मत्तय 11

11
योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे प्रश्न
(लूका 7:18-35)
1जवा येशूनं आपल्या बारा शिष्यायले आदेश देले, तवा तो नगरात देवाच्या वचनाची शिकवण देण्यासाठी ततून चालला गेला. 2त्यावाक्ती योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने जेलात ख्रिस्ताच्या कामाच्या बाऱ्यात समाचार आयकून, आपल्या दोन शिष्यायले येशू पासी हे विचाऱ्यासाठी पाठवलं. 3त्यायनं विचारलं “कि येणारा ख्रिस्त ज्याले देव पाठवणार होता तो तुचं हायस, कि आमी दुसऱ्याची वाट पाऊ?”
4येशूनं उत्तर देलं, कि “जे काई तुमी आयकता, अन् पायता, हे सगळे योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले जाऊन सांगा. 5कि फुटके पायतात अन् लंगडे चालतात फिरतात अन् कुष्ठरोगी बरे केले जातात, अन् बयरे आयकतात, अन् मेलेले जिवंत होतात, अन् गोरगरिबायले सुवार्था सांगतली जाते. 6अन् धन्य हायत ते, जे माह्यावर विश्वास करतात अन् मांग फिरत नाई.”
येशूच्या पासून योहानाचा सन्मान
7जवा योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे शिष्य ततून चालले गेले, तवा येशू योहानाच्या विषयात लोकायले सांग्याले लागला, “कि तुमी सुनसान जागी काय पाह्याले गेलते, काय हवेने हालनाऱ्या बोरुच्या झाडाले? 8मंग तुमी काय पाह्याले गेलते, काय महाग कपडे घातलेल्या माणसाले जे राजभवनात रायतात? 9तर मंग कावून गेलते? कोणत्या भविष्यवक्त्याले पाह्याले गेलते काय? हो, मी तुमाले सांगतो, कि भविष्यवक्त्या नाई पण त्याच्याहून मोठ्याले पाह्याले गेलते.
10हा योहान तोच माणूस हाय, ज्याच्या विषयात पवित्रशास्त्रात लिवलेल हाय कि, पाह्य मी आपल्या संदेशवाहकायले पाठवले तुह्यावाल्या पयले जो तुह्यावाल्या पुढे तुह्या रस्ता तयार करणार. 11मी तुमाले खरं सांगतो कि, जो बायाय पासून जन्मला हाय, त्यायच्यातून योहान बाप्तिस्मा देणाऱ्याहून कोणी मोठा नाई, पण जो देवाच्या राज्यात लायण्याहून लायना अशीन, तो योहान बाप्तिस्मा देणाऱ्याहून मोठा हाय. 12योहान बाप्तिस्मा देणाऱ्यान प्रचार करने सुरु केलं त्यावाक्ती पासून तर आतापर्यंत देवाचं राज्य मोठ्या शक्तीन समोर वाढत हाय अन् हिंसक लोकं स्वर्गाले नाश कऱ्याचा प्रयन्त करत हायत.
13सगळे भविष्यवक्ताचे पुस्तक अन् मोशेचे नियमशास्त्र योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या येण्यापरेंत देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सांगत होते. 14जर तुमी या खऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवसान, तर आयका योहान तोच एलिया भविष्यवक्ता हाय ज्याचे दुसऱ्यांदा येण्याच्या विषयात सांगतल होतं.” 15“ज्या कोणाले माह्यावाला आवाज आयकू येते त्यानं हे समज्याचा प्रयत्न करा. 16मी या पिढीच्या लोकायची तुलना कोण्या लोकायसोबत करू ते त्या लेकरा सारखे हायत, जे बजारात बसून एकामेकांना आवाज देतात, 17कि आमी तुमच्यासाठी बासुरी वाजवली, अन् तुमी नाई नाचले, आमी दुख केला, पण तुमी रडले नाई.
18कावून कि योहान बाप्तिस्मा देणारा उपास करत होता अन् अंगुराचा रस पण पेत नव्हता, तरीही ते लोकं त्याले म्हणतात कि त्याच्यात भुत आत्मा हाय. 19माणसाचा पोरगा खात पेत आला अन् तवा लोकं त्याले म्हणतात कि, खादोडा, दारू पेणारा माणूस, करवसुली करणाऱ्या अन् पापी लोकायचा दोस्त, पण ज्ञान आपल्या सगळ्या कामाच्या द्वारे खरा ठरवल्या गेला हाय.”
पश्चाताप नाई करणाऱ्यावर हाय-हाय
(लूका 10:13-15)
20तवा तो त्या गावातल्या लोकायले दटावून सांगू रायला होता, कि ज्या लोकाईत त्यानं लय सारे चमत्काराचे काम केले होते, त्यायनं आपल्या पापायले सोडून देवाच्या इकळे आपलं मन फिरवलं नोव्हत. 21हे खुराजीन नगराच्या लोकायनो तुमचा धिक्कार असो, हे बेथसैदा शहराच्या लोकायनो तुमचा धिक्कार असो जे चमत्काराचे काम तुमच्यात झाले होते, ते जर सूर अन् सैदा नगरात झाले असते तर त्यांनी पयलेच तरट ओडून राखोंडी आंगावर टाकली असती, हे दाखवासाठी कि त्यायनं पश्चाताप केला हाय.
22पण मी तुमाले सांगतो, ज्या दिवशी देव न्याय करीन तवा तुमची दशा सूर अन् सैदा नगराहून पण भयानक होईन. 23हे कफरनहूम शहराचे लोकायनो काय तुमाले स्वर्गात उंच केल्या जाईन? तुमी तर नरकात खाली टाकले जासान, जे चमत्काराचे काम तुमच्यात केले हायत, जर ते सदोम शहरात केले असते तर तो आजपरेंत टिकून रायला असता. 24पण मी तुमाले सांगतो, ज्या दिवशी देव न्याय करीन तवा तुमची दशा सदोम शहराहून पण भयंकर होईन.
येशू पासी आराम
(लूका 10:21-22)
25त्याचं वाक्ती येशूनं म्हतलं, “हे देवा अभाय अन् पृथ्वीच्या प्रभू मी तुह्याला धन्यवाद करतो, कि तू या गोष्टी ज्ञानी अन् समजदार लोकायपासून लपवून ठेवल्या, अन् आपल्या लेकरायवर प्रगट केल्या हायत. 26हो, माह्याला देवबापा, तुले हेच चांगलं वाटलं.” 27“माह्याल्या देवबापान मले सगळे अधिकार देऊन देले हाय, अन् कोणी पोराले ओयखत नाई, फक्त देवबापच, अन् कोणी देवबापाले ओयखत नाई, फक्त पोरगाच, अन् फक्त तोच माणूस ज्याच्या बऱ्यात पोराले वाटते कि देवबापाले ओयखाव.”
28“हे सगळे कष्ट करणाऱ्यानो, अन् ओझ्याच्या वजनाने दबलेल्या लोकोहो, माह्यापासी या, मी तुमाले आराम देईन. 29माह्या आधीन हून जा अन् माह्याल्या मांग या अन् माह्यापासून शिका, कावून कि मी नम्र अन् मनान शांत हावो, अन् तवा तुमी आपल्या मनात आराम पायसान. 30कावून कि माह्यावाली आज्ञा सोपी अन् हलकी हाय.”

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

मत्तय 11: VAHNT

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល