1
मत्त. 27:46
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
सुमारे नवव्या ताशी, येशू मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्त. 27:46
2
मत्त. 27:51-52
पाहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला गेला, भूमी कापली, खडक फुटले. कबरी उघडल्या आणि जे पवित्रजन मरण पावले होते, ते उठवले गेले.
एक्सप्लोर करा मत्त. 27:51-52
3
मत्त. 27:50
पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि त्याचा प्राण सोडला.
एक्सप्लोर करा मत्त. 27:50
4
मत्त. 27:54
आता शताधिपतीने, त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा खरोखर देवाचा पुत्र होता.”
एक्सप्लोर करा मत्त. 27:54
5
मत्त. 27:45
मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता.
एक्सप्लोर करा मत्त. 27:45
6
मत्त. 27:22-23
पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!” आणि तो म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
एक्सप्लोर करा मत्त. 27:22-23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ