तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, ‘ते लहानसे पुस्तक’ मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, “हे घे ‘आणि खाऊन टाक’; ‘ते तुझे पोट कडू’ करील, तरी ‘तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”’
तेव्हा मी देवदूताच्या हातातून ‘ते लहानसे पुस्तक’ घेतले ‘व खाऊन टाकले, ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले,’ तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.