शौलाने हे वर्तमान ऐकताच देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने येऊन तो मनस्वी संतप्त झाला.
त्याने एक बैलाची जोडी कापून त्यांचे तुकडे केले व ते जासुदांच्या हाती इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवले आणि त्यांना निरोप दिला की, “जो कोणी शौल व शमुवेल ह्यांच्यामागे येणार नाही त्यांच्या बैलांची अशीच गत होईल.” तेव्हा परमेश्वराची दहशत लोकांवर बसून ते एकचित्ताने बाहेर निघाले.