YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटीकरण 8

8
सातवा शिक्का आणि सोन्याची धुपदाणी
1त्यांनी जेव्हा सातवा शिक्का उघडला, तेव्हा स्वर्गामध्ये जवळजवळ अर्धातास सर्वत्र संपूर्ण शांतता पसरली.
2नंतर मी पाहिले जे सात देवदूत परमेश्वरासमोर उभे राहिले, त्यांना सात कर्णे देण्यात आले.
3नंतर दुसरा एक देवदूत, सोन्याची एक धुपदाणी घेऊन आला व वेदीजवळ उभा राहिला. त्याला राजासनासमोरील सोन्याच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या प्रार्थना मिश्रित बराच धूप देण्यात आला होता. 4त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला. 5तेव्हा त्या देवदूताने वेदीवरील अग्नी धुपदाणीत भरून घेतली आणि त्याने खाली पृथ्वीवर टाकली. त्याबरोबर मोठा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या आणि प्रचंड भूमीकंप झाला.
कर्णे
6नंतर ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते, त्यांनी आपआपले कर्णे वाजविण्याची तयारी केली.
7पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नी यांचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सारे हिरवे गवत जळून गेले.
8-9नंतर दुसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. त्यातील एकतृतीयांश जलचर मरण पावले, आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली.
10मग तिसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला. 11त्या तार्‍याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तिसरा हिस्सा पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.
12चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा आणि रात्रीचा तिसरा हिस्सा अंधार झाला.
13मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडताना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.”

सध्या निवडलेले:

प्रकटीकरण 8: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन