YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 10

10
सामर्थ्यशाली दूत व लहानशी गुंडाळी
1मी आणखी एक सामर्थ्यशाली देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टित होता व त्याच्या डोक्याभोवती मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. 2त्याच्या हाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला. 3सिंहगर्जनेप्रमाणे तो ओरडला, तेव्हा सात मेघगर्जनांचा निनाद ऐकू आला. 4त्या सात मेघगर्जनांचा अर्थ मी लिहिणार होतो, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, “सात मेघगर्जनांचा अर्थ तू गुप्त ठेव, तो लिहू नकोस.”
5ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला 6आणि जो युगानुयुगे जिंवत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे, भूमी व तिच्यावर जे आहे आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, “आणखी वेळ लागणार नाही. 7परंतु सातवा देवदूत कर्णा वाजवील तेव्हा देवाने आपले संदेष्टे सेवक ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्याची गुप्त योजना पूर्ण होईल.”
8स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती, ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी घे.”
9तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन “ती लहानशी गुंडाळी मला दे”, असे म्हटले. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ती तुझे पोट बिघडवेल परंतु तुझ्या तोंडाला मधासारखी गोड लागेल.” 10तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहानशी गुंडाळी घेतली व खाऊन टाकली. ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली तरी ती खाल्ल्यावर माझ्या पोटात बिघाड झाला. 11तेव्हा मला सांगण्यात आले की, अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे ह्यांना तू पुन्हा देवाचा संदेश दिला पाहिजे.

सध्या निवडलेले:

प्रकटी 10: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन