मत्तय 27

27
पिलातुसच्या समोर येशू
(मार्क 15:1; लूका 23:1-2; योहान 18:28-32; प्रेषित 1:18-19)
1सकाळी-सकाळी सगळे मुख्ययाजक अन् यहुदी पुढाऱ्यायन येशूले मारून टाक्यासाठी निर्णय केला. 2त्यायनं येशूले बांधून घेतलं अन् त्याले नेऊन पिलातुस राज्यपालाच्या ताब्यात देलं कि त्याचा न्याय करावा.
यहूदाने आत्महत्या केली
(प्रेषित 1:18,19)
3जवा येशूले पकडणाऱ्या यहुदा इस्कोरोतीले मालूम झालं, कि येशूले मारून टाक्यासाठी दोषी ठरवलं हाय तवा तो पसतावला अन् तीस चांदीच्या सिक्के आणून मुख्ययाजकायले अन् यहुदी पुढाऱ्यायले वापस देले. 4अन् त्यानं म्हतलं, “मी निर्दोष माणसाले मारून टाक्याले, त्याले पकडवून पाप केलं हाय,” त्यायनं म्हतलं “आमी त्या विषयात काळजी नाई करत याच्यासाठी जबाबदार हा.”
5तवा त्यानं चांदीच्या सिक्क्याले देवळात फेकून देले अन् चालला गेला अन् जाऊन आपल्या स्वताले फासी लावली. 6मुख्ययाजकांनी त्या पैशांना घेऊन म्हतलं, “ते पैसे तिजोरीत ठेवण ठिक नाई कावून कि हे माणसाची हत्या करून भेटलेले पैसे हायत.” 7मंग त्यायन आपआपसात विचार करून त्या पैशायनं परदेशातल्या लोकायले रोयासाठी कुंभारा पासून वावर विकत घेतलं.
8तवा पासून तर आजपर्यंत त्या वावराले रक्ताचे वावर असं म्हणतात. 9तवा “जे वचन यिर्मया भविष्यवक्त्याच्या व्दारे सांगतल्या गेले होतं ते पूर्ण झालं, ते असं कि अन् त्यायन ते तीस सिक्के म्हणजे ते किंमत जे#27:9 यिर्मया भविष्यवक्त्याच्या व्दारे सांगतल्या गेले होतं ते पूर्ण झालं, ते असं कि अन् त्यायन ते तीस सिक्के म्हणजे ते किंमत जे खऱ्या मध्ये हा विचार जखऱ्या भविष्यवक्त्याच्या पुस्तकातून घेतला हाय इस्राएल देशाच्या लोकायन त्याच्यासाठी द्यासाठी मान्य झाले होते.” 10अन् जशी प्रभून मले आज्ञा देली होती, तसचं त्यायनं त्याचा उपयोग कुंभाराचे वावर विकत घेयासाठी केला.
पिलातुसचा येशूला प्रश्न
(मार्क 15:2-5; लूका 23:3-5; योहान 18:33-38)
11जवा येशू पिलातुस राज्यपालाच्या समोर उभा होता, तवा पिलातुसन त्याले विचारलं काय “तू यहुदी लोकायचा राजा हायस?” येशूने त्याले म्हतलं, “तू स्वताचं हे म्हणत हाय.” 12जवा मुख्ययाजक अन् यहुदी पुढारी लोकं येशूवर लय आरोप लाऊन रायले होते. तवा त्यानं काईच उत्तर नाई देलं
13यावर पिलातुसन येशूले म्हतलं, “काय तुले आयकू येत नाई काय कि हे तुह्याला विरोधात किती साक्ष देऊ रायले हाय?” 14पण येशूनं त्याले काहीच उत्तर देलं नाई, या गोष्टीवर राज्यपालाले पण लय आश्यर्य वाटलं.
मरण दंडाची आज्ञा
(मार्क 15:6-15; लूका 23:13-25; योहान 18:39-19:16)
15पिलातुस राज्यपालाची हे रीत होती, कि फसहच्या सणाले ते लोकायसाठी कोण्या एका कैद्याले ज्याले लोकं म्हणत होते त्याले तो सोडून देत होता. 16त्यावाक्ती त्यायच्या जवळ बरब्बा नावाचा एक मानलेला कैदी होता.
17जवा ते सर्वे लोकं एकत्र झाले तवा पिलातुस राज्यपालन त्यायले म्हतलं, तुमाले कोण पायजे, कि मी तुमच्यासाठी कोणाले सोडून देऊ, बरब्बाले या येशूले जो ख्रिस्त म्हणल्या जाते?
18कावून कि पिलातूसले मालूम होतं कि त्यायनं त्याले हेव्यान धरलं हाय. 19जवा पिलातुस न्यायाच्या गादीवर बसलेला होता, तवा त्याच्या बायकोनं त्याले निरोप पाठवला कि “तू त्या धर्मी माणसाच्या बाऱ्यात हात नको टाकू, कावून कि मी काल सपनामध्ये त्याच्यावाल्या कारणाने लय दुख झेलले हाय.”
20मुख्ययाजक अन् यहुदी पुढारी लोकायन, लोकायले उकसवलं कि त्यायन बरब्बाले सोडून द्या अन् येशूले मारून टाकावं. 21पिलातुस राज्यपालाने लोकायले विचारलं, “या दोघायपैकी कोणाले तुमच्यासाठी सोडू,” लोकायन म्हतलं “बरब्बाले सोड.” 22पिलातुसन लोकायले विचारलं, “मंग येशू जो ख्रिस्त म्हणल्या जाते, त्याचं काय करावं?” सगळ्यांनी पिलातुसले म्हतलं, “त्याले वधस्तंभावर चढवा.”
23पिलातुसन म्हतलं, “कावून त्यानं असं कोणत बेकार काम केलं हाय?” पण ते अजूनच ओरडून-ओरडून म्हणत होते “त्याले वधस्तंभावर चढवा.” 24जवा पिलातुसन पायलं कि काहीही केले तरी लोकायचा तांडव थांबू नाई रायला तवा त्यानं पाणी घेऊन गर्दीच्या समोर आपले हात धुतले अन् म्हतलं, “मी या धर्मीच्या रक्ताने निर्दोष हाय, तुमचं तुमीच पाहा.”
25तवा सगळ्या लोकायन उत्तर देलं, “याले माऱ्याचा दोष आमच्यावर अन् आमच्या लेकरावर असो.” 26यावरून त्यानं बरब्बाले त्यायच्यासाठी सोडून देलं, अन् येशूले कोडे मारून त्यायच्यापासी देऊन देलं, कि त्याले वधस्तंभावर चढवलं जावं.
शिफायापासून येशूचा अपमान
(मार्क 15:16-20; योहान 19:2-3)
27तवा राज्यपालाच्या शिपायायने येशूले किल्ल्यावर नेऊन सगळ्या शिपायायले त्याच्यावाल्या चवभवंताल एकत्र जमवले. 28अन् त्याचेवाले कपडे काढून त्याले लाल रंगाचा झगा घालून देला. 29अन् काट्याचा मुकुट गुंफुन त्याच्या डोकश्यावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात काठी देली अन् थट्टा करासाठी त्याच्यावाल्या समोर टोंगे टेकून म्हणू लागले “हे यहुदी लोकायचा राजा नमस्कार.”
30ते त्याच्यावर थुकले व तेच काठी घेऊन ते त्याच्यावाल्या डोकश्यावर मारू लागले. 31मंग त्याच्यावाली मजाक केल्यावर त्यायनं त्याच्या आंगावरचे जांभळे कपडे काढले, अन् त्याचे सोताचे कपडे त्याले वापस घालून देले, अन् ते त्याले वधस्तंभावर चढवण्यासाठी घेऊन गेले.
येशूला वधस्तंभावर चढवणे
(मार्क 15:21-32; लूका 23:26-39; योहान 19:17-19)
32ते बायर जात असता शिमोन नावाचा कोणी एक कुरेणी शहरात रायणारा माणूस त्यायले भेटला, त्याले त्यायनं येशूचा वधस्तंभ वाहण्याकरिता धरले. 33मंग गुलगुता नावाच्या जागी, म्हणजे कवटीची जागा म्हणल्या जाते ततीसा येऊन पोहचले. 34तवा शिपायायनं त्याले पित्त मिश्रित अंगुराचा रस पियाले देला, पण त्याले चोखल्यावर येशूनं तो पेला नाई.
35मंग त्यायनं येशूले वधस्तंभावर चढवलं, अन् त्याच्या झग्यातून कोणता कपडा कोण घ्यायचा ह्या साठी त्यावर चिठ्ठ्या टाकून त्या वाटून घेतल्या 36अन् ततीसाक बसून त्याच्यावर पहारा देऊ लागले. 37त्यायनं त्याच्या डोकश्यावर दोषपत्र लिवून लावला, तो असा कि “हा यहुदी लोकायचा राजा येशू हाय.”
38त्याचं वेळी त्यायनं त्याच्याबरोबर दोन चोरायले एकाले उजव्या बाजूने अन् एकाले डाव्या बाजुने असे वधस्तंभावर चढविले होते. 39अन् जवळून येणारे जाणारे डोके वरते करून त्याच्यावाली अशी निंदा करत होते, 40अन् हे म्हणत होते, “हे देवळाले पाडणाऱ्या अन् तिसऱ्या दिवशी बनवणाऱ्या आपल्या स्वताले वाचव, जर तू देवाचा पोरगा हायस तर वधस्तंभावरून उतरून खाली ये.”
41अशाप्रकारे मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् यहुदी पुढारी लोकं सगळे मिळून येशूची थट्टा मजाक करून म्हणत होते, 42“यानं दुसऱ्याले तारलं, अन् आपल्या स्वताले वाचवू शकत नाई. हा तर इस्राएल देशचा राजा हाय. आताच जर वधस्तंभावरून उतरून येईन तर आमी त्याच्यावर विश्वास करू.
43त्यानं देवावर भरोसा ठेवला हाय, जर देवाले वाटीन तर याले आता सोडवलं पायजे, कावून कि यानं म्हतलं होतं कि मी देवाचा पोरगा हाय.” 44अशाचं प्रकारे डाकू पण त्यायच्यावाल्या बरोबर जे वधस्तंभावर चढवले होते, ते पण त्याची निंदा करत होते.
येशूचे प्राण सोडणे
(मार्क 15:33-41; लूका 23:44-49; योहान 19:28-30)
45अन् दुपार पासून, जवळपास बारा ते तीन वाजेपर्यंत सगळ्या देशात अंधार पडला. 46तिसऱ्या पहरीच्या जवळ येशूने मोठ्याने आरोळी ठोकली, अन् म्हतलं, “एली-एली लमा शबक्तनी,” “अर्थात हे माह्या देवा हे माह्या देवा तू मले कावून सोडून देलं?”
47तवा तती त्याच्या जवळ उभे रायनाऱ्या लोकाय पैकी कईकायनं हे आयकून म्हतलं, पाहा, “तो एलिया भविष्यवक्त्याले हाका मारू रायला हाय. 48त्यायच्यातून एक जन धावत जाऊन स्पंज घेतला अन् तो कडू रसात डूबवून काळीच्या टोकावर ठेवून त्याले चोखण्यास देला.”
49कईकांनी म्हतलं, “वाट पाहा एलिया भविष्यवक्ता त्याले वाचव्याले येते काय ते पाहू.” 50मंग येशूने मोठ्याने ओरडून आपला जीव सोडला. 51तवा देवळातला जाळा पर्दा जो सर्व्या देखत देवाच्या उपस्थितीत प्रवेश कऱ्याले थांबवत होता, तो वरून खाल परेंत फाटला अन् त्याचे दोन तुकडे झाले, जमीन फाटली, अन् खडक फुटले.
52अन् कब्रा उघडल्या, अन् मेलेल्या पवित्र लोकायचे शरीर कब्रेतून जिवंत झाले. 53अन् ते येशूच्या मेलेल्यातून परत जिवंत झाल्यावर कब्रेतून बायर निघाले अन् पवित्र यरुशलेम शहरात गेले, अन् लय लोकायले दिसले. 54तवा शंभर शिपायायचा अधिकारी अन् जे त्याच्या संग येशूचा पहरा देवू रायले होते, भूकंप अन् जे काई झालं होतं, त्याले पाऊन लय भेले होते, अन् म्हणू लागले “खरचं हा माणूस देवाचा पोरगा होता.”
55तती बऱ्याचं बाया ज्या गालील प्रांतातून येशूची सेवा करत त्याच्यावाल्या संग आल्या होत्या, दुरूनच हे पायतं होत्या. 56त्यायच्यात मगदला गावची मरिया अन् याकोब अन् योसेस ची माय मरिया जी जब्दीच्या पोराची माय होती.
येशूला रोयने
(मार्क 15:42-47; लूका 23:50-56; योहान 19:38-42)
57जवा संध्याकाळ झाली, तवा योसेफ नावाचा अरीमतियाह शहराचा एक धनवान माणूस जो स्वता येशूचा शिष्य होता, तती आला. 58त्यानं पिलातुस पासी जाऊन येशूचे शव मांगतले, यावर पिलातुसन देऊन देण्याची आज्ञा देली. 59योसेफ ने शरीर घेतले अन् एका स्वच्छ चादरीत गुंडाळले.
60अन् त्याले आपल्या नवीन कबरे मध्ये ठेवलं, जे त्याने पहाडावर खोदलेली होती, अन् कबरेच्या दरवाज्यावर मोठा गोटा ढकलून तो चालला गेला. 61मगदला गावची मरिया अन् दुसरी मरिया ततीसा कबरे पासी समोर बसल्या होत्या.
येशूच्या कब्रेवर पहरा
62दुसऱ्या दिवशी जो आरामाचा दिवसाच्या बादचा दिवस होता, मुख्ययाजक अन् परुशी लोकायन पिलातुस पासी एकत्र होऊन म्हतलं, 63“हे राज्यपाल, आमाले आठवण हाय, त्या फसवणाऱ्यान असं म्हतलं जवा तो जिवंत होता, त्यानं म्हतलं होतं, कि मी तीन दिवसानं परत जिवंत होईन.
64म्हणून तिसऱ्या दिवसापरेंत कब्रेची राखण करण्यासाठी शिपायायले सांगावे नाई तर कदाचित त्याच्यावाले शिष्य त्याले येऊन त्याले चोरून नेतीन व तो मेलेल्यातून जिवंत झाला हाय असं सांगतीन, मंग शेवटचा धोका पयल्यापेक्षा बेकार होईन.”
65तवा पिलातुसन त्यायले म्हतलं, “तुमच्यापासी पहरेदारा तर हाय, जा तुमच्याने होईन तसा बंदोबस करा, अन् कब्रेची राखण करा.” 66मंग ते पहरेदारायले आपल्या सोबत घेवून गेले, अन् त्यायनं गोट्यावर मुहर लावून, कब्रेची राखण केली, जेणे करून कोणी त्या गोट्याले गंडलवलं नाई पायजे.

S'ha seleccionat:

मत्तय 27: VAHNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió