आणि तो म्हणाला,
“देवाच्या नामाचे सदासर्वदा स्तवन होवो,
कारण ज्ञान आणि सामर्थ्य त्याचे आहे.”
तो समय आणि ऋतु बदलतो,
तो राजास काढतो आणि दुसऱ्यास सिंहासनावर बसवून राजे करतो;
तो ज्ञान्यास आणि विवेकवंतास शहाणपण देतो.
तो गुढ आणि गहन गोष्टी प्रगट करतो,
कारण अंधारात काय आहे हे तो जाणतो,
आणि प्रकाश त्यामध्ये वसतो.