1
लूक 14:26
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
“जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
Mampitaha
Mikaroka लूक 14:26
2
लूक 14:27
जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.
Mikaroka लूक 14:27
3
लूक 14:11
कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
Mikaroka लूक 14:11
4
लूक 14:33
म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.
Mikaroka लूक 14:33
5
लूक 14:28-30
तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’
Mikaroka लूक 14:28-30
6
लूक 14:13-14
तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा; म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काही नाही; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.”
Mikaroka लूक 14:13-14
7
लूक 14:34-35
मीठ हा चांगला पदार्थ आहे; पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही; ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
Mikaroka लूक 14:34-35
Fidirana
Baiboly
Planina
Horonan-tsary