मत्तय 20

20
वाडीच्या मजुरायची कथा
1येशूनं लगातार शिकवण देऊन म्हतलं, “स्वर्गाच राज्य या सारखं हाय, एक माणूस होता, तो सकाळीच बायर चालला गेला अन् काही लोकायले अंगुराच्या वाडीत काम कऱ्यासाठी नियुक्त केले. 2अन् त्यानं प्रत्येक मजुराले रोजचा एक दिनार देण्याचा ठरावं करून त्यायले आपल्या अंगुराच्या वाडीत कामावर पाठवले. 3मंग त्याचदिवशी सकाळी जवळपास नऊ वाजता त्या माणसानं काही अजून माणसायले बजारात उभं पायलं जे काईच करत नाई होते. 4त्यानं त्यायले म्हतलं, तुमी पण अंगुराच्या वाडीत जा, अन् जे काई योग्य असेन ते मजुरी मी तुमाले देईन मंग ते गेले. 5अन् तो दुपारी तीन वाजता अजून बजारात गेला, अन् दुसऱ्या मजुरायले पायले ज्याईले त्यानं योग्य पगार द्यायचं ठरवलं होतं. 6मंग संध्याकाळी पाच वाजेच्या वाक्ती तो बजारात गेला, तवा दुसरे मजुर उभे असलेले त्याले दिसले, अन् त्यानं त्यायले म्हतलं तुमी सारा दिवस अती रिकामे कावून उभे राईले हा?” 7तवा ते त्याले म्हणाले, आमाले कोणी कामावर लावले नाई म्हणून त्याने त्यायले म्हतलं, तुमी पण अंगुराच्या वाडीत कामाले जा जे काई योग्य असेन ते मजुरी मी तुमाले देईन. 8मंग “संध्याकाळच्या वाक्ती, अंगुराच्या वाडीचा मालक आपल्या दिवाणजीले म्हणाला, कि मजुरायले बलाव, अन् पयल्यावाल्या पासून तर आखरीवाल्या परेंत त्यायची मजुरी देऊन दे. 9तवा ते आले, अन् जे मजुर आखरीच्या एका घंटयात कामाले लावले होते, त्यानं त्यायले एक दिनार मजुरी देली. 10अन् जे मजुर पयले आले होते, त्यायले असं वाटलं कि आमाले त्यायच्याहून अधिक मजुरी भेटीन, पण त्यायले पण एकच दिनार मजुरी भेटली. 11तवा ते त्या मालकावर कुडकुड करून म्हणू लागले. 12या मांगच्या मजुरायन एकच घंटा काम केलं, तरी त्यायले आमच्या एवढीच मजुरी देली, पण ज्यायनं दिवसभर भार उचललं, अन् घाम गाडला, त्यायले पण तेवढीच मजुरी कावून देली? 13मालकान त्याच्यातून एकाले उत्तर देलं, हे दोस्ता, मी तुह्या संग काई धोका नाई केला, मी तुले एक दिनार मजुरी देली जे ठरवलेली होती, आता आपली मजुरी घेऊन घे अन् घरी जा, मी या माणसायले देत हावो, जेवढे मी तुमाले देलं. 14जे तुह्यालं हाय, ते घे, अन् चालला जाय, माह्याली इच्छा हे हाय, कि जेवढं तुले तेवढच या मांगच्या मजुरायले पण द्यावं. 15अन् माह्यापासी अधिकार हाय कि मी आपल्या पैशातून जे इच्छा हाय ते करीन, यासाठी तुमी जळू नका कावून कि मी दुसऱ्यावर पण दया करतो. 16याप्रकारे जे पयले हायत ते शेवटचे होतीन अन् लय जे आता शेवटचे हायत ते पयले होतीन, बलावल्या गेलेले लय हायत, पण निवडलेले थोडे हायत.”
आपल्या मरणाच्या अन् पुनरुत्थानाच्या बद्दल भविष्यवाणी
(मार्क 10:32-34; लूका 18:31-34)
17येशू यरुशलेम शहरात जातांनी बारा शिष्यायले आपल्यापासी बलावलं, अन् त्यायले आपल्या स्वताच्या बाऱ्यात काय होईन सांगू लागला. 18-19“पाहा, आमी यरुशलेम शहरात जावून रायलो तती माणसाचा पोरगा मुख्ययाजक व मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक या लोकायच्या हाती पकळून देल्या जाईन, ते त्याची मजाक उडवतीन, त्याले झोडपे मारतीन, अन् ते त्याले वधस्तंभावर मरण दंड देतीन.”
एका मायची विनंती
(मार्क 10:35-45)
20जवा जब्दीच्या दोन पोराची माय आपल्या पोराबरोबर येशू पासी जावून त्याले नमन करून काई मांग्याले लागली. 21तवा येशूनं तिले म्हतलं, “तुह्याली काय इच्छा हाय” तवा त्या बाईन येशूले म्हतलं, “कि माह्याले हे दोन पोरं तुह्याल्या राज्यात एक तुह्या उजव्या बाजूने एक तुह्या डाव्याबाजूने बसले पायजे.” 22-23येशूने उत्तर देले, तुमी काय मांगता हे तुमाले समजत नाई, जे दुख मी सोशीन काय ते दुख तुमी सोससान काय? त्यायन त्याले म्हतलं, हो, सोसू शकतो, तवा येशूनं त्यायले म्हतलं, हो, सोसू शकता, पण माह्या वैभवात कोण शासन करणे हे माह्या हाती नाई, त्या जागा माह्या देवबापान ज्यायच्या साठी ठेवल्या हाय, ते त्यायले भेटीन. 24हे आयकून, बाकीचे दहा शिष्य त्या दोन्ही भावावर क्रोधीत झाले. 25तवा येशूनं त्यायले आपल्यापासी बलाऊन म्हतलं, “तुमाले माहीत हाय, जे जगातल्या लोकायचे अधिकारी समजल्या जातात, ते आपल्या अधिकाराचा वापर आपल्या आधीन असलेल्या लोकायवर अधिकार दाखव्यासाठी करते, अन् जे त्यायच्याहून पण मोठे हायत ते त्यायच्यावर अधिकार ठेवते. 26पण तुमच्या मध्ये असं नाई होणार, जर कोणाले मोठं व्हायचं अशीन, तर त्यानं सगळ्यात लहान व्हावं लागेल, अन् सगळ्यायचा सेवक बनावं लागीन. 27अन् ज्या कोणाले तुमच्यातून प्रधान होयाची इच्छा हाय त्यानं पयले तुमच्या सेवक झाला पायजे. 28जसा कि मी, माणसाचा पोरगा मोठ्या शासका सारखा सेवा करून घ्याले नाई पण स्वता सेवा करण्यासाठी आलाे, अन् लय लोकायच्या मुक्ती साठी आपला जीव अर्पण कऱ्याले आलो हाय.”
फुटक्यायले दुष्टीदान
(मार्क 10:46-52; लूका 18:35-43)
29जवा ते यरीहो शहरातून निघून रायले होते, तवा लोकायची एक मोठी गर्दी त्याच्या मांग आली. 30अन् पाहा, दोन फुटके, जे रस्त्याच्या बाजुले बसलेले होते, त्यायनं हे आयकलं कि येशू ह्या रस्त्यान चालला हाय, ते जोऱ्याने आवाज देऊन म्हणू लागले, कि “हे प्रभू, दाविद राजाच्या पोरा, आमच्यावर दया कर.” 31लोकांनी त्यायले दटावलं कि चूप राहा, पण ते अजूनच जोऱ्याने म्हणू लागले, “हे प्रभू, दाविद राजाच्या पोरा, आमच्यावर दया कर.” 32-33तवा येशू तती थांबला, अन् त्यानं त्यायले बलावून, त्यायले विचारलं, “मी तुमच्यासाठी काय करू?” फुटक्यायनं म्हतलं प्रभू, हे कि आमी डोयान पायलं पायजे. 34येशूले त्यायच्यावर दया आली, अन् त्यानं त्यायच्या डोयायले स्पर्श केला अन् ते तवाच पाह्याले लागले; अन् त्याच्या मागे झाले.

S'ha seleccionat:

मत्तय 20: VAHNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió