प्रकटी 10:9-10
प्रकटी 10:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन “ती लहानशी गुंडाळी मला दे”, असे म्हटले. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ती तुझे पोट बिघडवेल परंतु तुझ्या तोंडाला मधासारखी गोड लागेल.” तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहानशी गुंडाळी घेतली व खाऊन टाकली. ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली तरी ती खाल्ल्यावर माझ्या पोटात बिघाड झाला.
प्रकटी 10:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, “ती लहान गुंडाळी” मला दे असे म्हटले. तो म्हणाला, “हि घे आणि खाऊन टाक; ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.” तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली व खाऊन टाकली, ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली, तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.
प्रकटी 10:9-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याप्रमाणे त्याच्याकडे जाऊन मी त्याला ती छोटी गुंडाळी मागितली. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ‘ती तुझ्या तोंडात मधासारखी गोड लागेल,’ पण ती गिळल्यावर ती तुझे पोट आंबट करील.” तेव्हा मी देवदूताच्या हातातून छोटी गुंडाळी घेतली आणि खाऊन टाकली. त्याने सांगितल्याप्रमाणे माझ्या तोंडाला ती मधाप्रमाणे गोड लागली, पण ती गिळल्यावर माझे पोट आंबट झाले.
प्रकटी 10:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, ‘ते लहानसे पुस्तक’ मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, “हे घे ‘आणि खाऊन टाक’; ‘ते तुझे पोट कडू’ करील, तरी ‘तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”’ तेव्हा मी देवदूताच्या हातातून ‘ते लहानसे पुस्तक’ घेतले ‘व खाऊन टाकले, ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले,’ तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.