प्रकटी 8:13
प्रकटी 8:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला; त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले : “जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्यांच्या होणार्या ध्वनीने पृथ्वीवर राहणार्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!”
प्रकटी 8:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!
प्रकटी 8:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडताना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.”
प्रकटी 8:13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी पाहिले तेव्हा एक गरूड अंतराळात उंच उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, “इतर तीन देवदूत कर्णा वाजविणार आहेत, तेव्हा त्यांच्या कर्ण्यांच्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर किती अनर्थ, अनर्थ, अनर्थ ओढवणार आहे!”