1
प्रकटी 11:15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रकटी 11:15
2
प्रकटी 11:18
‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेष्टे’ व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणार्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”
एक्सप्लोर करा प्रकटी 11:18
3
प्रकटी 11:3
माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.”
एक्सप्लोर करा प्रकटी 11:3
4
प्रकटी 11:11
पुढे साडेतीन दिवसांनंतर ‘जीवनाचा आत्मा’ देवापासून येऊन ‘त्यांच्यामध्ये शिरला तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले;’ आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे ‘भय वाटले.’
एक्सप्लोर करा प्रकटी 11:11
5
प्रकटी 11:6
त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत ‘पाऊस पडू नये’ म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे; ‘पाण्याचे रक्त करण्याचा’ अधिकार त्यांना पाण्यावर आहे, आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला ‘सर्व पीडांनी पीडित करण्याचाही’ त्यांना अधिकार आहे.
एक्सप्लोर करा प्रकटी 11:6
6
प्रकटी 11:4-5
‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे’ व ‘दोन समया’ ही ते आहेत. त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास ‘त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैर्यांना खाऊन टाकतो;’ कोणी त्यांना उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याचप्रमाणे जिवे मारण्यात यावे.
एक्सप्लोर करा प्रकटी 11:4-5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ