मत्तय 18

18
स्वर्गाच्या राज्यात मोठं कोण?
(मार्क 9:33-37; लूका 9:46-48)
1त्याचं वाक्ती, शिष्यायनं येशूच्या पासी येऊन विचारलं, कि “देवाच्या राज्यात मोठा कोण हाय?” 2यावर येशूनं एका लेकराले आपल्यापासी उभं केलं, 3अन् म्हतलं, कि “मी तुमाले खरं सांगतो, कि जतपर्यंत तुमी या लेकरा सारखे नाई बनसान तोपर्यंत, देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाई. 4पण जर तुमी या लेकरा सारखे नम्र होसान, तर तुमी देवाच्या राज्यात सगळ्यात महान होसान. 5अन् जो कोणी, माह्या नावाने अशा लेकरायले ग्रहण करतो, तो मले ग्रहण करतो.”
पाप केल्याची परीक्षा
(मार्क 9:42-48; लूका 17:1-2)
6“जर कोणी या लायण्यातुन लायना जो माह्यावर विश्वास करते त्याच्यातून कोण्या एकाले जर ठोकर खायाचं कारण बनीन, तर त्याच्यासाठी हे चांगलं हाय, कि त्याच्या गयात जात्याचा पाट लटकून खोल समुद्रात डुबून टाकल्या जावा.” 7जगाच्या लोकायवर धिक्कार कावून कि संसाराच्या सगळ्या गोष्टी ज्या लोकायले पाप कऱ्याच कारण बनते असं होणे पक्कं हाय, पण त्या माणसावर धिक्कार ज्याच्याच्यान ह्या गोष्टी घळतात.
8“जर तुह्याला हात या पाय तुले पापात टाकत अशीन, तर तू त्याले कापून फेकून दे, दुन्डा या लंगडा होऊन जीवनात प्रवेश करणे तुह्याल्या साठी चांगलं हाय, कि दोन हात अन् दोन पाय असून तू नरकात म्हणजे अग्निकुंडात टाकल्या जाशीन. 9अन् जर तुह्यावाला डोया तुले पापात टाकत हाय, तर तो काढून फेकून दे, कावून कि फुटका होऊन देवाच्या राज्यात जाणे तुह्यासाठी चांगलं हाय, कि दोन डोये असून तुह्यालं सर्व शरीर नरकात टाकलं जाईन.”
हारपलेल्या मेंढराची कथा
(लूका 15:3-7)
10“अन् पाहा, तुमी या लायण्याय पैकी कोणाले पण तुच्छ नका समजू, कावून कि मी तुमाले सांगतो, कि स्वर्गात देवदूत नेहमीच माह्या देवबापाच्या सोबत रायतात. 11कावून की मी, माणसाचा पोरगा जे लोकं देवापासून दूर हायत त्यायले वाचव्याले आलाे हाय. 12तुमी काय समजता, जर कोण्या माणसाची शंभर मेंढरं हायत, अन् त्यातून एक हारपलं तर तो नव्याणवले सोडून जंगलात व पहाडावर जाऊन त्या हरपलेल्या मेंढराला नाई पाईन?
13अन् जर असं झालं, कि ते त्याले सापळलं, तर मी तुमाले खरं सांगतो, कि त्या नव्याणीव मेंढराले जे भटकलेले नाईत, त्यायच्यासाठी एवढा आनंद नाई करणार, जेवढा कि तो त्या हरपलेल्या मेंढरासाठी करीन. 14असाच तुमचा देवबाप हाय, जो स्वर्गात हाय, त्याची हे इच्छा नाई, कि या लायण्या पैकी कोण्या एकाचा नाश हो.”
अपराध्या संग व्यवहार
(लूका 17:3)
15जर तुह्या भाऊ#18:15 भाऊ ख्रिस्तातला विश्वासी भाऊ तुह्या विरोधात अपराध करीन, तर त्याले घेऊन तू एकट्यात जाऊन समजावं, जर त्यानं तुह्य आयकलं अन् पश्चाताप केला तर तू त्याले जिंकून घेशीन. 16पण जर त्यानं नाई आयकलं, तर एका दोघायले आपल्या संग घेऊन जाय, कि हरएक गोष्ट दोन या तीन लोकाय समोर त्याची साक्षी त्याच्या तोंडातून पक्की केल्या जावं, 17जर त्यानं त्यायचं नाई आयकलं तर मंडळीले सांग, पण जर त्यानं मंडळीचं नाई आयकलं, तर तू त्याच्या सोबत अन्यजाती अन् करवसुली घेणारा सारखं व्यवहार करून त्याले मंडळीतून बायर करून टाक.
थांबवण अन् मौका देनं
18“मी तुमाले खरं सांगतो, जे काई तुमी पृथ्वीवर बांधसान ते स्वर्गात बांधल्या जाईन, अन् जे काई तुमी पृथ्वीवर उघडसान, ते स्वर्गात पण उघडल्या जाईन. 19मंग अजून मी तुमाले सांगतो, कि जर तुमच्यातून दोघजन जर पृथ्वीवर एकमनाने प्रार्थनेत जे काही मांगतीन, माह्या देवबाप जो स्वर्गात हाय तुमाले देईन. 20कावून कि जती दोन अन् तीन लोकं माह्या नावाने जमा होतीन, तती मी त्यायच्या मधात राईन.”
नद्या दाखवणाऱ्या सेवकाची कथा
21तवा पतरसने जवळ येऊन येशूले विचारलं, कि “हे प्रभू, जर माह्या विश्वासी भाऊ अपराध करत रायला तर मी त्याले कितीक वेळा क्षमा करू, काय सात वेळा परेंत?” 22येशूने त्याले म्हतलं, कि “मी तुले हे नाई म्हणत कि सात वेळा, पण साताचे सत्तर गुणा परेंत तुमी त्याले क्षमा करून देले पायजे.” 23“म्हणून स्वर्गाच राज्य त्या स्वामी सारखं हाय, जो आपल्या दासापासून लेखा जोखा घ्यायले गेला,
24जवा त्यानं तो लेखा घेणं सुरु केलं तवा एका जनाले त्याच्या समोर आणण्यात आलं, जो दहा हजार सोन्याच्या शिक्यायचा (एवढा पैसा कि एक नौकर त्याची परत फेड करू शकत नाई) कर्जदार होता, 25जवा त्याच्यापासी द्यायले काईच नव्हत, तवा त्याच्या राजानं त्याले म्हतलं, कि हा अन् याची बायको अन् लेकरं-बाकरं जे काई त्याचं हाय, ते विकून टाक अन् त्याचं सगळं कर्ज वापस देऊन टाक. 26यावर त्याच्या दासाने टोंगे टेकून विनंती केली, अन् म्हतलं, हे स्वामी, धीर धर मी सगळे कर्ज फेडून देईन. 27तवा त्या दासाच्या राजाने दया खाऊन सोडून देलं, अन् त्याचं कर्ज क्षमा केलं.”
28“पण जवा तो दास बायर निघाला, तवा त्याच्या संगच्या दासा पैकी एक त्याले भेटला, ज्याच्यावर त्याचं शंभर दिनार (शंभर दिनार म्हणजे जवळपास शंभर दिवसाची मजुरी) कर्ज होतं, त्यानं त्याले पकडून त्याचा गया पकडला, अन् म्हतलं, जे काई कर्ज तुह्यावर हाय ते वापस दे. 29यावर त्याच्या संगी दासानं टोंगे टेकून त्याले विनंती करू लागला, कि धीर धर मी तुले सगळं कर्ज वापस देईन, 30पण त्यानं नाई आयकलं, जाऊन त्याले जेलात टाकलं, कि जवा तो कर्जाले भरून देईन तवा पर्यंत तो ततीच राईन.
31त्याच्या संगच्या दुसऱ्या दासाले हे जे झालं होतं ते पाऊन तो लय उदास झाला, अन् जाऊन आपल्या राजाले सगळी गोष्ट सांगून देली. 32तवा त्या राजानं त्याले बलावून त्याले म्हतलं, हे दुष्ट दासा, तू जवा मले विनंती केली होती, तवा मी तर तुह्यालं सगळं कर्ज क्षमा केलं, 33म्हणून जशी मी तुह्यावर दया केली, तसचं तू पण आपल्या संगी दासावर दया कऱ्याले पायजे.
34अन् त्या राजानं रागात येऊन त्याले दंड देणाऱ्याच्या हातात सोपून देले, अन् जेलात टाकून देलं, कि जोपरेंत हा सगळे कर्ज नाई भरीन, तोपरेंत त्यायच्या हातात राईन.” 35“अशाचं प्रकारे जर तुमचाईत हरएक आपल्या भावाला#18:35 भावाला विश्वासी भाऊ सगळ्या मनाने क्षमा नाई करणार, तर माह्याला देवबाप जो स्वर्गात हाय, तो पण तुमच्या पापाले क्षमा नाई करीन.”

S'ha seleccionat:

मत्तय 18: VAHNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió