मत्तय 26

26
येशूच्या मरणाची योजना
(मार्क 14:1-2; लूका 22:1-2; योहान 11:45-53)
1जवा येशूने ह्या गोष्टी सांगतल्या, तवा आपल्या शिष्यायले म्हणू लागला, 2-5“तुमाले मालूम हाय, कि दोन दिवस झाल्यावर यहुदी लोकायचा फसह सण हाय, व माणसाचा पोरगा वधस्तंभावर चढव्यासाठी पकडल्या जाईन” तवा मुख्ययाजक अन् प्रजाचे यहुदी पुढारी कैफा नावाचा महायाजकाच्या आंगणात जमा झाले, अन् आपआपसात विचार करू लागले कि येशूले कपटाने पकडून मारून टाकू, पण ते म्हणत होते, “सणाच्या वाक्ती नाई, असे नाई व्हावं की लोकायन तांडव करावं.”
येशूवर किंमतीवान तेल ओतणे
(मार्क 14:3-9; योहान 12:1-8)
6जवा येशू बेथानी गावामध्ये शिमोनाच्या घरी गेला जो कुष्ठरोगी होता, 7तवा एक बाई संगमरमरच्या पात्रात सुगंधीत तेल घेऊन आली, अन् जवा येशू जेवण करण्यासाठी बसला होता, तवा त्याच्या डोक्शावर ओतून देले, 8अन् हे पाऊन त्याचे शिष्यायनं रागावून तिले म्हणू लागले, “याचा नाश कावून केला हाय?”
9हे तर चांगल्या पैयशात इकून गरीबायले वाटले जाऊ शकत होते. 10हे जाणून येशूनं त्यायले म्हतलं, “त्या बाईला कावून तरास देता? तिनं तर माह्याल्यासाठी चांगलं काम केलं, 11गोरगरीब तर नेहमी तुमच्यापासी हायत, पण मी नेहमी तुमच्यापासी नाई राईन.
12तिनं जे माह्याल्या डोकश्यावर तेल ओतले हाय, ते मले कबरेत रोयाच्या तयारीसाठी केले हाय. 13मी तुमाले खरं सांगतो, कि साऱ्या जगात जती कुठी देवाच्या सुवार्थेचा प्रचार केल्या जाईन, तती तिच्या ह्या कामाची चर्चा पण तिच्या आठवणीत केल्या जाईन.”
यहुदा इस्कोरोतीचा विश्वासघात
(मार्क 14:10-11; लूका 22:3-6)
14तवा यहुदा इस्कोरोती जो बारा शिष्यायतून एक होता, त्याने मुख्ययाजकापासी जाऊन म्हतलं, 15“जर मी येशूले तुमच्या हाती पकडून देईन, तर मले काय भेटीन” त्यायन त्याले तीस चांदीचे सिक्के मोजून देले, 16अन् ते मौका पावून रायले होते कि त्याले कसं पकडून देऊ.
शिष्यायच्या सोबत बेखमीर भाकरीचे जेवण
(मार्क 14:12-21; लूका 22:7-14,21-23; योहान 13:21-30)
17फसहच्या सणाच्या पयल्या दिवशी ते फसहचा कोकरू बलिदान करत जात, येशूच्या शिष्यायनं त्याले म्हतलं, कि “तुह्य म्हणनं काय हाय, कि आमी कुठं जाऊन तुह्यासाठी फसह सणाच जेवण तयार करू?” 18येशूनं म्हतलं, “नगरात एका माणसाच्या घरी जा अन् त्याले म्हणा, गुरुजी म्हणते, कि माह्याली वेळ जवळ हाय, मी माह्या शिष्याई संग फसह सणाच बेखमीर जेवण खाऊ.” 19तवा शिष्यांनी येशूची आज्ञा मानली, अन् बेखमीर फसह सणाच जेवण तयार केलं.
20जवा संध्याकाळ झाली तवा येशू आपल्या बारा शिष्याई संग जेव्याले बसला, 21जवा ते जेवून रायले होते, तवा येशूनं त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं सांगतो, कि तुमच्याय पैकी एक मले पकडून देईन.” 22यावरून ते लय नाराज झाले, अन् एक-एक जन त्याले विचारायले लागले कि मी हाय का तो हाय? 23तवा येशूनं उत्तर देलं, “ज्यानं माह्याल्या संग पानदानात हात टाकले, तोच मले पकडून देईन.
24पण मी, माणसाचा पोरगा जसं त्याच्या बाऱ्यात लिवलेल हाय कि, तो मरणारच, पण त्या माणसासाठी दुख हाय, कि त्याच्यापासून माणसाचा पोरगा पकडल्या जातो त्या माणसाचा जन्म नसता झाला ते त्याच्यासाठी चांगलं असतं.” 25जो त्याले पकडून देणार होता, त्या यहुदा इस्कोरोतीने त्याले म्हतलं, कि “हे गुरुजी कि मी हाय का तो हाय?” येशूनं त्याले म्हतलं हो“ तू म्हतलं तसच.”
प्रभू भोज
(मार्क 14:22-26; लूका 22:15-20; 1 करिं 11:23-25)
26जवा ते जेवू रायले, तवा येशूनं भाकर घेतली, अन् देवाले धन्यवाद देऊन मोडली, अन् शिष्यांना देऊन म्हतलं, “घ्या अन् खा, हे माह्याल शरीर हाय.” 27मंग त्यानं अंगुराच्या रसाचा प्याला घेतला, धन्यवाद देला, अन् शिष्यायले देऊन म्हतलं, तुमी याच्यातून प्या.
28कावून कि हे माह्याले नवीन कराराचे रक्त हाय, जे साऱ्या लोकायच्या पापाच्या क्षमा साठी ओतल गेले हाय. 29मी तुमाले खरं सांगतो, कि अंगुराचा रस त्या दिवसापरेंत पेईन नाई जोपरेंत माह्या देवाच्या राज्यात नवीन नाई पेईन. 30मंग ते भजन गायन करत बायर जैतून पहाडावर गेले.
पतरसची नकाराची भविष्यवाणी
(मार्क 14:27-31; लूका 22:31-34; योहान 13:36-38)
31तवा येशूने त्यायले म्हतलं “तुमी सगळे आज माह्याल्या बद्दल अपमानित व्हाल, कावून कि असा पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, मी मेंढपाळकाले मारीन, अन् कळपातले मेंढरे फानाफान होईन. 32पण त्यानंतर मी मरणातून जिवंत झाल्यावर तुमच्या पयले गालील प्रांतात जाईन तती तुमाले भेटीन”
33तवा पतरसन त्याले उत्तर देलं, “आपल्या विषयी सर्व अपमानित होतीन पण मी कधीही अपमानित होणार नाई.” 34येशूनं त्याले म्हतलं “मी तुले खरोखर सांगतो ह्याच रात्री कोंबडा बाग देण्याच्या पयले तू तीन वेळा मले नाकारसीन, अन् असचं सर्व्या शिष्यायनं पण म्हतलं.” 35तवा पतरसने त्याले म्हतलं, “जर मले तुह्या संग मरावे लागलं तरी मी तुह्या नाकार कधीच करीन नाई.” तवा सगळ्या शिष्यायनं तसचं म्हतलं.
गतसमनीच्या बागेत प्रार्थना
(मार्क 14:32-42; लूका 22:39-46)
36जवा येशू शिष्यायबरोबर गतसमनी नावाच्या एकाजागी आला अन् आपल्या “शिष्यायले म्हतलं कि अती बसून रायजा जतलग मी तती जाऊन प्रार्थना करतो.” 37अन् येशू पतरसले अन् जब्दीच्या दोन्ही पोरांना संग घेऊन गेला अन् लय दुखी अन् व्याकूळ होऊन रायला होता. 38तवा येशूनं त्यायले म्हतलं, “माह्य मन लय उदास झालं हाय, अतपर्यंत मले वाटते कि मी मरणार हावो, तुमी अती थांबा अन् माह्याल्या संग जागे राहा.”
39मंग तो समोर जाऊन जमिनीवर टोंगे टेकून उभडा पडला, अन् त्यानं अशी प्रार्थना केली, “हे माह्याल्या बापा होईन तर हा दुखाचा प्याला माह्याल्या पासून दूर ठेव, तरी पण माह्याली नाई पण तुह्याली इच्छा पूर्ण होवो.” 40मंग तो शिष्यायच्या पासी आला तवा त्यानं पायलं कि ते झोपलेले होते, तवा पतरसले म्हतलं कि “काय तुमी माह्याल्या सोबत एक घंटा पण जागे राहू नाई शकले?
41तुमी जागे राहा अन् प्रार्थना करत राहा कि तुमी परीक्षात पडून पाप नाई करावं, आत्मा तर तयार हाय, पण शरीर अशक्त हाय.” 42आणखी त्यानं दुसऱ्यांदा प्रार्थना केली, “हे माह्याल्या बापा जर हे दुख मी भोगल्या शिवाय हटून जाऊ नाई शकत तर तुह्याल्या इच्छेच्या प्रमाणे माह्याल्या सोबत होवो.” 43मंग येशू परत वापस येऊन त्यायले झोपलेलं पायलं, कारण कि त्यायचे डोये झोपीच्या गुंगीत भरलेले होते.
44त्यायले सोडून तो परत चालला गेला, अन् त्याचं शब्दामध्ये तिसऱ्या वेळ प्रार्थना केली, 45अन् येशूनं शिष्याच्या पासी येऊन त्यायले म्हतलं, “आता झोपून राहा अन् आराम करा, पाहा, वेळ जवळ आली हाय, अन् पाहा माणसाचा पोरगा पापी माणसाच्या हाती धरून देल्या जाईन. 46उठा, चला! पाहा, मले पकळणाऱ्याले मदत करणारा जवळ येऊन रायला हाय.”
येशूला पकडने
(मार्क 14:43-50; लूका 22:47-53; योहान 18:3-12)
47तो हे म्हणूनच रायला होता, तवा यहुदा इस्कोरोतीने जो बारा शिष्या मधून एक होता, आला अन् त्याच्या सोबत मुख्ययाजक अन् यहुदी पुढाऱ्या कडून मोठ्या-मोठ्या तलवारा अन् काड्या घेऊन आले. 48अन् येशूले पकळवून देणाऱ्या यहुदा इस्करोतीन त्यायले हे सांगतल होतं कि “ज्याचा मी मुका घेईन तोच येशू हाय, त्यालेच पकडान.” 49अन् तवा लवकरच येशूच्या पासी येऊन म्हतलं, “हे गुरुजी नमस्कार” अन् यहुदा इस्करोतीन येशूचे मुके घेतले.
50येशूने त्याले म्हतलं, “हे दोस्ता ज्या कामासाठी तू आला हाय, ते कर” तवा त्यायन येशूवर हात टाकले अन् त्याले पकडून घेतलं 51तवा येशूच्या साथीदारा पैकी एकाने हात लांब करून आपली तलवार बायर काढली व महायाजकाच्या दासावर प्रहार केला अन् त्याचा कान कापून टाकला. 52तवा येशूनं त्याले म्हतलं, आपली तलवार म्यानात मधी वापस घाल कावून कि तलवार चालवणारे सर्व जन तलवारीने नाश केल्या जातीन.
53काय तुले माईत नाई? कि मी माह्या देवबापापासी विनंती करू शकतो अन् तो आताच्या आताच माह्यासाठी देवदूतायच्या बारा सैनिकाच्या तुकड्याहून अधिक पाठवून देईन; 54पण जर मी केलं तर पवित्रशास्त्राचा शास्त्रलेख कसा पुरा होणार, जे सांगते कि आता काय होयाले पायजे?
55त्याचं वेळी येशूनं लोकायच्या गर्दीले म्हतलं, “काय तुमी डाकू समजून तलवार अन् काळ्या घेऊन मले पकड्याले आले? मी तर दररोज देवळात तुमच्या संग राऊन उपदेश देत होतो, अन् तवा तुमी मले नाई पकडलं. 56पण हे सगळं ह्या साठी झालं हाय, कि भविष्यवक्त्यायचे वचन पूर्ण हो.” तवा सगळे शिष्य त्याले सोडून पळून गेले.
कैफा महायाजका समोर येशू
(मार्क 14:53-65; लूका 22:54-55,63-71; योहान 18:13-14,19-24)
57मंग येशूले बंदी करणाऱ्यानी त्याले कैफा नावाच्या महायाजकापासी नेलं, जती मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् यहुदी पुढारी लोकं जमले होते. 58अन् पतरस दुरून-दुरून येशूच्या मांग महायाजकाच्या आंगणात अंदर परेंत गेला, अन् अंदर जाऊन, शेवट पायण्यासाठी सेवका पासी जाऊन बसला. 59मुख्ययाजक अन् साऱ्या न्यायसभेचे पुढारी येशूले मारून टाकासाठी त्याच्या विरोधात साक्षीदार पाऊन रायले होते.
60अन् बरेचशे त्याच्या विरोधात खोटी साक्ष देऊन रायले होते, त्यायले येशूले मारून टाकाचं कारण भेटला नाई, तरी आखरी मध्ये दोघजन आले. 61अन् म्हतलं, “याने म्हतलं हाय कि मी देवाच्या देवळाले मोडू शकतो अन् तीन दिवसात त्याले बांधू शकतो.” 62तवा महायाजकानं सभेच्या मधात उभं राहून येशूले म्हतलं कि “तू कोणतचं उत्तर नाई देत? हे लोकं तुह्यावाल्या विरोधात वेगवेगळ्या साक्ष देतात स्वताले वाचव्यासाठी तू काईच बोलत नाई?”
63पण येशू चूप रायला, तवा महायाजकानं त्याले अजून विचारलं “मी तुले जिवंत देवाची शपत देतो, जर तू देवाचा पोरगा ख्रिस्त हायस, तर आमाले सांग.” 64येशूने त्याले म्हतलं, “तू स्वताच हे म्हतलं हाय, पण मी तुमाले हे म्हणतो, आतापासून तू माणसाच्या पोराले सर्वशक्तिमान देवाच्या उजव्या बाजूने बसलेला अन् अभायातून ढगावर येताने पायसान.”
65तवा महायाजकानं आपले कपडे फाडून म्हतलं, “कि त्यानं देवाची निंदा केली हाय, आता आमाले साक्षीदारायची काई गरज नाई. पाहा आता तुमी तो अपमान आयकलं हाय. 66तुमी ह्याले कोणता दंड द्यायचा विचार करता?” तवा त्यायनं उत्तर देलं, “हा मरण दंडाचा योग्य हाय.” 67तवा त्यायनं त्याच्यावाल्या तोंडावर थुकले अन् त्याले कोडे फटके मारले, कोम्बे मारले, दुसऱ्यानं थापड मारली अन् त्याले थट्टा करून म्हतलं, 68“अरे ख्रिस्ता आमाले भविष्यवाणीच्या व्दारे सांग कि तुले कोण मारलं?”
पतरस पासून येशूले नाकारणे
(मार्क 14:66-72; लूका 22:56-62; योहान 18:15-18,25-27)
69तवा पतरस बायर आंगणात बसलेला होता, तवा एक दासी त्याच्यापासी आली अन् म्हतलं, “तू पण येशू जो गालील प्रांताचा माणूस हाय त्याच्या संग होता.” 70तवा पतरसन सगळ्याच्या समोर म्हणा केलं, अन् म्हतलं कि “मले नाई माईत कि, तू काय म्हतलं.” 71जवा पतरस बायर देवडीवर गेला तवा दुसऱ्या दासीन त्याले पाऊन म्हतलं, “हा तर त्या नासरत नगरच्या येशू संग होता.”
72परत त्यानं शपत खाल्ली अन् म्हतलं, “कि मी त्या माणसाले ओयखत नाई.” 73मंग काई वेळा नंतर ततीसाक उभे रायणारे जवळ येऊन पतरसला म्हतलं, “खरोखर तू पण त्यातला हायस, कावून कि तुह्याल्या बोली वरून मालूम पडते कि तू गालील प्रांतातला हायस.”
74तवा तो धीक्कारून शपत खाऊ लागला अन् म्हणू लागला, “मी त्या माणसाले ओयखत नाई,” तेवढ्यात कोंबड्याने आरोळी केली. 75तवा “कोंबडा आरोळी करण्यापूर्वी तू तीन वेळा माह्या नकार करशीन,” असे जे येशूने पतरसला सांगतले होते ते त्याले आठवले तवा तो बायर जाऊन मोठं-मोठ्याने दु:खात रडू लागला.

S'ha seleccionat:

मत्तय 26: VAHNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió