1
योहान 16:33
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तुम्हांला माझ्या ठायी शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा. मी जगावर विजय मिळवला आहे.”
Palyginti
Naršyti योहान 16:33
2
योहान 16:13
तरी पण सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्याविषयी मार्गदर्शन करील. तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही तो ऐकेल, तेच सांगेल आणि पुढे येणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील.
Naršyti योहान 16:13
3
योहान 16:24
तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
Naršyti योहान 16:24
4
योहान 16:7-8
तरीही मी तुम्हांला खरे ते सांगतो. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. परंतु मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खातरी पटवील.
Naršyti योहान 16:7-8
5
योहान 16:22-23
ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले तरी मी तुम्हांला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमच्याकडून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही माझ्याकडून काही मागणार नाही. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही पित्याजवळ माझ्या नावाने काही मागाल तर तो ते तुम्हांला देईल.
Naršyti योहान 16:22-23
6
योहान 16:20
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल परंतु जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, परंतु तुमचे दुःख तुमचा आनंद होईल.
Naršyti योहान 16:20
Pradžia
Biblija
Planai
Vaizdo įrašai