१ शमुवेल 11:6-7
१ शमुवेल 11:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला. मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले.
१ शमुवेल 11:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा शौलाने त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला आणि तो क्रोधाने पेटला. त्याने बैलाची एक जोडी कापून त्यांचे तुकडे केले आणि निरोप्यांच्या हाती ते तुकडे सर्व इस्राएलमध्ये पाठविले आणि जाहीर केले, “जे कोणी शौल आणि शमुवेल यांचे अनुसरण करणार नाही, त्यांच्या बैलांचे असेच केले जाईल.” तेव्हा लोकांना याहवेहचे भय वाटू लागले आणि ते एकजूट होऊन बाहेर आले.
१ शमुवेल 11:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शौलाने हे वर्तमान ऐकताच देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने येऊन तो मनस्वी संतप्त झाला. त्याने एक बैलाची जोडी कापून त्यांचे तुकडे केले व ते जासुदांच्या हाती इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवले आणि त्यांना निरोप दिला की, “जो कोणी शौल व शमुवेल ह्यांच्यामागे येणार नाही त्यांच्या बैलांची अशीच गत होईल.” तेव्हा परमेश्वराची दहशत लोकांवर बसून ते एकचित्ताने बाहेर निघाले.