मत्तय 16

16
स्वर्गाच्या राज्याची चिन्ह मागणे
(मार्क 8:11-13; लूका 12:54-56)
1परुशी अन् सदुकी लोकायन येशूच्या जवळ येऊन त्याची परीक्षा पायण्यासाठी त्याले म्हतलं, “कि आमाले स्वर्गातले कोणत तरी चमत्कार दाखवं.” 2येशूनं त्यायले उत्तर देलं, “संध्याकाळी तुमी म्हणता, वातावरण चांगलं राईन कावून कि अभाय लाल हाय.
3अन् सकाळी म्हणता, कि आज पाणी वादळ येईन कावून कि अभाय लाल अन् काये ढग हाय, तुमी तर अभायाचे लक्षण पाऊन भेद सांगू शकता, पण वेळेच्या चिन्हाचे भेद सांगू शकत नाई. 4ह्या पिढितले बेकार लोकं चमत्कार मांगतात, पण योना भविष्यवक्ताच्या चिन्ह सोडून” ह्या पिढितल्या लोकायले कोणताच चिन्ह देल्या जाणार नाई. अन् मंग तो त्यायले सोडून चालला गेला.
परुशी अन् सदुकी लोकायचं शिकवण अन् खमीर
(मार्क 8:14-21)
5अन् शिष्य समुद्राच्या तिकडल्या बाजूने जाह्याच्या वाक्ती भाकरी घ्यायले भुलले होते. 6येशूने त्यायले म्हतलं कि, “पाहा, परुशी अन् सदुकी लोकायची खमीर अन् हेरोद राजाची खमीर, ह्या विषयी हुशारकीनं राहा.”
7तवा ते आपआपसात विचार करून म्हणाले, आपण भाकरी नाई आणल्या, म्हणून तो आपल्याले असा म्हणत अशीन. 8-9हे पावून येशूनं त्यायले म्हतलं, हे अल्पविश्वासायनो तुमच्यापासी भाकरी नाई हाय, ह्या बद्दल कायले विचार करता, तुमाले अजून लक्षात नाई हाय काय? तुमचं मन एवढे कठोर कावून झालं? तुमाले आठवण नाई हाय काय? अन् तुमी ते पाच हजार लोकायच्या पाच भाकऱ्या आठवण नाई काय, अन् हे पण कि किती भाकरीच्या टोपल्या उचलल्या होत्या ते आठवण नाई काय?
10अन् त्या चार हजार लोकायले सात भाकऱ्या होत्या तवा किती टोपल्या भाकरी भरून घेतल्या होत्या? 11तुमी कावून नाई समजत, कि मी तुमाले भाकरीच्या विषयात नाई म्हतलं, पण हे कि तुमी परुशी अन् सदुकी लोकायच्या खमिरापासून सावध राह्याले सांगतो. 12तवा शिष्यायच्या लक्षात आलं कि, त्यानं भाकरीच्या खमिरापासून नाई पण परुशी अन् सदुकी लोकायच्या शिकवण पासून सावध राह्याले म्हतलं
पतरसचे येशू ख्रिस्ताले स्वीकारने
(मार्क 8:27-30; लूका 9:18-21)
13येशू कैसरिया फिलीपी प्रांताच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जाण्यासाठी निघाला, अन् रस्त्यात चालतांना आपल्या शिष्यायले विचारू रायला होता, कि “लोकं माणसाच्या पोराले काय म्हणतात?” 14शिष्यायनं त्याले उत्तर देलं, “कोणी म्हणतात योहान बाप्तिस्मा देणारा, कोणी म्हणतात एलिया भविष्यवक्ता अन् कोणी म्हणतात यिर्मया भविष्यवक्ता अन् कोणी म्हणतात भविष्यवक्त्यायतून कोणी तरी एक हाय.”
15तवा येशूनं त्यायले म्हतलं, “पण तुमी मले काय म्हणता?” 16शिमोन पतरसने उत्तर देलं, “तू जिवंत देवाचा पोरगा ख्रिस्त हायस.” 17येशूनं त्याले उत्तर देलं, “हे शिमोन, योनाच्या पोरा तू धन्य हास कावून कि माणसाले हे गोष्ट सांगतली नाई, पण माह्या देवबापान जो स्वर्गात हाय, हे गोष्ट तुह्यावर प्रगट केली हाय. 18अन् मी तुले सांगतो कि, तू पतरस हाय, अन् मी आपली मंडळी या गोट्यावर बांधीन, अन् मृत्युलोकाचे फाटक त्याच्यावर कधीच विजयी होणार नाई.
19मी तुले देवाच्या राज्याची चाबी देईन, अन् जे काई तुमी पृथ्वीवर बांधसान ते स्वर्गात बांधल्या जाईन, अन् जे काई तुमी पृथ्वीवर उघडसान, ते स्वर्गात पण उघडल्या जाईन.” 20तवा येशूनं शिष्यायले चिताऊन म्हतलं, “माह्या बद्दल कोणाले सांगू नका कि मी ख्रिस्त हावो.”
आपल्या मरणाच्या विषयात येशूची भविष्यवाणी
(मार्क 8:31-9:1; लूका 9:22-27)
21त्यावाक्ती पासून येशू आपल्या शिष्यायले सांग्याले लागला, “कि हे नक्की हाय, कि मले यरुशलेम शहरात जाऊन यहुदी पुढारी, मुख्ययाजक व अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकायच्या हातातून लय दुख देल्या जाईन अन् मारून टाकल्या जाईन अन् तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत होईन.”
22तवा ह्या गोष्टीवर पतरसन येशूले बाजुले नेऊन दटावू लागला. कि “हे प्रभू, देव न करो कि तुह्या संग असं कधी व्हावं.” 23तवा येशूनं फिरून आपल्या शिष्यायकडे पायलं अन् पतरसले दटावून म्हतलं, “हे सैताना माह्यापासून निघून जाय, कावून कि तू माह्यासाठी ठोकरीचं कारण हायस, कावून कि तू देवासारखा नाई पण माणसा सारखा विचार करत हाय.”
येशूच्या मांग चालण्याचा अर्थ
24येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, “ज्या कोणाले माह्य अनुकरण कराचं हाय, त्यानं स्वताच्या त्याग करून, आपला वधस्तंभ उचलावा अन् माह्या मांग यावं. 25कावून कि जो कोणी आपला जीव वाचवण्याची कोशिष करीन तो त्याले गमावून बसीन, अन् जो कोणी माह्यासाठी आपला जीव देणार तो त्याले भेटीन.
26जर माणसानं आपल्या इच्छा प्रमाण सगळं मिळवलं अन् शेवटी त्यानं आपल्या जीवाले नाश केलं तर काय फायदा होईन? अन् माणूस आपल्या जीवाबद्दल काय भरपाई देऊ शकते? 27मी, जो माणसाचा पोरगा, आपल्या देवदूतायच्या संग आपल्या बापाच्या गौरवात येऊन अन् त्यावाक्ती तो एकाएकाले त्याच्या कामाच्या अनुसार प्रतिफळ देईन. 28मी तुमाले खरं सांगतो कि अती उभे असणाऱ्या पैकी, काई जन असे हायत, जतपरेंत माणसाच्या पोराले त्याच्या राज्यात येत असतांना नाई पायतीन ततपरेंत ते मरणार नाई.”

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

मत्तय 16: VAHNT

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល