1
योहान 15:5
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हांला काही करता येणार नाही.
Palyginti
Naršyti योहान 15:5
2
योहान 15:4
तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलीत राहिल्याशिवाय त्याला स्वतः फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांलाही फळ देता येणार नाही.
Naršyti योहान 15:4
3
योहान 15:7
तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिलीत, तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा; ते तुमच्यासाठी केले जाईल.
Naršyti योहान 15:7
4
योहान 15:16
तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हांला निवडले आहे व तुम्हांला नेमले आहे, म्हणजे तुम्ही जावे. विपुल फळ द्यावे. तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल, ते त्याने तुम्हांला द्यावे.
Naršyti योहान 15:16
5
योहान 15:13
आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठी प्रीती नाही.
Naršyti योहान 15:13
6
योहान 15:2
तो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याने अधिक फळ द्यावे म्हणून त्याची छाटणी करतो.
Naršyti योहान 15:2
7
योहान 15:12
माझी ही आज्ञा आहे, जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा.
Naršyti योहान 15:12
8
योहान 15:8
तुम्ही विपुल फळ दिले तर माझ्या पित्याचा गौरव होईल. अशा प्रकारे तुम्ही माझे शिष्य व्हाल.
Naršyti योहान 15:8
9
योहान 15:1
“मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे.
Naršyti योहान 15:1
10
योहान 15:6
कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर वेलीपासून छाटलेल्या फाट्याप्रमाणे तो वाळून जातो; असे वाळलेले फाटे एकत्र करून अग्नीत टाकले जातात व तेथे ते जळून जातात.
Naršyti योहान 15:6
11
योहान 15:11
माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला हे सारे सांगितले आहे.
Naršyti योहान 15:11
12
योहान 15:10
जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.
Naršyti योहान 15:10
13
योहान 15:17
तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी तुम्हांला आज्ञा आहे.
Naršyti योहान 15:17
14
योहान 15:19
तुम्ही जगाचे असता, तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते. परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करते.
Naršyti योहान 15:19
Pradžia
Biblija
Planai
Vaizdo įrašai