1
निर्गम 4:11-12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवीन.”
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्गम 4:11-12
2
निर्गम 4:10
तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.”
एक्सप्लोर करा निर्गम 4:10
3
निर्गम 4:14
मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला, तो त्याला म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ नाही काय? त्याला चांगले बोलता येते हे मला ठाऊक आहे. पाहा, तो तुला भेटायला येत आहे; तुला पाहून त्याला मनात आनंद होईल.
एक्सप्लोर करा निर्गम 4:14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ