मत्तय 19

19
फारकतीच्या विषयावर येशूची शिकवण
(मार्क 10:1-12)
1जवा येशूने ह्या गोष्टी सांगून संपवल्या, तवा तो गालील प्रांतातून चालला गेला, अन् यहुदीया प्रांतात यरदन नदीच्या तिकळच्या बाजुले गेला. 2तवा परत लोकायची मोठी गर्दी येशूच्या मागे आली, अन् त्यानं बिमार लोकायले बरे केले. 3तवा परुशी लोकं येशू पासी येऊन त्याची परीक्षा पायाच्या उद्देशान त्याले विचारलं, “नवऱ्यानं प्रत्येक गोष्टी साठी आपल्या बायकोची फारकती घेणं बरोबर हाय काय?”
4त्यानं उत्तर देलं, “तुमी वाचलं नाई काय, ज्याने त्यायले बनवलं, त्यानचं सुरवाती पासून नर अन् नारी बनवून म्हतलं.” 5-6“या कारणाने माणूस आपल्या माय-बापापासून अलग होऊन, आपल्या बायकोच्या संग राईन अन् ते दोघं एक शरीर होतीन; देवबापान ज्यायले एकमेका संग जोडलं हाय ते माणसानं तोडलं नाई पायजे.” 7त्यायनं येशूले म्हतलं, “मंग मोशेने पवित्रशास्त्राच्या पुस्तकात कावून लिवून ठेवलं कि फारकतीपत्र देऊन तिले सोडून द्या?”
8येशूनं त्यायले म्हतलं, “कावून की तुमी कधी पण देवाचं आयकतं नाई,” “म्हणून मोशेनं हे आज्ञा तुमच्यासाठी पवित्रशास्त्रात लिवली हाय, कि तुमाले आपल्या बायकोले सोडून देण्याची आज्ञा देली, पण जवा देवानं पृथ्वी बनवली होती तवा असं नाई होतं. 9मंग येशूनं त्यायले म्हतलं, मी तुमाले म्हणतो, जो कोणी आपल्या बायकोले व्यभिचाराच्या शिवाय कोण्या दुसऱ्या कारणान आपल्या बायकोले टाकून दुसरी संग लग्न करते तो व्यभिचार करते अन् जे त्या सोडलेल्या बाई सोबत लग्न करते तो पण व्यभिचार करते.”
10त्याच्या शिष्यायनं त्याले म्हतलं, “जर माणसाचा बाई संग असा समंध हाय, तर लग्न करन चांगलं नाई.” 11येशूनं त्यायले म्हतलं, “फक्त त्या लोकायले ज्यायले एकटं रायाच वरदान देले गेले हाय, तेच हे शिकवण ग्रहण करू शकतात. 12कावून कि काई नपुसक असे हायत, जे मायच्या गर्भा पासूनच असतात, अन् काई नपुसक असे हायत, ज्यायले माणसाने नपुसक बनवलं, अन् काई नपुसक असे हायत, ज्यायनं देवाच्या राज्यासाठी आपल्या स्वताले नपुसक बनवले हाय, जे हे स्वीकार करू शकतात, त्यायन हे स्वीकार करावं.”
लेकरायले आशीर्वाद
(मार्क 10:13-16; लूका 18:15-17)
13मंग काई लोकायन लेकरायले येशू पासी आणलं, कि त्यानं त्यायच्यावर हात ठेवावा व प्रार्थना करावं पण शिष्यायनं त्यायले दटावलं, 14येशूनं म्हतलं, “लेकरायले माह्यापासी येऊ घ्या त्यायले म्हणा करू नका, कावून कि देवाचं राज्य यायच्यास सारख्याच हाय.” 15तवा येशूनं त्यायले आपल्या काकीत घेतलं अन् त्यायच्यावर हात ठेऊन त्यायले आशीर्वाद देला, अन् मंग ततून चालला गेला.
धनवान तरून अन् अनंत जीवन
(मार्क 10:17-31; लूका 18:18-30)
16तवा एक माणूस पयत-पयत येशू पासी आला अन् टोंगे टेकून येशूले विचारलं, उत्तम गुरुजी, अनंत जीवन भेट्याले मी काय करू? 17येशूनं त्याले म्हतलं, “तू मले चांगल्या कामाच्या विषयात कावून पुसतो, चांगला तर एकच हाय, पण जर तुले जीवनात प्रवेश कऱ्याच हाय, तर देवाच्या आज्ञा जे हायत ते मान.” 18त्यानं येशूले म्हतलं, “कोणत्या आज्ञा? येशूने म्हतलं, हेच कि खून नको करू, व्यभिचार नको करू, चोरी नको करू, खोटी साक्ष देऊ नको.”
19आपला बाप अन् मायचा आदर कर, अन् आपल्या शेजाऱ्यावर आपल्या सारखं प्रेम कर. 20-22त्या नवजवानान येशूले म्हतलं, ह्या सगळ्या आज्ञा मी लहान पणापासून मानत आलो हाय, आता माह्यात कोणत्या गोष्टीची कमी हाय? येशूनं त्याले म्हतलं, जर तुले सिद्ध बन्याचं अशीन, “तुह्यात एका गोष्टीची कमी हाय, जाय जे काई संपत्ती तुह्या जवळ हाय ते इकून टाक, अन् गरीबायले दान कर, म्हणजे तुले स्वर्गात धन भेटीन, अन् माह्य अनुकरण करून माह्यवाला शिष्य बन.” पण तो जवान हे गोष्ट आयकून दुखी होऊन चालला गेला, कावून कि तो लय श्रीमंत होता.
23तवा येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, मी तुमाले खरं सांगतो, “देवाच्या राज्यात श्रीमंतायले जाणे लय कठीण हाय.” 24अजून तुमाले सांगतो, एका उंटाले सुईच्या शेद्रातुन जाणं कठीण हाय, पण एका धनवानाले देवाच्या राज्यात जाणं त्याच्याऊनही लय कठीण हाय. 25हे आयकून शिष्य लय हापचक हून म्हणाले, “मंग कोणाले चांगलं होणं शक्य हाय?” 26येशूनं त्यायले टकमक पायलं, अन् म्हतलं, “माणसायले तर हे अवघड हाय पण देवाले सगळं काही शक्य हाय.”
27यावर पतरसन येशूले म्हतलं, कि “पाह्य, आमी तुह्याले शिष्य बनण्यासाठी सगळं काई सोडून, तुह्यावाल्या मांग आलो हाय, तर आमाले काय भेटीन?” 28येशूने त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं सांगतो, नवीन जगात, जवा माणसाचा पोरगा आपल्या महिमेच्या सिहासनावर बसीन, तवा तुमी पण जे माह्याले शिष्य झाले हायत, बारा सिहासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करसान.
29माह्ये शिष्य होण्यासाठी अन् सुवार्थेची घोषणा कऱ्यासाठी ज्यानं माह्यासाठी घरदार, बायको, बहीण-भाऊ, माय-बाप, लेकरं-बाकरं, वावर-धुवर सोडलं अशीन, त्याले शंभरपट भेटीन, अन् तो अनंत जीवनाचा अधिकारी होईन. 30तरी लय लोकं जे पयले हाय ते त्यावेळी शेवटचे होतीन अन् लय जे शेवटचे हाय ते पयले होतीन.”

S'ha seleccionat:

मत्तय 19: VAHNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió