“पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गींचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध;
त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल - त्याच्याबरोबर त्याचा देव असो - त्याने यहूदातील यरुशलेमेस जाऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधावे; यरुशलेमेत जो आहे तोच देव होय.