1
प्रकटीकरण 8:1
मराठी समकालीन आवृत्ती
त्यांनी जेव्हा सातवा शिक्का उघडला, तेव्हा स्वर्गामध्ये जवळजवळ अर्धातास सर्वत्र संपूर्ण शांतता पसरली.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 8:1
2
प्रकटीकरण 8:7
पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नी यांचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सारे हिरवे गवत जळून गेले.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 8:7
3
प्रकटीकरण 8:13
मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडताना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.”
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 8:13
4
प्रकटीकरण 8:8-9
नंतर दुसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. त्यातील एकतृतीयांश जलचर मरण पावले, आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 8:8-9
5
प्रकटीकरण 8:10-11
मग तिसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला. त्या तार्याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तिसरा हिस्सा पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 8:10-11
6
प्रकटीकरण 8:12
चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा आणि रात्रीचा तिसरा हिस्सा अंधार झाला.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 8:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ