मत्तय 22

22
लगीनना जेवणना दृष्टांत
(लूक १४:१५-२४)
1येशु परत त्यासले दृष्टांत दिसन बोलना; 2स्वर्गनं राज्य एक राजाना मायक शे, त्यानी त्याना पोऱ्याना लगीननं जेवण दिधं; 3अनी लगीनना जेवणकरता ज्यासले निवतं देयल व्हतं त्यासले बलावाकरता त्यानी त्याना सेवकसले धाडं, पण त्या ई नही राहींतात. 4परत त्यानी दुसरा सेवकसले धाडीन सांगं, की, निमंत्रीत लोकसले सांगा, दखा, मी जेवण तयार करेल शे, मना बोकड्या अनं कोंबड्या कापाई जायेल शेतस, सर्व तयार शे, लगीनना जेवणले चला. 5तरी हाई त्यासनी मनवर नही लिधं अनी त्या काहीजण वावरमा, काहीजण व्यापारले निंघी गयात. 6बाकीना निवतं मिळेल लोकसनी राजाना दाससले धरीन, त्यासना छळ करीसन मारी टाकात. 7तवय राजाले राग वना; अनी त्यानी आपला सैन्यले धाडीसन त्या घातकीसना नाश करा अनी त्यासना शहर जाळी टाकं. 8मंग तो आपला दाससले बोलना, लगीननी तयारी व्हई जायेल शे, हाई खरं, पण आमंत्रित योग्य नव्हतात. 9म्हणीन तुम्हीन बाहेर रस्तासवर जा अनी जितला तुमले दखायतीन तितलासले लगीनना जेवणकरता बलाई आणा. 10मंग त्या दाससनी रस्तावर जाईन ज्या बी त्यासले बरा वाईट भेटणात, त्या सर्वासले एकत्र करा अनी जेवाकरता येल आमंत्रितसघाई लगीनघर भरी गयं. 11राजा जेवणारासले दखाले वना, तवय तठे लगीनना कपडा घालीन येल नही असा एक माणुस त्याले दखायना. 12तवय तो त्याले बोलना, दोस्त, तु लगीनना कपडा न घालता आठे कशा काय वना? त्यानी काहीच उत्तर दिधं नही. 13#मत्तय ८:१२; २५:३०; लूक १३:२८मंग राजानी सेवकसले सांगं, याना हात पाय बांधीन याले अंधारमा टाका, तठे रडणं अनी दातखाणं चालस. 14बलायेल बराच शेतस, पण निवडेल थोडाच शेतस.
कैसर राजाले कर देवाबद्दल प्रश्न
(मार्क १२:१३-१७; लूक २०:२०-२६)
15मंग परूशीसनी जाईन आपसमा चर्चा करी की, येशुले त्यानाच बोलानामा कश फसाडानं 16याकरता त्यासनी आपला शिष्यसले हेरोदी पक्षना लोकससंगे त्यानाकडे धाडीन सांगं, गुरजी, आमले माहित शे की, तुम्हीन खरा शेतस, देवना मार्ग खरापणतीन सांगतस, तुम्हीन मनुष्यसनं मत अनी ईच्छासघाई प्रभावित होतस नही, कारण तुम्हीन लोकसनं तोंड दखीन बोलतस नही. 17तुमले काय वाटस हाई आमले सांगा, कैसरले कर देवाणा हाई योग्य शे की नही? 18येशु त्यासना मनमाधलं कपट वळखीन बोलना, अरे ढोंगीसवन का बर मनी परिक्षा दखतस? 19कर देतस ते नाणं दखाडा; तवय त्यासनी त्यानाजोडे एक नाणं अनी दिधं. 20त्यानी त्यासले ईचारं, यावर कोणं चित्र अनं लेख शे? 21त्या बोलनात, रोमना राजानं; येशुनी त्यासले सांगं, तर मंग राजानं शे, ते राजाले अनी देवना शे, ते देवले भरी द्या. 22हाई ऐकीन त्यासले आश्चर्य वाटणं अनी त्या त्याले सोडीन गयात.
पुनरूत्थानना प्रश्न
(मार्क १२:१८-२७; लूक २०:२७-४०)
23 # प्रेषित २३:८ त्याच दिनले, पुनरूत्थान व्हस नही, असा म्हणनारा सदुकी पंथना लोकसनी त्यानाकडे ईसन ईचारं, 24गुरजी, मोशेनी सांगेल शे की, जर एखादा माणुस लेकरं-बाळ न व्हताच मरी गया तर त्याना भाऊनी त्याना बायकोसंगे लगीन करीसन आपला भाऊना वंश चालावाना; 25आमनामा सात भाऊ व्हतात; त्यामधला पहिला लगीन करीसन मरी गया अनी त्याले लेकरं नव्हतात म्हणीन त्यानी बायकोसंगे त्याना भाऊनी लगीन करं 26तसाच दुसरा, तिसरा, असा सातही जण तिनासंगे लगीन करीसन मरी गयात; 27अनी सर्वासनंतर ती बाई पण मरी गयी. 28मंग जवय पुनरूत्थान व्हई तवय ती त्या सात जणसपैकी कोणी बायको व्हई? कारण ती त्या सर्वासनी बायको व्हयेल व्हती. 29येशुनी त्यासले उत्तर दिधं; तुम्हीन शास्त्र अनी देवना सामर्थ्यले समजनात नही म्हणीन तुम्हीन भ्रममा पडेल शेतस. 30कारण पुनरूत्थान व्हवानंतर त्या लोके लगीन करतस नही अनं करी बी देतस नही, तर त्या स्वर्गमधला देवदूतसना मायक राहतस. 31मरेलसना पुनरूत्थानबद्दल देवनी तुमले सांगं, ते तुमना वाचामा वना नही का? 32#निर्गम ३:६,१५-१६ते अस की, “मी अब्राहामना देव, इसहाकना देव अनं याकोबना देव शे.” देव मरेलसना नही तर जिवतसना देव शे. 33हाई ऐकीन लोकसनी गर्दीले त्याना शिक्षणनं आश्चर्य वाटणं.
सर्वात मोठी आज्ञाना प्रश्न
(मार्क १२:२८-३४; लूक १०:२५-२८)
34त्यानी सदुकी लोकसनं तोंड बंद करी टाकं हाई ऐकीन परूशी लोके जमनात; 35अनी त्यामातीन शास्त्रीसनी त्यानी परिक्षा दखाकरता एक प्रश्न ईचारा; 36गुरजी, नियमशास्त्रमा सर्वसमा मोठी आज्ञा कोणती शे? 37येशु त्याले बोलना, तु आपला देव परमेश्वर यानावर पुर्ण हृदयतीन, पुर्ण जिवतीन अनं पुर्ण मनतीन प्रिती कर. 38हाईच पहिली अनं मोठी आज्ञा शे. 39ईनामायकच आखो एक दुसरी आज्ञा अशी शे की, तु स्वतःवर करस तशी आपला शेजारीसवर प्रिती कर. 40#लूक १०:२५-२८ह्या दोन आज्ञासवरच सर्व नियमशास्त्र अनी संदेष्टासनं शास्त्र ह्या अवलंबीन शेतस.
ख्रिस्त कोणा पोऱ्या शे?
(मार्क १२:३५-३७; लूक २०:४१-४४)
41परूशी लोके एकत्र जमनात तवय येशुनी त्यासले ईचारं; 42ख्रिस्तबद्दल तुमले काय वाटस? तो कोणा पोऱ्या शे? त्यासनी त्याले उत्तर दिधं, दावीदना पोऱ्या शे. 43येशुनी त्यासले सांगं, तर मंग दावीदनी पवित्र आत्माना प्रेरणातीन त्याले “प्रभु” अस कसं म्हणं? तो म्हणस, 44#स्तोत्रसंहिता ११०:१परमेश्वरनी मना प्रभुले सांगं, मी तुना शत्रुले तुना पायसनं आसन करस तोपावत तु मना उजवीकडे बस. 45दावीद जर त्याले प्रभु म्हणस तर तो दावीदना पोऱ्या कशा काय व्हई? 46तवय कोणलेच त्याले उत्तर देता वनं नही; अनी त्या दिनपाईन त्याले आखो काही ईचारानी कोणीच हिम्मत व्हईनी नही.

Pati Souliye

Pataje

Kopye

None

Ou vle gen souliye ou yo sere sou tout aparèy ou yo? Enskri oswa konekte