1
मत्तय 10:16
वऱ्हाडी नवा करार
“पाहा, मी तुमाले अश्या लोकायमध्ये पाठवतो जे तुमाले मारून टाकतीन, अन् तुमी जंगली लांडग्या मधी मेंढरासारखे असान, म्हणून तुमी सर्पाच्या सारखे चतुर अन् कबुतरा सारखे भोले बनून रायजा.
ប្រៀបធៀប
រុករក मत्तय 10:16
2
मत्तय 10:39
जो माणूस आपल्या जीवाले वाचवाले पायतो, तो त्याले गमाविन, अन् जो माणूस माह्यासाठी आपल्या जीवाले गमाविन, त्याले कधीही न सरणार जीवन भेटन.”
រុករក मत्तय 10:39
3
मत्तय 10:28
त्या लोकायले भेऊ नका जे फक्त शरीराले मारू शकते, पण आत्म्याले मारू शकत नाई, पण देवाले भ्या जो आत्म्याले अन् शरीराले दोघायले नरकात नष्ट करू शकते.
រុករក मत्तय 10:28
4
मत्तय 10:38
अन् जो कोणी माह्य शिष्य झाल्याने, वधस्तंभाच दुख उचलाले अन् मराले तयार नाई तो पण माह्याला शिष्य बनाच्या, अन् माह्य अनुकरण करायच्या योग्य नाई.
រុករក मत्तय 10:38
5
मत्तय 10:32-33
“जो कोणी मले माणसा समोर माह्ये शिष्य म्हणून स्वीकार करतीन, त्याले मी पण स्वर्गातल्या देवबापाच्या समोर स्वीकार करीन. पण जो कोणी माणसा समोर भेऊन, माह्याले शिष्य म्हणून नाकार करीन, त्याले मी पण आपल्या स्वर्गाच्या देवबापाच्या समोर नाकार करीन.
រុករក मत्तय 10:32-33
6
मत्तय 10:8
बिमारायले बरं करा, मेलेल्यायले जिवंत करा, अन् कुष्ठरोग्यायले बरं करा, भुत आत्म्यायले लोकायतून बायर काढा, तुमाले फुकट मिळाले हाय, तुमी पण दुसऱ्यायले फुकट द्या.
រុករក मत्तय 10:8
7
मत्तय 10:31
म्हणून भेऊ नका, कावून कि तुमी देवासाठी चिमण्यापेक्षा जास्त मूल्यवान हायत.”
រុករក मत्तय 10:31
8
मत्तय 10:34
हे नका समजू कि मी पृथ्वीवर लोकायमध्ये शांती आणाले आलो, पण शांती नाई तर अलग कऱ्याले आलो हाय.
រុករក मत्तय 10:34
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ