1
उत्प. 35:11-12
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
देव त्यास म्हणाला, “मी सर्व सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप आणि बहुगुणित हो. तुझ्यातून एक राष्ट्र आणि राष्ट्रांचा समुदाय येईल व तुझ्या वंशजातून राजे जन्मास येतील. मी अब्राहाम व इसहाक यांना जो देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.”
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्प. 35:11-12
2
उत्प. 35:3
नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”
एक्सप्लोर करा उत्प. 35:3
3
उत्प. 35:10
देव त्यास म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे, परंतु तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे होईल.” म्हणून देवाने त्यास इस्राएल हे नाव दिले.
एक्सप्लोर करा उत्प. 35:10
4
उत्प. 35:2
तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. आपले कपडे बदला.
एक्सप्लोर करा उत्प. 35:2
5
उत्प. 35:1
देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.”
एक्सप्लोर करा उत्प. 35:1
6
उत्प. 35:18
त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली, परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी असे ठेवले, परंतु त्याच्या वडिलाने त्याचे नाव बन्यामीन असे ठेवले.
एक्सप्लोर करा उत्प. 35:18
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ