1
योहा. 10:10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा योहा. 10:10
2
योहा. 10:11
मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.
एक्सप्लोर करा योहा. 10:11
3
योहा. 10:27
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
एक्सप्लोर करा योहा. 10:27
4
योहा. 10:28
मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही.
एक्सप्लोर करा योहा. 10:28
5
योहा. 10:9
मी द्वार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल.
एक्सप्लोर करा योहा. 10:9
6
योहा. 10:14-15
मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो.
एक्सप्लोर करा योहा. 10:14-15
7
योहा. 10:29-30
पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.”
एक्सप्लोर करा योहा. 10:29-30
8
9
योहा. 10:18
कोणी तो माझ्यापासून घेत नाही. तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे.”
एक्सप्लोर करा योहा. 10:18
10
योहा. 10:7
म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी मेंढरांचे द्वार आहे.
एक्सप्लोर करा योहा. 10:7
11
योहा. 10:12
जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो.
एक्सप्लोर करा योहा. 10:12
12
योहा. 10:1
“मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो मेंढवाड्यांत दरवाजातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे.
एक्सप्लोर करा योहा. 10:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ