1
योहान 13:34-35
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मी तुम्हांला एक नवीन आज्ञा देतो:तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”
Vertaa
Tutki योहान 13:34-35
2
योहान 13:14-15
प्रभू व गुरू असूनही मी तुमचे पाय धुतले. मग तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. जसे मी तुमच्यासाठी केले, तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे.
Tutki योहान 13:14-15
3
योहान 13:7
येशूने त्याला उत्तर दिले, “मी जे करत आहे ते तुला आता कळणार नाही. ते तुला पुढे कळेल.”
Tutki योहान 13:7
4
योहान 13:16
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही.
Tutki योहान 13:16
5
योहान 13:17
जर ह्या गोष्टी तुम्हांला समजल्या, तर त्या केल्याने तुम्ही किती धन्य ठराल!
Tutki योहान 13:17
6
योहान 13:4-5
रात्रीचे भोजन होत असताना येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपले बाह्य वस्त्र काढले व एक टावेल घेऊन आपल्या कमरेला बांधला. नंतर घंगाळात पाणी ओतून तो शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या टावेलने पुसू लागला.
Tutki योहान 13:4-5
Koti
Raamattu
Suunnitelmat
Videot