पितृकुळातील कित्येक प्रमुख पुरुष यरुशलेमेतील परमेश्वराच्या मंदिराकडे आले तेव्हा देवाचे मंदिर पूर्ववत उभे करण्यासाठी त्यांनी स्वखुशीने अर्पणे दिली;
त्यांनी आपल्या शक्तीनुसार एकसष्ट हजार दारिक1 सोने पाच हजार माने1 चांदी आणि शंभर याजकीय वस्त्रे भांडारात पावती केली.