करूबारूढ असलेल्या इस्राएलाच्या देवाचे तेज तेथून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले; आणि कंबरेनजीक कारकुनाची दऊत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्यास त्याने हाक मारली.
परमेश्वर त्याला म्हणाला, “नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.”