ज्या बाबेलाच्या राजाला तुम्ही भीत आहात, त्यास भिऊ नका. हे परमेश्वराचे निवेदन आहे. कारण तुमचे रक्षण करणास आणि त्याच्या हातातून तुमची सुटका करण्यास, मी तुमच्याबरोबर आहे. कारण मी तुमच्यावर दया करीन आणि तुमच्याशी दयाळूपणाने वागेल आणि मी तुम्हास तुमच्या देशात परत आणील.