1
प्रकटी 8:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
त्याने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रकटी 8:1
2
प्रकटी 8:7
पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर’ वृष्टी झाली; आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला; एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.
एक्सप्लोर करा प्रकटी 8:7
3
प्रकटी 8:13
मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला; त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले : “जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्यांच्या होणार्या ध्वनीने पृथ्वीवर राहणार्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!”
एक्सप्लोर करा प्रकटी 8:13
4
प्रकटी 8:8
दुसर्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा ‘अग्नीने पेटलेल्या’ मोठ्या ‘डोंगरासारखे’ काहीतरी समुद्रात टाकले गेले; समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले
एक्सप्लोर करा प्रकटी 8:8
5
प्रकटी 8:10-11
तिसर्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशातून खाली पडला.’ तो नद्यांच्या व झर्यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला; त्या तार्याचे नाव कडूदवणा; आणि पाण्याच्या एक तृतीयांशाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली; कारण ते कडू झाले होते.
एक्सप्लोर करा प्रकटी 8:10-11
6
प्रकटी 8:12
चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.
एक्सप्लोर करा प्रकटी 8:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ