Logo YouVersion
Ikona vyhledávání

मत्तय 1

1
येशू ख्रिस्ताची वंशावली
(लूका 3:23-38)
1हे येशू ख्रिस्ताच्या खानदानाच्या नावाची यादी हाय, तो दाविद राजाच्या वंशातला हाय, जो अब्राहामचा वंशज हाय. 2अब्राहामाचा पोरगा इसहाक होता, अन् इसहाकाचा पोरगा याकोब होता, अन् याकोब यहुदा अन् त्याच्यावाल्या भावाचा बाप होता. 3अन् यहुदाचे पोरं पेसेस व जेरह होते व तामार त्यायची माय होती अन् पेरेसाचा पोरगा हेस्रोन होता, व हेस्रोनाचा पोरगा अराम होता.
4अन् अरामाचा पोरगा अम्मीनादाब होता व अम्मीनादाबाचा पोरगा नहशोन होता अन् नहशोनाचा पोरगा सल्मोन होता. 5अन् सल्मोन अन् राहाबचा पोरगा बवाज होता, बवाज अन् रुथचा पोरगा ओबेद होता, रुथ व राहाब दोघी पण यहुदी नाई होते, अन् ओबेदाचा पोरगा इशाय होता.
6अन् इशायचा पोरगा राजा दाविद होता, अन् दाविद राजाचा पोरगा सुलैमान होता, अन् त्याची माय ते बाई होती जे पयले उरीयाची बायको होती. 7अन् सुलैमानाचा पोरगा रहबाम होता, अन् रहबामाचा पोरगा अबिया होता, अन् अबियाचा पोरगा आसा होता. 8अन् आसाचा पोरगा यहोशापात होता, अन् यहोशापातचा पोरगा योराम होता, अन् योरामाचा पोरगा उज्जीया होता.
9अन् उज्जीयाचा पोरगा योताम होता, अन् योतामाचा पोरगा आहाज होता, अन् आहाजचा पोरगा हिजकिय्या होता. 10अन् हिजकिय्याचा पोरगा मनश्शे होता, अन् मनश्शेचा पोरगा आमोन होता, अन् आमोनाचा पोरगा योशिया होता. 11योशिया हा यखन्या अन् त्याच्यावाल्या भावायचा आबाजी होता, जो इस्राएली लोकायले बाबेल शहरात बंदी घेऊन जायच्या पयले जन्मला होता.
12अन् बंदी होऊन बाबेल शहरात जाण्याच्या पयले पासून तर येशूच्या जन्माच्या परेंत हे त्याचे वंशज होते, यखन्याचा पोरगा शालतीर होता, अन् शालतीर जरुबाबेलचा पोरगा होता. 13अन् जरुबाबेलचा पोरगा अबिहुदाल होता, अन् अबुहुदालचा पोरगा इल्याकिम होता, अन् इल्याकिमचा पोरगा अज्जुर होता. 14अन् अज्जुरचा पोरगा सादोक होता, अन् सादोकाचा पोरगा याखीम होता, अन् याखीमाचा पोरगा इलीहुदाल होता.
15अन् इलीहुदाचा पोरगा इलीयाजर होता, अन् इलीयाजरचा पोरगा मत्तान होता अन् मत्तानाचा पोरगा याकोब होता. 16अन् याकोबाचा पोरगा योसेफ होता, जो मरीयेचा नवरा होता, व मरिया येशूची माय होती, ज्याले ख्रिस्त म्हणतात. 17अब्राहामापासून तर दाविद राजा परेंत सगळ्या चवदा पिढ्या झाल्या, अन् दाविद राजा पासून इस्राएल लोकायले बाबेल शहरात बंदी होऊन जाया परेंत चवदा पिढ्या झाल्या, अन् बाबेलात बंदी होऊन जायाच्या वाक्ती पासून तर येशू ख्रिस्ता परेंत चवदा पिढ्या झाल्या.
येशू ख्रिस्ताचा जन्म
(लूका 2:1-7)
18अन् येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पयले ह्या प्रकारे झालं, येशूच्या माय मरियाची सोयरिक योसेफाच्या संग झाली, अन् ते एकत्र येण्याच्या पयले, पवित्र आत्म्यापासून गर्भवती दिसून आली . 19पण योसेफ हा धार्मिक माणूस होता. अन् तो तिले सगळ्या समोर बदनाम करावं नाई म्हणून चुपचाप आपली सोयरिक तोडाचा विचार करत होता. 20जवा तो ह्या गोष्टीचा विचारात होता, तवा प्रभूचा संदेश घेऊन येणारा एक देवदूत त्याले सपनात दिसून आला अन् म्हणू लागला, “हे योसेफा दाविद राजाच्या वंशज तू मरियाले आपली बायको करण्यासाठी भेऊ नको, कावून कि जे तिच्या गर्भात हाय, ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे हाय.
21अन् तिले एक बाळ होईन, अन् त्याचं नाव येशू ठेवजो कावून कि तो आपल्या लोकायले त्यायच्या पापांपासून वाचविन.” 22अन् हे सगळे ह्या साठी झालं, कि ते सगळं पुरं हून जावं जे देवानं यशाया भविष्यवक्ताच्या इकून येशूच्या जन्माच्या बद्दल म्हतलं होतं. 23“ते असे कि पाहा एक कुमारी गर्भवती होईन, अन् एका बाळाले जन्म देईन, अन् त्याचं नाव इम्मानुएल ठेवण्यात येईन” त्याच्या अर्थ हा हाय कि देव आमच्या बरोबर हाय.
24तवा योसेफ झोपितून उठल्यावर त्यानं देवदूतान जशी आज्ञा देली होती, तसेच केलं व त्यानं मरिया सोबत लग्न केलं अन् तिले आपल्या घरी घेऊन आला. 25अन् ते दोघं बाळाले जन्म द्या परेंत, त्यायनं एकामेका संग शारीरिक समंध केला नाई, अन् जवा बाळाचा जन्म झाला तवा योसेफन त्याचं नाव येशू ठेवलं.

Právě zvoleno:

मत्तय 1: VAHNT

Zvýraznění

Sdílet

Kopírovat

None

Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas