मी देवाचा पोरगा हाय, तू पयलेच मले पायलं हाय, अन् मी तोचं हावो, जो आता तुह्या संग बोलू रायला हाय.” 38त्यानं म्हतलं, “हे प्रभू, मी तुह्यावर विश्वास करतो.” अन् त्यानं त्याची आराधना केली. 39अन् येशूनं म्हतलं, “मी ह्या जगात हा न्याय कऱ्याले आलो हाय, फुटके लोकं पाह्याले लागतीन अन् जे लोकं पाह्यतात ते फुटके होतीन.” 40जे परुशी लोकं त्याच्या संग होते, त्यायनं ह्या गोष्टी आयकून येशूले विचारलं, काय तू म्हणत हाय, “आमी पण फुटके हावो?” 41येशूनं त्यायले म्हतलं, “जर तुमी फुटके असते तर पापी नाई ठरले असते पण आता म्हणत हा, कि आमी पायतो, अन् म्हणून तुमाले क्षमा नाई केली जाणार.”
S'ha seleccionat:
युहन्ना 9: VAHNT
Subratllat
Comparteix
Copia
Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.